Maharashtra Shikshak Bharti 2021

राज्यभरात शिक्षण विभागातील शेकडो जागा रिक्त

Maharashtra Shikshak Bharti 2021 – Primary and secondary education in the state is being administered by the officers in charge. More than 65% of the posts of Group Education Officer, Deputy Education Officer and Lecturer are vacant in the state. In such a situation, with the start of the new academic year, the planning of the new academic year will be at twelve o’clock. Apart from this, it is hampering the process of controlling the arbitrariness of unsubsidized, private schools, which is increasing the problems of parents and teachers.

राज्यातील शैक्षणिक प्रशासनातील संचालक, उपसंचालक, सहसंचालक, शिक्षणाधिकारी यांची ८८५ पदे मंजूर असून, ३०० अधिकारी आज कार्यरत आहेत, म्हणजेच तब्बल ५५५ पदे रिक्त असल्याची माहिती राज्य शिक्षक परिषदेकडून देण्यात आली आहे. याशिवाय गटशिक्षणाधिकाऱ्यांची ६६९ पदे मंजूर असून, केवळ २२७ पदे भरली असून, त्यातील ४८२ पदे रिक्त आहेत. राज्यातील शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची, सहायक उपशिक्षणाधिकाऱ्यांची ८०० हून अधिक पदे कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. उपशिक्षणाधिकारी (वर्ग २) पदोन्नतीसाठी पात्र व्यक्तींच्या फाईल चाचपडण्याचे काम गेली ३ वर्षे झाली शिक्षण आयुक्तालयात सुरू असल्याचा दावा मुंबई राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केला. २०१७ ,२०१९, २०२० या वर्षांमध्ये शिक्षण आयुक्तालयाने केवळ माहिती मागविली मात्र, पात्र व्यक्तींची यादी मंत्रालयात पोहोचलीच नसल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग ३ चे शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र असूनही त्यातही अद्याप केवळ दिरंगाईच सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई विभागाचा कारभार रामभरोसे

मुंबई विभागात एकूण 1804 खासगी शाळा असून अधिकारी वर्गाची मात्र वानवा आहे. त्यामुळे शाळांच्या फीसंदर्भातील तक्रारींचा निपटारादेखील होत नाही. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुंबई विभागीय शिक्षण मंडळात तर गेल्या कित्येक वर्षांपासून अध्यक्ष, सचिव, सहसचिव ही पदे रिक्तच असून या पदाचा कारभार प्रभारी आहे. मुंबई विभागात उपशिक्षणाधिकारी व सहाय्यक उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या 37 पैकी 31 पदे रिक्त आहेत.

 • मुंबई पश्चिम विभागात एक शिक्षण निरीक्षक पद मंजूर असून ते रिक्त आहे.
 • उपशिक्षणाधिकाऱ्यांची 6 पदे मंजूर असून एकाच पदावर अधिकारी कार्यरत आहे.
 • सहाय्याक शिक्षण उपनिरीक्षकांची 8 पदे मंजूर असून दोनच कार्यरत आहेत.
 • मुंबई उत्तर विभागात उपशिक्षणाधिकाऱ्यांची 6 पदे मंजूर असून यातील एकाही पदावर अधिकारी कार्यरत नाही.
 • सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षकांची सातही पदे रिक्त आहेत.
 • मुंबई दक्षिण विभागातही उपशिक्षणाधिकाऱ्यांची 5 पैकी एकच पद कार्यरत आहे.
 • सहाय्यक उपशिक्षणाधिकाऱ्यांची मंजूर 5 पैकी 2 पदेच कार्यरत आहेत.


जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार ४३५ जागा रिक्त

Maharashtra Shikshak Bharti 2021 – There are 23 thousand 435 vacancies for teachers in Zilla Parishad schools. This is having an effect on the Advanced Educational Maharashtra initiative. Check in which districts how much posts are vacant in Maharashtra Shikshak Bharti 2021

राज्यात एकीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाने गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार ४३५ जागा रिक्त आहेत. त्याचा परिणाम प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमावर  होत आहे. शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेतही अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.

खासगी अनुदानित शाळांत अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषदेच्या शाळेतील रिक्त पदांवर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, त्यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खासगी अनुदानित शाळांत अतिरिक्त झालेल्या शिक्षकाचे पद पुन्हा निर्माण झाल्यास त्या शिक्षकाचे समायोजन पुन्हा त्यांच्या मूळ शाळेत केले जाणार आहे.

राज्यातील हिंगोली, नांदेड, अकोला, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पहिली ते पाचवीच्या वर्गाचे एकही पद रिक्त नाही. मात्र, सहावी ते आठवीच्या वर्गासाठी असलेल्या शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत.

चंद्रपूर ७८१, हिंगोली ७४०, अकोला ७२१, नागपूर ५९८, गडचिरोली ५४१, अमरावती जिल्हात गटशिक्षणाधिकारी १४, शिक्षण विस्तार अधिकारी ३५, केंद्रप्रमुख १००, उच्चश्रेणी मुख्याध्यापक १००, विषय शिक्षक २६० सहायक शिक्षक ४२० यांचा समावेश आहे.

झेडपीच्या शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे एक हजारापेक्षा जादा पदे रिक्त असणारे जिल्हे
 • पहिली ते पाचवी : ८,२६१
 • सहावी ते आठवी : १४,९९५
 • नववी ते दहावी : १७९
 • पालघर : १,५१९
 • यवतमाळ : १,४०६
 • नाशिक : १,२८०
 • पुणे : १,२१५
 • नांदेड : १,१९७
 • जालना : १,१२५

Maharashtra Shikshak Bharti 2021 – Pavitra Portalt Shikshak Bharti 2021 Update : आताच प्राप्त बातमी नुसार पवित्र पोर्टलंतर्गत खासगी शाळांमधील मुलाखतीसह शिक्षक भरती एप्रिल-मेमध्ये होणार आहे. यात 950 खासगी शाळांमधील 3 हजार पदे भरण्यात येणार आहेत. या संदर्भातील पुढील अपडेट ल्व्क्रक उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

महाराष्ट्रात पवित्र  पोर्टलद्वारे (Pavitra Portal Bharti 2021) 12 हजार शिक्षकांची भरतीची घोषणा केली होती. उमेदवारांची बऱ्याचदा झालेली आंदोलने, पवित्र पोर्टलमधील तांत्रिक अडचणी, न्यायालयात दाखल झालेली प्रकरणे, धोरणात्मक बांबीवरील प्रलंबित निर्णय या अडथळ्यातून मार्ग काढत पाठपुरावा करत शिक्षण आयुक्‍त यांनी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू ठेवण्याला सतत प्राधान्य दिले आहे.

पहिल्या टप्प्यात मुलाखतीशिवायची गुणवत्तेवर आधारित शिक्षक भरती करण्यात आली. यात 5 हजार 970 उमेदवारांच्या शाळांमध्ये नियुक्‍त्यांसाठी शिफारस केल्या आहेत. यातील अपात्र, गैरहजर या कारणामुळे 1 हजार 500 उमेदवार प्रत्यक्षात शाळांमध्ये रुजू होऊ शकले नाहीत. माजी सैनिकांच्या जागांसाठी पुरेसे उमेदवार मिळालेच नाहीत. यामुळे या जागा कन्व्हर्ट करण्यात येणार आहेत.

सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गाच्या (एसईबीसी) आरक्षणातून शिक्षकांच्या जागा भरण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाने सामान्य प्रशासन विभागाला पाठवला आहे. मात्र, यावर अद्याप उत्तर आलेले नाही. त्यामुळे काही जागांच्या भरतीला अडचणी निर्माण झाल्या आहेत.
तसेच, दुसऱ्या टप्प्यात खासगी शाळांमधील शिक्षकांची भरती मुलाखती घेऊन करण्यात येणार आहे.


कोणी भरावे प्राधान्यक्रम

 • आता माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक पदासाठी प्राधान्यक्रम देता येईल.
 • ज्यांना यापूर्वी ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्याने उच्च माध्यमिकचे प्राधान्यक्रम आले नव्हते, परंतु त्यांनी पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण केली, त्यांना प्राधान्यक्रम भरता येईल.
 • तसेच माध्यमिक गटासाठी पदवीला ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्याने ज्यांना प्राधान्यक्रम आले नव्हते, त्यांनाही आता मुलाखतीसह पदाचे प्राधान्यक्रम भरता येणार आहे.
 • ज्यांनी यापूर्वीच मुलाखतीसह संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केले, त्यांना प्राधान्यक्रम देण्याची गरज नाही.

प्राथमिक शिक्षकांच्या १५६० जागा आता रिक्त आहेत. तर एकूण जाहीर केलेल्या १२ हजार १४० जागांपैकी पाच हजार ८२२ जागा अजून भरणे बाकी आहे.

3 thoughts on “Maharashtra Shikshak Bharti 2021”

Leave a Comment