ISRO Bharti 2021

ISRO Bharti 2021 – Indian Space Research Organization (ISRO), has issued notification for Junior Research Fellow Posts. There is a total of 16 vacancies has been announced under ISRO Bharti 2021 . Candidates will be get selected on the basis of walk in interview which will be conducted from 22nd October 2021 To 26th October 2021. More information about ISRO Vacancy 2021 are as given below

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) मध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. इस्रोने कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. या अंतर्गत एकूण १६ पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करु इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट iirs.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचून त्यानुसार अर्ज करणे गरजेचे आहे. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल.

इस्रोने जाहीर केलेल्या नोटिफिकेशनननुसार प्रत्येक पोस्टसाठी एक विशिष्ट पोस्ट कोड निर्धारित करण्यात आला आहे. तसेच मुलाखतीच्या तारखा पोस्ट कोडनुसार दिल्या जात आहेत. जेआरएफ कोड ६६,६८,७०, ७१ साठी उमेदवारांची मुलाखत २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता होईल.

जेआरएफ कोड ६६ असलेल्या उमेदवारांची मुलाखत २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता घेण्यात येईल. दुसरीकडे जेआरएफ ६९ आणि ७४ कोडसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २७ ऑक्टोबर रोजी परीक्षेला हजर राहावे लागेल. या व्यतिरिक्त, इतर कोडसाठी मुलाखतीच्या तारखा उमेदवारांना अधिकृत नोटिफिकेशनवर पाहता येणार आहेत. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा नोटिफिकेशनमध्ये जाहीर करण्यात आली आहे.

मुलाखतीचे ठिकाण

JRF च्या कोडनुसार थेट मुलाखतीसाठी उमेदवारांना IIRS सिक्युरिटी रिसेप्शन, IIRSISRO/DOS, ४ कालिदास रोड, देहरादून-२४८००१ या पत्त्यावर येणे गरजेचे आहे. मुलाखतीसाठी जाताना उमेदवारांनी अर्जाची प्रत आणि संबंधित कागदपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे.

Leave a Comment