10वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत सुसाट वेगानं जॉब्स; तब्बल 800 पेक्षा अधिक जागांसाठी भरती सुरु- ICF Railway Bharti 2022

ICF Railway Bharti 2022- Integral Coach Factory, ICF चेन्नई (ICF Railway Recruitment 2022 – pb.icf.gov.in) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Integral Coach Factory (ICF) Railway Recruitment 2022 Notification) जारी करण्यात आली आहे. विविध विभागांतील अप्रेंटीशीप या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2022 असणार आहे.

 • फिटर (Fitter)
 • वेल्डर (Welder)
 • कार्पेंटर (Carpenter)
 • पेंटर (Painter)
 • मशिनिस्ट (Machinist)
 • इलेक्ट्रिशियन (Electrician)

एकूण जागा – 876

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी गणित आणि विज्ञान विषयांसह 10वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

 • तसंच उमेदवारांकडे नॅशनल डेट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे.
 • तसंच इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा धारकांना या पदांसाठी अर्ज करता येणार नाहीये.
 • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार Stipend

 • फ्रेशर्स दहावी पास – 6000/- रुपये प्रतिमहिना
 • फ्रेशर्स बारावी पास – 7000/- रुपये प्रतिमहिना
 • फ्रेशर्स आणि नॅशनल सटिफिकेट होल्डर – 7000/- रुपये प्रतिमहिना

वयोमर्यादा

 • पदांसाठीच्या वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, 15 ते 24 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शिथिलता दिली जाईल.

असा करा अर्ज

सर्वप्रथम pb.icf.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर पोर्टलवर लॉगिन करा. आता नोटिफिकेशनवर दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचल्यानंतर अर्ज भरा आणि तुमचा फोटो आणि विनंती केलेली कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर अर्ज शुल्क जमा करा, जे ₹100 आहे. तर, भरतीची अधिसूचना पाहण्यासाठी, खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करा.

 

Leave a Comment