NMMS Scholarship Final Answer Sheet 2021

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना अंतिम उत्तरसूची जाहीर

NMMS Scholarship Final Answer Sheet 2021 – The final answer sheet of the Scholarship Scheme Examination for the National Economically Weak Students  for 8th standard conducted on 06 April 2021 has been announced on the website on Monday 28/06/2021. Appeared candidates can download it from below links

NMMS परीक्षा २०२०-२१  – घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना मंगळवार दि.०६.०४.२०२१ अंतिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक ०६ एप्रिल २०२१ रोजी इ. ८ वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in  व https://nmms.mscescholarshipexam.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MSCE Pune Result 2021

या परीक्षेच्या MAT व SAT पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे २३ एप्रिल २०२१ अखेरपर्यंत पाठविण्याबाबत १६ एप्रिल २०२१ रोजीच्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन, आक्षेप स्विकारले जाणार नाहीत, तसेच या परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जात नाही याची मुख्याध्यापकांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

MSCE Pune 8th Pass Result 2021

या अंतिम उत्तरसूचीनुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याची ही संबंधित मुख्याध्यापकांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२०-२१ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी)
माध्यम MAT SAT
मराठी MARATHI QP MAT MARATHI QP SAT
उर्दू URDU QP MAT URDU QP SAT
हिंदी HINDI QP MAT HINDI QP SAT
गुजराती GUJRATI QP MAT GUJRATI QP SAT
इंग्रजी ENGLISH QP MAT ENGLISH QP SAT
सिंधी SINDHI QP MAT SINDHI QP SAT
तेलगू TELUGU QP MAT TELUGU QP SAT
कन्नड KANNADA QP MAT KANNADA QP SAT

NMMS Scholarship Final Answer Sheet 2021 – राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची अंतिम उत्तरसूची

Leave a Comment