1 ते 22 डिसेंबर दरम्यान कोल्हापूरला सैन्य भरती होणार; खोत यांची माहिती

Kolhapur Army Rally 2021 – 2022 – राज्यातील सैन्यभरती ही गेल्या अनेक दिवसांपासून रखडली होती या संदर्भात पाठपुरवठा करण्यासाठी उपख्युमंत्री अजित दादा पवार साहेबांनी आम्हाला बोलवलं होतं आम्ही एक शिष्टमंडळ सोबत घेतलं होतं, सैन्य भरती (KolhapurArmy Rally 2021 – Military recruitment) बाबतची गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांना देखील हा विषय पटला आणि उपख्युमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांना तातडीने आदेश देण्याबाबत सूचना केल्या’ अशी माहिती आमदार सदाभाऊ खोत (MLA Sadabhau Khot) यांनी दिली. तसेच सैन्यभरती आता आपल्या राज्यामध्ये सुरू होईल 1 डिसेंबर ते 22 डिसेंबर कोल्हापूरला सैन्य भरती होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या पत्रामध्ये त्यांनी भरती प्रक्रिया करने किती गरजेचे आहे. तसेच ती करताना कोरोना बाबतची सर्व खबरदारी देखील घेऊ मात्र या भरती करायलाच हव्या मुलांच वय वाढत आहेत अनेक तरुणांची वयोमर्यादा संपल्यामुळे त्यांचे भविष्य अंधकारमय बनेल. तरी देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांच्या बाबतीत शासनाने तातडीने लक्ष घालावे. भरती प्रक्रियेबाबत अनेक तरुण आंदोलन करत आहेत. भविष्यात तीव्र आंदोलन होऊ शकते. आपण या सर्व बाबींचा सहानभूतीपूर्वक विचार करावा अशा विनंतीपर त्यांनी पत्र लिहल होत आता यावरती शासनाने सकारात्मकता दाखवली असून भरतीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

 

1 thought on “1 ते 22 डिसेंबर दरम्यान कोल्हापूरला सैन्य भरती होणार; खोत यांची माहिती”

Leave a Comment