Gramin Arogya Vibhag Bharti 2021

ग्रामीण आरोग्य विभाग भरती – ग्रामीण आरोग्य केंद्रांची हजारो पदे रिक्त

Gramin Arogya Vibhag Bharti 2021 – In rural Maharashtra, which has been hit the hardest by the Corona epidemic, rural people are dependent on inadequate health care. Health facilities are in short supply for more than 52 per cent of the rural population. As per the requirement, only 48 per cent community health centers, 79 per cent primary and 75 per cent sub-centers are functioning. There are also half the staff. Read More details at below

कोरोना महामारीत सर्वात जास्त फरफट झालेल्या महाराष्ट्रात ग्रामीण भागात राहणारे अपुऱ्या आरोग्य सेवेवर अवलंबून आहेत. गावात राहणाऱ्या ५२ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्येसाठी आरोग्य केंद्रे मोठ्या प्रमाणावर कमी आहेत. गरजेच्या तुलनेत ४८ टक्के सामुदायिक आरोग्य केंद्रे, ७९ टक्के प्राथमिक आणि ७५ टक्के उपकेंद्रेच सुरू आहेत. तेथेही निम्मेच कर्मचारी आहेत.

आरोग्य सेवेवरील सरकारकडील अधिकृत आकडेवारीनुसार ग्रामीण भागात सरासरी ६,०६३ लोकसंख्येला सगळ्यात खालच्या स्तरावरील आरोग्य सेवा म्हणजे एक उपकेंद्र उपलब्ध आहे. ३५२९५ लोकांच्या आरोग्याची जबाबदारी एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणि सरासरी २,३२,२१२ लोक फक्त एका सामुदायिक आरोग्य केंद्रावर आहे.

ग्रामीण आरोग्य आकडेवारीनुसार मार्च २०२० पर्यंत राज्यात ग्रामीण भागात एकूण १४१७० उपकेंद्रे असायला हवीत. पण प्रत्यक्षात १०६४७ सुरू आहेत. २३०९ प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज असताना फक्त १८२९ उपलब्ध आहेत. राज्यात सामुदायिक आरोग्य केंद्रांची संख्या २७८ होती. गरज होती ५७७ केंद्रांची. राज्यात गेल्या १५ दिवसात एकूण १९४ उपकेंद्रे आणि ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रे वाढवली गेली. पण १०४ सामुदायिक आरोग्य केंद्रे कमी  झाली.

अपुरी ग्रामीण आरोग्य व्यवस्था
पद                              कार्यरत     कमी    स्वीकृत पद
एएनएम                १२८०४         १९६२         १४७६६
डॉक्टर्स                    २८४८      ७३९            ३५८७
विशेषज्ञ चिकित्सक        ३९९           ७१३          १११२
आयुष चिकित्सक      ५९          २१९             २७८
रेऑडिलॉजिस्ट           १०४       १७४          २७८
फार्मासिस्ट                 १९५८    १४९             २१०७
प्रयोगशाळा तंत्रज्ञ     १५७४     ५३३              २१०७
परिचारिका               ३१६५     ६६९              ३८३४
आरोग्य सहायक       ३००५      ६५३            ३६५८


Gramin Arogya Vibhag Bharti 2021 – The Rural Health Department is important for the implementation of various schemes and first aid in the district. But there is number of vacant posts in Rural Health Department. There are 29 vacancies for officers and 404 vacancies for employees in the district. This has increased the work stress on them. This should be filled on Priority basis as per demand Of Employees in Health Department. Read Latest Update on  Gramin Arogya Vibhag Bharti 2021 at below:

ग्रामीण आरोग्य विभाग  ४३३ पदे रिक्त

Rural Health Department Bharti 2021– जिल्ह्यात विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासह प्रथमोपचार करण्यासाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणा महत्वाची असते. परंतु रिक्त पदांमुळे हीच ग्रामीण आरोग्य यंत्रणा आजारी पडल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात अधिकाऱ्यांची २९ तर कर्मचाऱ्यांची ४०४ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. यामुळे आहे त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे.

एएनएमच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त (Gramin Arogya Vibhag ANM Vacancy 2021)

जिल्ह्यात ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र तर २९७ आरोग्य उपकेंद्र आहेत. आरोग्य केंद्राच्या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी असणे बंधनकारक आहे. परंतु अनेक ठिकाणी केवळ एकच अधिकारी आहे. तर काही ठिकाणी एकही अधिकारी नसल्याने शेजारच्या डॉक्टरवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. असाच प्रकार उपकेंद्रांतील आहे. सध्या समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्त केले असले तरी एएनएमच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे सामान्यांना उपचार व सुविधा देण्%Aात यंत्रणा कमी पडत असल%5याचे दिसत आहे.

जिल्ह्यातील सर्व रिक्त पदे भरण्याची मागणी (Gramin Arogya Vibhag Recruitment 2021)

दरम्यान, जिल्हा स्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील केवळ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांचेच एकमेव पद भरलेले आहे. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, माता व बाल संगोपन अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, सहायक संचालक कुष्ठरोग अशी महत्वाची पदे रिक्त आहेत. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यांना मूळ पदभार सांभाळून हा अतिरिक्त पदभार सांभाळताना कामाचा ताण येत असल्याचे सांगण्यात आले. असाच प्रकार ग्रामीण भागातील आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मुख्यमंत्र्यांना आढावा, तर आरोग्य मंत्र्यांचे आश्वासन

कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्ह्यातील रिक्त पदांचा आढावा देण्यात आला होता. त्यांनी रिक्त पदे भरण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यानंतर आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिलेले आहे. याबाबत जाहिरातही काढली. परंतु याची कारवाई अतिशय संथ गतीने सुरू आहे.

ग्रामीण आरोग्य विभागात रिक्त पदांचा आकडा मोठा आहे, हे खरे आहे. अपुऱ्या मनुष्यबळावर काम करताना अडचणी येत आहेत. तसेच आहे त्यांच्यावरही कामाचा ताण वाढत आहे. असे असले तरी कोरोना काळात आहे त्याच मनुष्यबळावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी राबविल्या होत्या. रिक्त पदांबाबत वरिष्ठांना कळविलेले आहे.
डॉ.आर.बी.पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र – ५२
आरोग्य उपकेंद्र – २९७

2 thoughts on “Gramin Arogya Vibhag Bharti 2021”

Leave a Comment