Mega Bharti 2022

Mega Bharti 2022 – There are about 250,000 vacancies in various government offices across the state. All these posts will be filled by the government on contract basis. The decision has been taken to reduce the burden on the exchequer. Therefore, the youth will get a great opportunity.

राज्यभरातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये सुमारे २ लाख ५० हजार पदे रिक्त आहेत. ही सर्व पदे सरकार कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. सरकारी तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तरुणांना यानिमित्ताने मोठी संधी मिळणार आहे.

सरकारी सेवांचे आऊटसोर्सिंग

महाविकास आघाडी सरकारने आर्थिक बचतीसाठी ही सर्व रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे २० ते ३० टक्के सरकारी खर्चात बचत होणार आहे. मात्र सरकारी कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. मात्र तरीही सरकार खर्च आटोक्यात आणण्यासाठी सरकारी सेवांचे आऊटसोर्सिंग करणार आहे.

कोणती पदे भरणार?

या सरकार भरतीत मंत्रालयीन विभागातील लिपीक, टंकलेखक, स्वीय सहाय्यक, लघु टंकलेखक, सर्व कार्यालयांमधील कनिष्ठ लेखापाल अशी पदे रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि गृह विभागातील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील १०० टक्के पदे ही सरळसेवा पद्धतीने भरण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता, मात्र आता ही पदेही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


Mega Bharti 2022 : 1 हजार 700 पदांसाठी लवकरच जाहिराती प्रसिद्ध होणार

Mega Bharti 2022 details : 15 thousand 390 posts have been received from various departments and 7366 posts have been submitted to the Maharashtra Public Service Commission for the recruitment process. About 300 advertisements have been published for 6,200 posts in the last six months and the recruitment process will be started soon by publishing advertisements for 1,700 posts, he said, adding that the Maharashtra Public Service Commission has done a good job in the last six months.

राज्यात शासकीय नोकऱ्यांमध्ये सरळसेवेच्या कोट्यात ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाचा मिळून 15 हजार 426 पदांचा अनुशेष असून हा अनुशेष भरुन काढण्यासाठी विशेष भरती मोहीम राबविण्यात येणार आहे.

त्यासाठी 14 आणि 22 फेब्रुवारी 2022 च्या पत्रान्वये सर्व प्रशासकीय विभागांकडून 31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या अनुशेषाच्या पदांची माहिती मागविण्यात आलेली आहे, असे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत सांगितले.

राहुल कुल, जयकुमार गोरे, प्रकाश आबिटकर आदी सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले की, विविध शासकीय विभागांसाठी एकूण 11 लाख 53 हजार 42 पदे मंजूर असून त्यातील 8 लाख 77 हजार 40 पदे भरलेली आहेत तर 2 लाख 3 हजार 303 पदे रिक्त आहेत.

राज्यात कोविड प्रादुर्भावाच्या दोन वर्षांच्या काळात पदांची भरती होऊ शकली नाही, मात्र आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठवून भरती प्रक्रियेला गती दिली आहे. गृह, आरोग्य आदी विभागांना देखील पद भरतीची परवानगी दिली असून भरती प्रक्रिया ताबडतोब राबवली जाणार आहे.

भरतीसाठी 15 हजार 390 पदांचे मागणीपत्र प्राप्त; 1 हजार 700 पदांसाठी लवकरच जाहिराती प्रसिद्ध होणार

शासकीय नोकऱ्यांमध्ये सरळसेवेच्या कोट्यातील भरती प्रक्रिया करण्यासाठी विविध विभागांकडून 15 हजार 390 पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले असून 7366 पदांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे. या सहा महिन्यात साधारणतः 6 हजार 200 पदांकरिता 300 जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून लवकरच एक हजार 700 पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करुन भरती प्रक्रिया राबविण्यात येईल असे सांगून गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उत्तम काम केले असल्याचेही राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले.


राज्यात तीन टप्प्यांत मेघा भरती -५० हजार पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार

Mega Bharti 2022 – Good news !! The number of vacancies is high in important departments of Maharashtra. Due to difficulties in implementation of various schemes, recruitment process for 50 vacancies in the state will be carried out in three phases after April. This includes 14,000 posts in the Water Resources Department, 12,000 posts in the Home Department and posts in other departments.

मेगा भरती 2022 महाराष्ट्र

मेगा भरती 2022 महाराष्ट्र : खुशखबर !!महाराष्ट्रातील महत्वपूर्ण विभागात रिक्त पदांची संख्या अधिक आहे. विविध योजनांची अंबलबजावणी करण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याने एप्रिलनंतर राज्यातील तीन टप्यात ५० हजार पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यात जलसंपदा विभागातील १४ हजार पदे गृह विभागातील साडे  बारा हजार पदे व अन्य विभागातील पदांचा समावेश आहे. 


शासकीय कार्यालयामध्ये  1517 मंजूर पदे असून त्यापैकी तब्बल 465 पदे रिक्त !  भरती कधी ?

Mega Bharti 2022 – While no recruitment has been done for the last few years, on the other hand, a large number of government officials and employees are retiring every year. As a result, there is a huge shortage of officers and staff in almost all government offices from Gram Panchayats to Municipal Councils, Tehsils, Panchayat Samiti, Police Stations. Due to insufficient number of officers and employees in government offices, work stress has increased and no work is being done on time. The people have to bear its undue hardship. Therefore, the general public is demanding that the government should fill the vacancies considering the public interest.

तालुकक्यातील विविध शासकीय कार्यालयामध्ये ( various government offices in Nandgaon )1517 मंजूर पदे असून त्यापैकी तब्बल 465 पदे रिक्त आहेत. परिणामी त्याचा फटका मनमाडसह नांदगाव तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना बसत असून किरकोळ कामांसाठी देखील शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

शासकीय कार्यालयांमधील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या अपुर्‍या संख्येमुळे कामाचा ताण वाढला असल्याने कोणतेही काम वेळेत होत नाही. त्याचा नाहक त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. यास्तव शासनाने जनहिताचा विचार करून रिक्त पदे भरावीत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

Mega Bharti 2022

Mega Bharti 2022

जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याची, त्यांना शासनाच्या सर्व सोयी-सुविधां आणि योजनांचा लाभ देण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणा व कार्यालयांवर असते. सध्या मनमाडसह नांदगांव तालुक्यातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत कर्मचार्‍यांची संख्या कमी पडत असल्याचे चित्र सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये निर्माण झाले आहे.

एकीकडे वाढत्या लोकसंख्येमुळे कामाचा वाढलेला बोझा तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात रिक्त झालेल्या जागा, त्यातच काही कर्मचारी नाशिकसह इतर शहरातून ये-जा करणारे असल्यामुळे ते वेळेवर कार्यालयात पोहोचत नाहीत. शिवाय शनिवार, रविवार सुट्टी व त्या व्यतिरिक्त सर्वधर्मियांचे सण, उत्सव साजरे करण्यासाठी देण्यात येणार्‍या सुट्ट्यामुळे जनतेची शासकीय कार्यालयातील कोणतीही कामे वेळेवर होत नाहीत.

प्रत्येक शासकीय कार्यालयात आधीपासूनच मंजूर असलेली कर्मचारी संख्या कमी असून त्यात मंजूर पदांपैकी निम्मे पदे रिक्त आहेत. यामुळे तहसील कार्यालयातून मिळणार्‍या शैक्षणिक दाखल्यांसह विविध कामासाठी लागणारे दाखले दिलेल्या मुदतीत मिळत नाहीत. भूमिअभिलेख कार्यालय असो की सरकारी दवाखाने किंवा नगरपरिषद; सर्वच ठिकाणी अधिकारी-कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत.

यामुळे कामांना गती मिळत नसून नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. जे अधिकारी-कर्मचारी आहेत ते देखील मनमानी पध्दतीने काम करीत असल्याने किरकोळ कामासाठीही आता लोकप्रतिनिधींपर्यंत जाण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे. काही विभागाचे कर्मचारी हे भरतीच्या दिवसापासून प्रतिनियुक्तीवर नाशिक येथे काम करतात. तेथेही ते काम करतात की नाही, हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. हे प्रकार कुठेतरी थांबले पाहिजेत.

नांदगांव तालुक्यातील तहसील कार्यालयापासून पोलीस स्टेशनसह सर्वच सरकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचार्‍यांकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात येतो. परिणामी नागरिकांची कामे प्रलंबित राहतात. याचाच काही लोक गैरफायदा घेऊन गोरगरीब जनतेकडून पैसे घेऊन कामे करतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे म्हणून आम्ही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे तालुक्यातील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी निवेदन देऊ. पदे भरली तरच नागरिकांना सुविधा मिळतील.

 


Mega Bharti 2022 :  Crowds of citizens are always seen for work in the offices of various government departments. Already the low number of officers and employees, including the growing number of citizens bringing their work in it, is increasing the stress on the officers and employees day by day. With about 40 per cent vacancies for government officials and employees in Nagpur division, work stress on employees has increased. About 1,08,157 posts have been sanctioned in Class ‘A’ and ‘D’ of Nagpur division. Therefore, there is a growing demand for filling up of vacancies in various departments through competitive examinations.

नागपूर विभागात सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची जवळपास ४० टक्के पदे रिक्त असल्याने कर्मऱ्यांवर कामाचा ताण वाढलेला आहे.

नागपूर विभागातील वर्ग ‘अ’ आणि ‘ड” मध्ये जवळपास १,०८,१५७ पदे मंजूर आहेत. यात वर्धा जिल्ह्यात ८,९२८, नागपूर जिल्ह्यात ४५,६५७, भंडारा- ८,३१७, गोंदिया -१२,०३६, गडचिरोली- १७,२०० तर चंद्रपूर जिल्ह्यात १६,०१९ पदे मंजूर आहेत. तर वर्ग ई मध्ये वर्धा- ५,१६२, नागपूर- ११,५६६, भंडारा- ४,६४१, गोंदिया- ५,३१६, गडचिरोली- ७,२२० तर चंद्रपूर जिल्ह्यात ७,५२६ पदे मंजूर आहेत.

एकूणच सर्व वर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नागपूर विभागात मंजूर असलेल्या पदांची संख्या १४९५८८ ऐवढी आहे. मात्र, वर्ग ‘अ’ आणि ‘ड” मिळून ६७, ५२३ पदे भरण्यात आलेली आहेत. तर ई वर्गात १७,१२४ पदे भरली आहे. यात वर्ग ‘अ’ आणि ‘ड” मध्ये वर्धा- ६,१५९, नागपूर-२८,६९०, भंडारा- ५,६०७, गोंदिया – ७,५७१, गडचिराली- १२,२७२ आणि चंद्रपूर जिल्ह्यात ७,२२४ पदे भरण्यात आली आहे. या सर्वच वर्गांत नागपूर विभागामध्ये ८४ हजार ६४७ पदे भरण्यात आलेली आहेत.

कंत्राटी पदेही रिक्त

विभागात बाह्य यंत्रणेमार्फत ४१४३१ पदे भरण्यास मंजुरी आहे. यातील १७१२४ पदे भरण्यात आली असून २४ हजार ३०७ पद रिक्त आहे.

नागरिक त्रस्त, अधिकारी व कर्मचारी तणावात

विविध सरकारी विभागातील कार्यालयांमध्ये कामांसाठी नागरिकांची गर्दी नेहमीच बघायला मिळते. आधीच अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमी संख्या, त्यात आपली कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या वाढत्या संख्येमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दिवसागणिक ताण वाढत चालला आहे. त्यामुळे विविध विभागात कमी असलेल्या रिक्त जागांची भरती स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून लवकरात व्हावी, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.


Mega Bharti 2022 – Applications for about 18,743 posts in 43 departments of the state government including Revenue, Agriculture, Animal Husbandry, School Education and Sports, Marathi Language, Public Health, Medical, Water Resources, Food and Civil Supplies will be sent to the Maharashtra Public Service Commission next week. After that, the recruitment process will start in November, said Dattatraya Bharane, Minister of State for General Administration.

राज्य सरकारच्या महसूल, कृषी, पशु संवर्धन, शालेय शिक्षण व क्रिडा, मराठी भाषा, सार्वजनिक आरोग्य, मेडिकल, जलसंपदा, अन्न व नागरी पुरवठा यासह एकूण 43 विभागांमधील जवळपास 18 हजार 743 पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पुढील आठवड्यात पाठविली जातील. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये भरती प्रक्रिया राबविली जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासनाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

राज्य शासनाच्या गृह विभागात जवळपास 29 हजार, आरोग्य विभागात 20 हजार 594, जलसंपदा विभागात 21 हजार, कृषी विभागात साडेचौदा हजार, महसूल विभागात 13 हजार तर शालेय शिक्षण व क्रिडा विभागात 8 ते 10 हजार, सार्वजनिक बांधकाम विभागात अंदाजित नऊ हजार पदे रिक्‍त आहेत. सद्यस्थितीत जवळपास अडीच लाख पदे रिक्‍त असून मागील काही वर्षांत त्याची भरतीच झालेली नाही. तत्कालीन फडणवीस सरकारने 70 हजार पदांची मेगाभरतीची घोषणा केली, परंतु पुढे काहीच झाले नाही. महाविकास आघाडी सरकारने जवळपास एक लाख पदांच्या भरतीची घोषणा केली, परंतु कोरोनामुळे ती होऊ शकली नाही.

दरम्यान, स्पर्धा परीक्षा निकालाच्या प्रतीक्षेतील पुण्यातील स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून जवळपास 15 हजार पदांची भरती होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यानंतर 30 सप्टेंबरपर्यंत सर्वच विभागांनी आयोगाला मागणीपत्र सादर करावीत, असा शासन निर्णय निघाला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही सप्टेंबरमध्ये तशा सूचना सर्वच विभागांना दिल्या. मात्र, अजूनपर्यंत मागणीपत्र न पाठविल्याने विद्यार्थी आक्रमक झाल्याचे चित्र आहे. त्यावर राज्यमंत्री भरणे म्हणाले, उच्चस्तरीय समितीमार्फत रिक्‍त पदांच्या आरक्षणाची पडताळणी केली जात असून पुढील आठवड्यात मागणीपत्र आयोगाला जातील.

राज्य शासनाच्या विविध विभागांमधील रिक्‍त पदांचे मागणीपत्र आयोगाला पुढील आठवड्यात सादर होतील. जवळपास 18 ते 19 हजार पदांची भरती आयोगामार्फत लगेचच राबविली जाईल. जेणेकरून सुशिक्षित तरुणांना नोकरी मिळेल.

– दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री, सामान्य प्रशासन

– राज्य सरकारच्या 43 विभागांमध्ये जवळपास अडीच लाख पदे रिक्‍त

– पहिल्या टप्प्यात ‘एमपीएससी’मार्फत 18 हजार 743 पदांची होईल भरती

– आठ दिवसांत सर्वच विभागांकडून आयोगाला जातील रिक्‍त पदांचे मागणीपत्र

– नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबविली जाईल भरती प्रक्रिया

– राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर टप्प्याटप्याने भरली जाणार रिक्‍त पद

 


Mega Bharti 2021 -शासकीय सेवेतील २९ विभागांत दोन लाख जागा रिक्त !!

Mega Bharti 2022 – Government services to the citizens are affected due to vacancies. Students and parents have to wait for at least two weeks for a simple income certificate at the tehsil office. There are two lakh 193 vacancies in 29 major departments of the government including direct service and promotion. There are 46 thousand 962 seats in Zilla Parishad. Read Below Information about vacant posts at Govt Department Bharti 2021, Mega Bharti 2021

शासनाच्या २९ प्रमुख विभागांमध्ये सरळसेवा व पदाेन्नतीच्या मिळून तब्बल दोन लाख १९३ जागा रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यात तब्बल ४६ हजार ९६२ जागा जिल्हा परिषदांमधील आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ते विशाल पांडुरंग ठाकरे यांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला रिक्त जागांबाबत माहिती मागितली हाेती. गेल्या १५ वर्षांत किती जागा भरल्या गेल्या, सध्या किती रिक्त आहेत, अशी विचारणा केली गेली. त्याचा अहवाल ६ सप्टेंबर २०२१ राेजी विशाल ठाकरे यांना प्राप्त झाला. त्यात रिक्त पदांचे हे वास्तव पुढे आले. शासनाने केवळ २९ विभागांची माहिती दिली. नगरपंचायत, नगरपरिषदा, महानगरपालिका, मंडळ, महामंडळे, उद्याेग व इतर विभागांची माहिती दिली गेली नाही. रिक्त पदांमुळे नागरिकांना मिळणाऱ्या शासकीय सेवा प्रभावित हाेत आहेत. तहसील कार्यालयात साध्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठीही विद्यार्थी व पालकांना किमान दाेन आठवडे प्रतीक्षा करावी लागत आहे.

आउटसाेर्सिंग, कंत्राटीवर जाेर 

राज्यात बेराेजगारी प्रचंड वाढली आहे. तरुणांना नाेकऱ्यांची प्रतीक्षा आहे. मात्र, शासनाचा  नव्या नाेकरभरतीऐवजी आउटसाेर्सिंग, कंत्राटी पद्धतीवर अधिक जाेर दिसताे. त्यातूनच निवृत्तांना पुन्हा कंत्राटी तत्त्वावर सेवेत सामावून घेतले जात आहे.

‘एमपीएससी’ची संथगती

सरळसेवा भरतीबाबतही राज्य लाेकसेवा आयाेगाची संथगती पहायला मिळते. काॅललेटर, प्रशिक्षण, परिवीक्षाधीन कालावधी याला बराच वेळ लागताे आहे. २०१८ला फाैजदार पदासाठी आयाेगाने जाहिरात काढली. २०१९ला निवड झाली. मात्र, दीड-दाेन वर्षांनंतर २०२१मध्ये त्या उमेदवारांना प्रशिक्षणाला पाठविण्यात आले आहे.

सर्वाधिक रिक्त जागा गृहविभागात

रिक्त असलेल्या दोन लाख पदांपैकी सर्वाधिक २४८७८ पदे एकट्या गृहविभागात आहेत. त्या खालाेखाल जलसंपदा २० हजार ८७३, तर सार्वजनिक बांधकाम विभागात २० हजार ५४४ पदे रिक्त आहेत. मृदा व जलसंधारण विभागात एकही पद रिक्त नसल्याची माहिती देण्यात आली.  रिक्त पदे २ लाख १९३ पदे सरळसेवेची रिक्त पदे १ लाख ४१ हजार ३२९ पदोन्नतीची रिक्त पदे ५८ हजार ८६४

जिल्हा परिषदांतील स्थिती

रिक्त पदे ४६,९६२ सरळसेवेची रिक्त पदे ४२,९७१ पदोन्नतीची रिक्त पदे ३,९९२

वर्गवारीनुसार रिक्त पदे  

अ वर्ग – १० हजार ५४४
ब वर्ग – २० हजार ९९९
क वर्ग – १ लाख २७ हजार ७०५
ड वर्ग – ४० हजार ९४४
एकूण  – २ लाख १९३

शासकीय सेवेतील पदे 

विभाग – २९
एकूण पदे –  १०,९९,१०४
सरळसेवेची पदे – ७,८०,५२३ पदे
पदोन्नतीची पदे – ३,१८,५८१
भरलेली एकूण पदे – ८,९८,९११


केंद्र सरकारच्या विविध विभागात तब्बल 8 लाख 72 हजार पदे रिक्त !!

Mega Bharti 2022- Corona has also lost millions of jobs. So, thousands of applications come in for 100 job vacancies. In that, if there is a government job, this number increases even more. However, in a reply to a question by Pension Minister Jitendra Singh in Parliament, shocking information has come to light, that the total number of vacancies in various departments of the Union Government till March 2020 is 8.72 lakh.

देशातील बेरोजगारीच्या आकड्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं सांगण्यात येत. विशेष म्हणजे कोरोनामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. त्यामुळे, नोकरीच्या 100 जागांसाठी हजारोंच्या संख्येने अर्ज येतात. त्यात, सरकारी नोकरी असेल तर ही संख्या आणखी वाढते. एमपीएससी परीक्षेच्या 300 ते 400 जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या 3 ते 4 लाखांच्या घरात असते. त्यामुळे, रोजगार ही मोठी समस्या बनली आहे. मात्र, संसदेत पेन्शनमंत्री जितेंद्रसिंह यांनी एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, मार्च 2020 पर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभागातील एकूण रिक्त पदांची संख्या 8.72 लाख एवढी आहे. केंद्र सरकारच्या सर्वच विभागातील मंजूर पदांची संख्या 40 लाख 4 हजार 941 एवढी आहे. त्यामध्ये, 31 लाख 32 हजार 698 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे, रिक्त पदांची संख्या 8 लाख 72 हजार 243, एवढी असल्याचे सिंह यांनी राज्यसभेत सांगितले. विशेष म्हणजे ही आकडेवारी मार्च 2020 पर्यंतची असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मंत्री सिंह यांनी 3 प्रमुख भरती एजन्सीद्वारे गेल्या 5 वर्षात करण्यात आलेल्या भरतींची आकडेवारी देण्यात आली. त्यानुसार, 2016-17 ते 2020-21 या कालावधीत युपीएससी 25,267 उमेदवारांची भरती केली आहे, तर स्टाफ सिलेक्शन कमिशनने 2 लाख 14, 601 उमेदवारांची भरती केली आणि रेल्वे बोर्डाने 2 लाख 4,945 उमेदवार भरती केले आहेत.


Mega Bharti 2021 – सरकारच्या रेल्वे, डाक अश्या ७७ विभागात नऊ लाखांवर पदे रिक्त !!

Mega Bharti 2021 – There are vacancies in important departments of Central Government. So Manu posts have not been filled in the last few years. It includes Important departments like Railway, Post, Health, Educational, Agriculture and Many More. Out of this, Railway and Postal Department have Most Number of vacant posts. As Per Collected data there is 9 Lakh 10 Thousand 153 Posts are vacant in this department Go through below information for More details:

केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत . यात रेल्वे व पोस्ट विभाग टॉपवर असून या रेल्वे विभागांमध्ये तब्बल २ लाख ८५ हजार २५८ कर्मचाऱ्यांचा तुडवडा आहे . तर डाक विभागात ९० हजाराहून अधिक पदे रिक्त असल्याचे पुढे आले आले. मंजूर पदे असूनही या विभागांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. रिक्त जागांमुळे या विभागातील कामे खोडांबली आहेत. हि पदे लवकरात लवकर भरणे अपेक्षित आहे ..

 

 


राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदातील जवळपास तीन लाखांहून अधिक पदे रिक्त !!

Mega Bharti 2021 – गेल्या काही वर्षांपासून राज्यातील रिक्त पदांचा आकडा वाढत असूनही राज्य शासनाकडून ही पदे भरण्यात आलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश गुज्जलवार यांनी माहिती अधिकारात वर्ग एक ते वर्ग चारच्या रिक्त पदांचा तपशील राज्य शासनाकडे मागितला होता. सामान्य प्रशासन विभागाने प्रशासकीय विभागांकडून माहिती संकलित करून त्या अर्जाला दिलेल्या उत्तरातून ३१ डिसेंबर २०१९ अखेर राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदांमध्ये २ लाखांहून अधिक पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आह

राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मिळून जवळपास तीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहे. माहिती अधिकारात डिसेंबर २०१९ पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार रिक्त असलेल्या पदांपैकी १ लाख ४१ हजार ३२९ पदे सरळ सेवेने, तर ५८ हजार ८६४ पदे पदोन्नतीने भरायची आहेत. २०२० आणि २०२१ या वर्षातही मोठ्या संख्येने शासकीय सेवेतील पदे रिक्त झाली आहे. हा आकडा ३ लाखापेक्षा जास्त आहे. अशात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी संधीच्या प्रतीक्षेत आहे.

माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदांमध्ये मिळून १० लाख ९९ हजार १०४ मंजूर पदे आहेत.

 • त्यातील ७ लाख ८० हजार ५२३ पदे सरळसेवेची
 • ३ लाख १८ हजार ५८१ पदे पदोन्नतीची आहेत.
 • त्यापैकी ८ लाख ९८ हजार ९११ पदे भरलेली आहेत.
 • तर २ लाख १९३ पदे अद्याप रिक्त आहेत.
 • त्यापैकी १ लाख ४१ हजार ३२९ पदे सरळसेवेने, तर ५८ हजार ८६४ पदे पदोन्नतीने भरायची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

एकूण रिक्त पदांपैकी राज्य शासकीय कार्यालयांची रिक्त पदे १ लाख ५३ हजार २३१, जिल्हा परिषदांची रिक्त पदे ६४ हजार ९६२ आहेत. सर्वाधिक २४ हजार ५८१ रिक्त पदे गृह विभागात असून, सार्वजनिक आरोग्य विभागात २० हजार ५४४, जलसंपदा विभागात २० हजार ८७३ पदे रिक्त आहे.

– बेरोजगारांना तात्काळ रोजगार द्यावा

सन २०१४ पासून पदभरती बंद केली आहे. एमपीएससी पॅनलवर सद्यस्थितीत ६ पैकी केवळ दोनच सदस्य कार्यरत आहे. त्यामुळे निकाल लावणे, परीक्षेसंदर्भात नियोजन करण्यास अडचणी येत आहे. महापरीक्षा पोर्टल बोगस असल्याने परीक्षा ऑफलाईन घेऊन पारदर्शक प्रक्रिया राबविण्यात यावी
मिलिंद वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते


खुशखबर !! नोकर भरतीवरील बंदी उठविल्याने सरकारी खात्यांमध्ये पद भरतीसाठी परीक्षा पुढच्या महिन्यात !

Mega Bharti 2021 – Good news !! The lifting of the ban on recruitment has paved the way for filling up vacancies in government departments as well as public companies, corporations and institutions. Read below information carefully

खुशखबर !!नोकर  भरतीवरील बंदी उठविल्याने सरकारी खात्यांबरोबरच सार्वजनिक कंपन्या, महामंडळ, संस्थांमधील रिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय अग्निशामक दल, आरोग्य विभाग तसेच इतर खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होणार नोकर भरती .

राज्य सरकारने नोकर भरतीवर घातलेली बंदी उठवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी असे स्पष्ट केले की, सरकारी खात्यांमध्ये वेगवेगळ्या पदांवर भरती करण्यासाठी जाहिराती काढण्यात आल्या आहेत. त्या पदांच्या लेखी परीक्षा येत्या जुलै महिन्यापासून घेतल्या जाणार आहेत.

Mega Bharti 2021

आता सरकारी खात्यांमध्ये मेगा भरती होणार !! राज्य सरकारच्या या नव्या निर्णयामुळे राज्यातील बेरोजगारांना दिलासा मिळणार आहे.


Mega Bharti 2021 -राज्यात शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद मिळून २ लाखांहून अधिक पदे रिक्त !! ही भरती प्रक्रिया कधी होणार ?

Mega Bharti 2021 – राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मिळून २ लाखांहून अधिक पदे रिक्त असल्याचे वास्तव उघड झाले आहे. रिक्त असलेल्या पदांपैकी १ लाख ४१ हजार ३२९ पदे सरळ सेवेने, तर ५८ हजार ८६४ पदे पदोन्नतीने भरायची आहेत. या रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया कधी होणार याची राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांना प्रतीक्षा आहे.

Mega Bharti 2021

शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद मिळून रिक्त पदांचा तपशील

 • अ वर्ग – १० हजार ५४५
 • ब वर्ग – २० हजार ९९९
 • क वर्ग – १ लाख २७ हजार ७०५
 • ड वर्ग – ४० हजार ९४४

गृह विभागात सर्वाधिक रिक्त पदे

सर्वाधिक रिक्त पदे असलेल्या विभागांमध्ये गृह विभाग आघाडीवर आहे. गृह विभागातील २४ हजार ५८१, सार्वजनिक आरोग्य विभागातील २० हजार ५४४, जलसंपदा विभागातील २० हजार ८७३ पदे रिक्त असल्याचे दिसून येत आहे.


Mega Bharti 2021 – ZP ते बांधकाम विभागात अडीच लाखांवर पदे रिक्त !!

Mega Bharti 2021 – There are vacancies in important departments of Zilla Parishad. Class I and Class II posts have not been filled in the last few years. Therefore, a letter has been sent to the government to fill these posts immediately to facilitate administrative work with the implementation of government schemes. There is almost two and Half lakh Government Posts are vacant. SO it is expected that in coming days this Mega Bharti 2021 will be implemented …

वर्ग एक व दोन मध्ये विविध रिक्त पदे 

जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये वर्ग एक व दोनमधील एक हजार 250 पदे रिक्‍त झाली आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना आणि नागरिकांचे प्रश्‍न सोडविताना, शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावाणी करताना प्रभारी अधिकाऱ्यांवर ताण येत आहे. या पार्श्‍वभूमीवर ही रिक्‍तपदे तत्काळ भरावीत, असे विनंतीपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शासनाला व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिले आहे. मात्र, त्यानुसार काहीच कार्यवाही न झाल्याने जिल्हा परिषदेने आता शासनाला स्मरणपत्र दिले आहे.

झेडपीच्या 142 शाळा मुख्याध्यापकांविना 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजारांहून अधिक शाळा आहेत. खासगी शाळांच्या तुलनेत झेडपी शाळांची पटसंख्या कमी होऊ लागली असून त्याठिकाणी दर्जा सुधारण्याची गरज आहे. मात्र, या शाळांमध्ये 596 शिक्षकांची पदे रिक्‍त असून त्यात विज्ञान, गणित, इंग्रजी या विषयांच्या शिक्षकांची सर्वाधिक संख्या आहे. दुसरीकडे 142 शाळांना मुख्याध्यापकच नाहीत, अशी विदारक स्थिती आहे. तरीही रिक्‍तपदांची भरती होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

जिल्हा परिषदेतील याच विभागातील तब्बल पाचशे पदे रिक्‍त

केंद्र व राज्य सरकारच्या घरकुल योजनांची अंमलबजावणीसह ग्रामीण विकासासंबंधीच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागास संचालक नाही. तर कुर्डूवाडी, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ व बार्शी या पंचायत समित्यांमध्ये सहायक गटविकास अधिकारीच नाहीत. बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक, उपशिक्षणाधिकारी, पशुधन विकास अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचा उपअभियंता, बांधकाम विभागात नऊ उपअभियंते, नऊ जलसंधारण अधिकाऱ्यांची पदे रिक्‍त आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचे सावट अद्याप संपलेले नसतानाही जिल्ह्याला साथरोग वैद्यकीय अधिकारी मिळू शकला नाही. अधिकाऱ्यांच्या तथा शासकीय वाहनांना 21 वाहनचालक नाहीत. आरोग्यसेवक, आरोग्यसेविकांची 156 पदे रिक्‍त झाली आहेत. पाच औषण निर्माण अधिकारी, 21 आरोग्य पर्यवेक्षकांची पदेही रिक्‍त आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील पदभरतीस वित्त विभागाने मान्यता देऊनही सोलापूर जिल्हा परिषदेतील याच विभागातील तब्बल पाचशे पदे रिक्‍त असूनही भरती प्रक्रिया सुरु झालेली नाही, हे विशेष.

 

झेडपीतील रिक्‍त पदांचा घोषवारा… 
प्राथमिक शिक्षक : 596
मुख्याध्यापक : 142
आरोग्य कर्मचारी : 405
पशुधन विकास अधिकारी : 41
बांधकामसह अन्य विभाग : 189
एकूण : 1,250

रिक्‍तपदे भरण्याची आहे गरज

जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या विभागांमधील पदे रिक्‍त झाली आहेत. मागील काही वर्षांत वर्ग एक व वर्ग दोनची पदे भरली गेली नाहीत. त्यामुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसह प्रशासकीय कामकाज करणे सोयीचे व्हावे म्हणून ही पदे तत्काळ भरावीत, असे पत्र शासनाला पाठविले आहे.


Maharashtra Mega Bharti 2021 – Good News, Mega Bharti 2021 is expected soon. The details & updates about this Bharti process are given below. We keep adding more details on this page so remember to BookMark this. For latest Recruitments please click on this link, so that you will get all details about Current Recruitment process. MahaIT declared that the final selection of companies will be proceed soon. The Mahapariksha Portal is already closed by Maharashtra Government, very soon the New Recruitment system will launched by State Government.

 • राज्यभरातील लाखो तरुणांचे भवितव्य अवलंबून असणारी सरळ सेवा भरती प्रक्रियेला गती मिळत आहे. या अंतर्गत होणारी कंपनी निवड अंतिम टप्प्यात असून, पुढील दोन दिवसात ही निवड होणार असल्याचे “महाआयटी’ (MahaIT) कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 • महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाचे (महाआयटी) व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोग यांनी कंपनी निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे आता सरसेवा पदभरती साठीची कंपनी निवड प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
 • यासंदर्भात “मनविसे’चे शहराध्यक्ष कल्पेश यादव याबाबत गेले 8 महिने पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी याबाबतचा लेखी खुलासा मागितला होता. हा खुलासा देताना महाआयटीने सध्याची स्पष्टता दर्शवली आहे. त्यामुळे लाखो तरुणांना दिलासा मिळाला आहे.
 • दरम्यान, राज्यात होऊ घातलेली मेगा भरती ही “महापोर्टल’मध्ये झालेल्या भ्रष्टाचारानंतर थांबवण्यात आली होती. त्यामुळे लाखो तरुण चिंतेत होते. या भरतीसाठी नवीन कंपनी निवडीचे काम “महाआयटी’कडे देण्यात आली आहे. ही कंपनी निवड जवळपास एक वर्षांपासून प्रलंबित आहे.
 • यासाठीच “मनविसे’ने यापूर्वी त्यांनी महाआयटी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर महाआयटीने त्यांना लेखी खुलासा देत पुढील दोन दिवसात अंतिम प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सांगितले.

2 thoughts on “Mega Bharti 2022”

Leave a Comment