Advertisement

Maha DFSL Internship Registration 2022

फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संधी, दरमहा इतके मिळेल विद्यावेतन

Maha DFSL Internship Registration 2022 : A decision was taken in the cabinet meeting held today to hire 150 forensic science and post-graduate students from the state’s forensic science institutes as interns on scholarships for a period of one year every year in various laboratories in the state under the Directorate of Forensic Science Laboratories. The meeting was chaired by Chief Minister Uddhav Thackeray. Know More about Maha DFSL Internship Registration 2022, DFSL Internship Application Form 2022, DFSL Internship Bharti 2022, DFSL Internship Recruitment 2022, Maharashtra Forensic Science Internship 2022

Government forensic science institutes are functioning in Mumbai, Aurangabad and Nagpur. There b. Essi and M. As there are not enough employment opportunities for Essay (Forensic Science) graduates, internships will be provided to 150 graduate and post graduate graduates from Forensic Science institutes every year by creating coordination between government forensic science institutes and forensic science laboratories.

Maha DFSL Internship Registration 2022

No Of Candidates 150
Qualification Forensic Science Degree and Post Graduate Degree
Stipend Ten thousand and fifteen thousand each per month respectively
Internship Period For a period of one year
Official Website dfsl.maharashtra.gov.in

Maharashtra Forensic Science Internship 2022

राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150 विद्यार्थ्यांना एक वर्ष कालावधीसाठी विद्यावेतनावर इंटर्न म्हणून घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था कार्यरत आहेत. तेथे बी. एस्सी व एम. एस्सी (फॉरेन्सिक सायन्स) पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने शासकीय न्यायसहायक विज्ञानसंस्था व न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्यामध्ये समन्वय निर्माण करून प्रतिवर्षी न्यायसहायक विज्ञान संस्थांमधील पदवी व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण 150 विद्यार्थ्यांना इंटर्नशिप उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

विद्यावेतन – DFSL Internship Application Form 2022

या सर्व विद्यार्थ्यांना एका वर्षाच्या इंटर्नशिप कालावधीत प्रतिमाह अनुक्रमे प्रत्येकी दहा हजार व पंधरा हजार विद्यावेतन देण्यात येणार आहे. राज्यातील तीन न्यायसहायक विज्ञान संस्थाकडून दरवर्षी विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात येईल. महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) यांच्या नियंत्रणाखाली हे विद्यार्थी राहतील.

या पदांवर होईल नेमणूक –

इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या विद्यार्थाना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये वैज्ञानिक सहायक (गट-क) व वैज्ञानिक सहायक (सायबर गुन्हे व तासी) (गट-क) या पदासाठी नेमून दिलेली कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडणे आवश्यक असेल. यशस्वीरीत्या इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाकडून प्रमाणपत्र देण्यात येईल.

Leave a Comment