पोस्ट ऑफिसमध्ये मोठी भरती; पोस्टमनसह अनेक पदांसाठी परिपत्रक जारी!

Post Vibhag Bharti 2022 – पोस्ट विभाग, मुख्य पोस्टमास्टर जनरल, बिहार सर्कलनं त्यांची अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर 60 रिक्त पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार, या भरती प्रक्रियेतून पोस्टल / सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन आणि एमटीएस या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. ही भरती ‘स्पोर्ट्स कोटा’ अंतर्गत गुणवंत ‘खेळाडूं’च्या थेट भरतीसाठी आहे.

अधिकृत परिपत्रकानुसार, पोस्टल असिस्टंटची 31 पदं, सॉर्टिंग असिस्टंटची 11 पदं, पोस्टमनची 5 पदं आणि मल्टी टास्किंग स्टाफची 13 पदं रिक्त आहेत. पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून 12वी उत्तीर्ण झालेला असावा.

पोस्टमन पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 12वी उत्तीर्ण असावा आणि त्याला स्थानिक भाषेचं ज्ञान असावं. एमटीएस पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी उत्तीर्ण असावा. स्थानिक भाषेचंही ज्ञान असणं आवश्यक आहे. तसेच, या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, संबंधित क्रीडा पात्रता देखील असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय 31 डिसेंबर 2021 पासून मोजण्यात येईल.

For All Details & Apply Online Link Click Here

1 thought on “पोस्ट ऑफिसमध्ये मोठी भरती; पोस्टमनसह अनेक पदांसाठी परिपत्रक जारी!”

Leave a Comment