Indian Reserve Battalion Recruitment 2021

भारतीय राखीव बटालियनमध्ये कमांडन्ट ते कॉन्स्टेबलची ९७२ पदे रिक्त !

Indian Reserve Battalion Recruitment 2021 – According to the Police Department, there are about 60 vacancies in the Indian Reserve Battalion (IRB) from Commandant to Sub-Inspector of Police and a total of 972 vacancies. It is learned that the regulations required for recruitment of senior officers have not been prepared yet. Three units of IRB are operating in Goa. There are 972 vacancies in these three units from Commandant to Constable and other administrative staff. Read More details about Indian Reserve Battalion Recruitment 2021 at below:

IRB Bharti 2021 –  सरकारने नोकरभरतीची घोषणा केली आहे. पोलीस खात्यातही मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. या पार्श्वभूमीवर रिक्त पदांचा आढावा घेतल्यास पोलीस खात्याप्रमाणे भारतीय राखीव बटालियनमध्ये (आयआरबी) कमांडन्ट ते पोलीस उपनिरीक्षक या वरिष्ठ श्रेणीतील सुमारे ६० तर सर्व मिळून ९७२ पदे रिक्त आहेत.

आयआरबीच्या तीन तुकड्या गोव्यात कार्यरत आहेत. या तिन्ही तुकड्यांत कमांडन्ट ते कॉन्स्टेबल तसेच इतर प्रशासकीय कर्मचारी मिळून ९७२ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक ७२७ रिक्त पदे ही कॉन्स्टेबलची आहेत. ५० रिक्त पदे सहाय्यक उपनिरीक्षकांची, तर १२ रिक्त पदे हवालदार पदाची आहेत. याशिवाय ‘ए’ श्रेणी अधिकाऱ्यांची सर्व म्हणजे ३६ पदे रिक्त आहेत. ‘बी’ श्रेणी अधिकाऱ्यांचे ३६ पदे तर ‘सी’ श्रेणी अधिकाऱ्यांची ९०० पदे रिक्त आहेत. गोव्यात २००६ मध्ये आयआरबीची स्थापना झाली. त्यानंतर पहिली तुकडी २००६ मध्ये, दुसरी तुकडी २०१० मध्ये तर, तिसरी तुकडी २०१३ मध्ये सुरू करण्यात आली होती. एका तुकडीत अ, ब आणि क श्रेणी अधिकारी आणि कर्मचारी मिळून प्रत्येक १ हजार ७ पदे मंजूर करण्यात आली होती. यात एक कमांडन्ट, तीन उप कमांडन्ट, ७ उपअधीक्षक, ७ निरीक्षक, २३ उपनिरीक्षक, १८ साहाय्यक उपनिरीक्षक, १६० हवालदार, ६७५ कॉन्स्टेबल, एक वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचारी यांचा समावेश आहे. यांतील उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल यांची थेट भरती करण्यात आली होती. इतर पदे भरती नियमानुसार, बढती देऊन भरण्यास मान्यता देण्यात आली होती. तसेच इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांची थेट भरती करण्यात आली होती.

Leave a Comment