Gau Vigyan Pariksha 2021

‘गो विज्ञान’राष्ट्रीय परीक्षा पोस्टपोन, लवकरच नवीन तारखा जाहीर करण्यात येईल

Gau Vigyan Pariksha 2021 – Rashtriya Kamdhenu Aayog (RKA) has postponed the Cow Science Exam 2021 or Gau Vigyan exam until further notice. The exam has to be conducted on 25th February 2021. No new dates of the exam have been notified soon. The mock test schedule for February 21 also stands postponed.

गाय विज्ञान परीक्षेसाठी 5 लाखांहून अधिक अर्जदार

राष्ट्रीय कामधेनु आयोगाच्या अधिकृत निवेदनानुसार, गाय विज्ञान परीक्षा २०२१ साठी 5 लाखाहून अधिक लोकांनी आपले अर्ज सादर केले आहेत, जे कामधेनु गौ विज्ञान प्रचार-प्रसार परीक्षा म्हणून ओळखले जातात. अर्ज फक्त भारतातूनच प्राप्त झाले नाहीत तर पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका, मलेशिया, अफगानिस्तान, यूके आणि अमेरिका या  देशांकडून अर्ज प्राप्त झाले. नुकतीच युजीसीने विद्यापीठांना विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज पाठविण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहनही केले होते.


‘गो विज्ञान’राष्ट्रीय परीक्षा-यूजीसीनं देशातील सर्व विद्यापीठांना गाय विज्ञान परीक्षेसंदर्भात आदेश काढला आहे

Gau Vigyan Pariksha 2021 – विद्यापीठ अनुदान आयोगानं (University Grants Commission) देशातील सर्व विद्यापीठांना गाय विज्ञान परीक्षेसंदर्भात (Cow Science Exam) आदेश काढला आहे. 25 फेब्रुवारीला होणाऱ्या गाय विज्ञान परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं, अशा सूचना यूजीसीनं दिल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगानं गाय विज्ञान परीक्षेचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्यास सांगितलं आहे. या परीक्षेत गाय विज्ञान संदर्भात विविध प्रश्न विचारले जातील. (UGC send notice to all university for cow science exam)

राष्ट्रीय कामधेनू आयोगाची स्थापना 2019 मध्ये करण्यात आली. केंद्रीय पशूपालन आणि मत्स्य मंत्रालायाचा याद्वारे गाय विज्ञानाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. आयोगानं 25 फेब्रुवारीला प्रमाणपत्र परीक्षेचे आयोजन केले आहे. ही परीक्षा चार वेगवेगळ्या गटांमध्ये होणार आहे. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी kamdhenu.gov.in ला भेट द्यावी असं सांगण्यात आलं आहे.

परीक्षेचे स्वरुप

गाय विज्ञान परीक्षेचा कालावधी एक तास असेल. ही परीक्षा बहूपर्यायी स्वरुपाची असेल. परीक्षेचे एकूण गुण 75 असतील. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसेल. परीक्षेचे आयोजन इंग्रजी, हिंदी, गुजराती, संस्कृत, पंजाबी, मराठी, मल्याळम, तामीळ, तेलुगू, उडिया भाषेत केले जाणार आहे. प्रत्येक विभागासाठी वेगवगेळ्या वेळी परीक्षा होणार आहे. सहभागी होणारे विद्यार्थी लॅपटॉप आणि मोबाईलवरुन परीक्षा देऊ शकतात.

परीक्षा झाल्यावर लगेच निकाल

गाय विज्ञान परीक्षा संपल्यानंतर लगेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी सर्व विद्यापीठांना परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यास सांगितलं आहे. गाय विज्ञान परीक्षा 25 फेब्रुवारीला होणार असून लगेचच निकाल जाहीर होणार आहे.

परीक्षेचा उद्देश

गाय विज्ञान परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशीगाय आणि त्यासंदर्भातील मुद्दे, अर्थव्यवस्था, पर्यावरण, आरोग्य याविषयी जागरुक केले जाणार आहे. विद्यार्थी भारतातील विविध भाषांमध्ये परीक्षा देऊ शकतात. विद्यापीठ अनुदान आयोगानं यासंदर्भातील उदासीनता पाहून विद्यापीठांना नोटीस पाठवलं आहे.


Gau Vigyan Pariksha 2021 – The National Kamadhenu Commission has announced the first ever exam on Cow. The exam will be held on 25th February  2021. The commission said that primary and secondary school students, college students as well as any ordinary person can take part in the exam. There will be no charge for this exam. And this exam will be conducted every year.

Kamdhenu Gau Vigyan Prachar Prasar Exam 2021 – गायींबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? एक राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा देऊन तुम्ही गायींच्या विज्ञानाविषयीचे (Cow Science) तज्ज्ञ होऊ शकता, हे तुम्हाला ठाऊक आहे का? राष्ट्रीय कामधेनू आयोगाने या परीक्षेची घोषणा केली आहे. २५ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा होणार आहे.

कामधेून आयोग (RKA) मंगळवारी ५ जानेवारी २०२१ रोजी या परीक्षेची घोषणा केली आहे. आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथीरिया यांनी सांगितले की, ‘देशात पहिल्यांदाच अशा प्रकारची परीक्षा होत आहे. आता दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येईल.’

कोण देऊ शकतं परीक्षा?

आयोगाने सांगितले की या गो विज्ञान परीक्षेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे विद्यार्थी, कॉलेज विद्यार्थी तसेच कोणीही सामान्य व्यक्ती या परीक्षेत सहभागी होऊ शकतात. या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. ‘कामधेनू गो विज्ञान प्रचार प्रसार परीक्षा’ (Kamdhenu Gau Vigyan Prachar Prasar Exam) असं या परीक्षेचं नाव आहे.

परीक्षेचा पॅटर्न कसा असेल? कशी कराल तयारी?

परीक्षेत केवळ वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातील. संपूर्ण अभ्यासक्रम राष्ट्रीय कामधेनु आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, गोमांसावरील अभ्यासाचे साहित्यही परीक्षेच्या तयारीसाठी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

का होत आहे परीक्षा?

वल्लभभाई कथिरीया म्हणाले की, ‘तरुण विद्यार्थ्यांमध्ये आणि इतर नागरिकांमध्ये गायीविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही परीक्षा सुरू केली जात आहे. या चाचणीमुळे गायींबद्दल लोकांमध्ये उत्सुकता वाढेल. बहुतेक लोकांना माहित नसलेल्या गायींच्या क्षमतेबद्दल त्यांना माहिती देण्यात येईल. गाईने दूध देणे बंद केले तरीसुद्धा, अन्य अनेक प्रकारे ती व्यवसायातील किती संधी देऊ शकते हे लोकांना कळू शकेल.’

या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या गुणवंत उमेदवारांना बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये राष्ट्रीय कामधेनू आयोग (RKA) ची स्थापना केली होती. हा आयोग मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. गायी आणि गोवंशाचा विकास, संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणे हे आयोगाचे उद्दिष्ट आहे.

सौर्स

म टा

Leave a Comment