आर्मीत भरती व्हायचंय? ‘या’ ठिकाणी घ्या मोफत प्रशिक्षण !

Indian Army Bharti Free Training  – नाशिक जिल्ह्यातील तरुण- तरुणींसाठी मोफत निःशुल्क आर्मी भरती प्रक्रिया प्रशिक्षण शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त सिन्नर येथे करण्यात आले आहे. 16 सप्टेंबर 2022 ते 22 सप्टेंबर 2022 अशा 7 दिवसांचा प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे. तज्ज्ञ आणि सेवानिवृत्त सैन्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण शिबिर पार पडणार आहे. तरी जास्तीत जास्त तरुणांनी यात सहभाग नोंदवावा असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

 

आर्मीत भरती होण्यासाठी अनेक तरुण-तरुणी उत्साही असतात. ते मेहनत ही करतात. मात्र, त्यांना चांगल मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे ते भरती होत नाहीत आणि हाच विचार लक्षात घेता. आमदार कोकाटे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मोफत या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे आज ही नाशिक जिल्ह्यातील अनेक तरुण आर्मीत देशसेवेचे काम करत आहेत. मात्र नाशिक जिल्ह्यातील संख्या अजून वाढावी. जास्तीत जास्त तरुण भरती व्हावे हीच आमची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमंतिनी कोकाटे यांनी दिली आहे.

Leave a Comment