KOO Vacancy 2021

स्वदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘कू’ (Koo) मध्ये मोठी भरती; अभियांत्रिकी, प्रॉडक्ट्स, कम्यूनिटीच्या लोकांना संधी

KOO Vacancy 2021 – Homegrown microblogging platform Koo expects to raise its headcount to over 500 people in the next one year, as it looks to hire across engineering, product and community management teams. Read More information about KOO Vacancy 2021, KOO Job Vacancy 2021, KOO Recruitment 2021, KOO Bharti at below

KOO Vacancy 2021

स्वदेशी किंवा भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘कू’ (Koo) पुढील एका वर्षात आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून 500 पर्यंत नेणार आहे. यासाठी कंपनी अभियांत्रिकी, प्रोडक्ट्स आणि कम्यूनिटी मॅनेजमेंटमध्ये लोकांना भरती करून घेण्याचा विचार करत आहे. ट्विटर (Twitter)  या सोशल मीडिया साईट स्वदेशी पर्याय म्हणून लोकांसाठी ‘कू’ सोशल मीडिया साईटला लोकांसमोर आणलं जात आहे. ‘कू’मध्ये सध्या 200 कर्मचारी कार्यरत आहेत.

KOO Recruitment 2021

कूचे सह-संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण म्हणाले, कंपनीमध्ये सध्या 200 कर्मचारी आहेत. अभियांत्रिकी, प्रोडक्ट्स आणि कम्यूनिटी मॅनेजमेंटसारख्या विभागांमध्ये नवीन नियुक्त्यांसह कर्मचारी वर्गाची संख्या पुढील एका वर्षात 500 पर्यंत पोहोचेल. या व्यतिरिक्त ही कू सोशल मीडिया कंपनी शासकीय संबंध, मार्केटिंग, ब्रँड मार्केटिंग सारख्या क्षेत्रात नवीन कर्मचारी भरती करणार आहे. परंतु, यामध्ये छोट्या टीम काम करतील. राधाकृष्ण म्हणाले, “आम्हाला चांगल्या आणि प्रतिभावंत लोकांना या कामासाठी घ्यायचे आहे. ते कूसाठी काम करू शकतात आणि भारतीय तंत्रज्ञानाला जागतिक पातळीवर घेऊन जाऊ शकतात.

KOO Bharti 2021

अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिदावत यांनी KOO सुरू केलं

अप्रमेय राधाकृष्ण आणि मयांक बिदावत यांनी गेल्या वर्षी सोशल मीडियावर व्यक्त होण्याबरोबरच भारतीय भाषांचा वापर करून एकमेकांच्या संपर्कात राहण्याच्या उद्देशानं कू KOO सुरू केलं. हे हिंदी, मराठी, तेलगू आणि बंगालीसह अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे.

Leave a Comment