ऊर्जा विभागात तब्ब्ल ३६ हजारांवर पदे रिक्त 

महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये या तब्ब्ल ३६ हजारांवर पदे रिक्त 

Mahavitaran Mega Bharti 2021 – In Maharashtra States Electricity Department there is almost 36 thousand vacant posts in all three companies under Department of Energy Maharashtra. Companies Like Mahaparesha, Mahavitaran and Mahanirmiti is in lack of number of employees. Read Below update on Mahavitaran Mega Bharti 2021 :

ऊर्जा विभागात तब्ब्ल ३६ हजारांवर पदे रिक्त 

या वीज कंपन्यांमध्ये नौकारभरती साठी  सुशिक्षित बेरोजगार वाट बघत असून पात्रता असून देखील संधी मिळत नाही. गेल्या ३ वर्षांपासून नौकर भरती झालेली नाही. अभियंता कर्मचाऱ्यांची ३६ हजार ७६४ पदे रिक्त आह. उमेदवार खाली दिलेल्या इमेज वरून अधिक माहिती वाचू शकतात…


Mahavitaran Bharti 2020 For 7000 Posts – नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महावितरण कंपनीत उप-केंद्र सहायक (२०००) व विद्युत सहायक (५०००) अशा तब्बल ७ हजार पदांची भरती करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत ही पदे तातडीने भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स. या भरती संदर्भातील पुढील माहिती आणि जाहिरात आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करू. 

महावितरणमध्ये अनेक पदे रिक्त असून, ही पदे भरण्याबाबत रेटा वाढला होता. याची दखल घेत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी २३ जून रोजी उपकेंद्र सहायक व विद्युत सहायकांची पदे भरण्याचे आदेश २३ जून रोजी दिले होते; परंतु कोरोना संकटाच्या पृष्ठभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती.

मंगळवार, ४ जून रोजी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी ही पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले.

भरती दोन टप्प्यात
महावितरणकडून ही भरती दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात उप-केंद्र सहायकांचे दस्तावेज तपासणी करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर विद्युत सहायक पदासाठीच्या परीक्षांचा निकाल जाहीर करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ७००० जागांची भरती असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग आणि कोविड प्रतिबंधात्मक नियमांच्या अधीन राहून ही पदभरती करण्यात यावी, असे निर्देश ऊजामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.

10 thoughts on “ऊर्जा विभागात तब्ब्ल ३६ हजारांवर पदे रिक्त ”

    • Sir i have done diploma in information technology and 4 year experience and also English and marathi typing so give me the permission to this job

      Reply

Leave a Comment

सरकारी नोकरी अपडेट्स व्हाट्सप्प वर मिळवा..