Mahavitaran Mega Bharti 2022

विद्युत क्षेत्रातील तिन वीज कंपन्यात होणार 27000 हून अधिक रिक्त पदांवर भरती !

Mahavitaran Mega Bharti 2022 –  Good Opportunities for the Graduates!! There is Mega bharti under the Ministry of State Engery. There is around 27197 posts to be filled in  MSEDCL, Mahatransco and Mahanirmiti. In MSEDCL there is total 23712 vacancies for Technician, Assistant Engineer and Junior Engineer posts. In Mahatransco almost 1462 vacancies for Technician, Assistant Engineer and Junior Engineer posts. And in Mahanirmiti 1963 vacancies for Technician, Assistant Engineer and Junior Engineer posts.For more details keep visting the us…

राज्यात एप्रिल नंतर तीन टप्प्यांत मेघा भरती -५० हजार पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार

Maharashtra Urja Vibhag Bharti 2022

MSEB Recruitment 2022 Details | Mahavitaran Bharti 2022

महाराष्ट्रातील या कंपन्या मोठी भरती. महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती, नामांकित वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार महापारेषण, महावितरण आणि महानिर्मितीमध्ये एकूण 27000 हून अधिक पदे रिक्त आहेत. ऊर्जा राज्यमंत्र्यांना तंत्रज्ञ आणि अभियंता श्रेणीतील 27197 रिक्त जागा भरण्यास सांगितले जात आहे. महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या तीन कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. खाली दिलेल्या रिक्त पदांचे तपशील वाचा आणि आम्हाला भेट देत रहा.


Mahavitaran Mega Bharti 2022 – The Minister Nitin Raut directed to set up state-of-the-art training, research and development centers to update and train the manpower of the three power companies to meet the new changes and challenges in the power sector. He directed to set up an up-to-date and well-equipped training and research and development center at Nagpur, the state capital. It was attended by directors and senior officers of MSEDCL, Mahatransport and Mahanirmiti.

Maharashtra Urja Vibhag Bharti 2022

विद्युत क्षेत्रामध्ये होणाऱ्या नवीन बदलांस तसेच आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तिन्ही वीज कंपन्यांतील मनुष्यबळ अद्ययावत व प्रशिक्षित करण्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षण, संशोधन व विकास केंद्र निर्माण करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मानव संसाधन विभागाला दिले आहेत.

राज्याची उपराजधानी नागपूर येथे एक अद्ययावत आणि सुसज्ज असे प्रशिक्षण तथा संशोधन व विकास केंद्र निर्माण करावे, असे निर्देश त्यांनी नुकत्याच झालेल्या मानव संसाधन विभागाच्या आढावा बैठकीमध्ये दिले. यात महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांचे संचालक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ऊर्जा विभागांतर्गत एकूण ८५,००० अधिकारी व कर्मचारी कार्यरत

ऊर्जा विभागांतर्गत एकूण ८५,००० अभियंते, अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या गुणात्मक विकासासाठी अद्ययावत तसेच सर्व सोयींनी सुसज्ज असे प्रशिक्षण तथा संशोधन व विकास केंद्र निर्माण करून त्यांच्या सेवाकाळात नवनवीन तंत्रज्ञान याचे प्रशिक्षण देऊन राज्याच्या व त्या अनुषंगाने देशाच्या विकासात हातभार लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
ऊर्जा क्षेत्रामध्ये वेगाने होणाऱ्या घडामोडी पाहता त्यातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांच्यातील कौशल्य विकासाची गरज ओळखून त्यांच्या प्रशिक्षणाची व्याप्ती आणि दर्जावर भर देऊन त्यामध्ये भरीव वाढ करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

ऊर्जा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वित्त व लेखा विषयात पारंगतता आणणे व पर्यायाने त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांना नियमित प्रशिक्षण देण्याची गरज ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी अधोरेखित केली. त्याचप्रमाणे उर्जा विभागांतर्गत या तिन्ही कंपन्यांमध्ये सद्यस्थितीत असलेल्या प्रशिक्षण व्यवस्थेचा त्यांनी सखोल आढावा घेतला.

कंपनीमधील प्रशिक्षणाची व्यवस्था ही जागतिक दर्जाची असावी. सध्याची प्रशिक्षण व्यवस्था जागतिक दर्जाची करण्यासाठी त्या व्यवस्थेचा अभ्यास करून व कालबद्ध कार्यक्रम राबवून यथायोग्य प्रशिक्षण व्यवस्था ऊर्जा विभागासाठी तयार करायला हवी. आवश्यकतेनुसार या प्रशिक्षण व्यवस्थेअंतर्गत देशातील तसेच परदेशातील अभियांत्रिकी, व्यवस्थापन तसेच वित्त व लेखा विषयात काम करणाऱ्या नामांकित संस्थांबरोबर करार करण्यात यावा व पायाभूत तसेच विशेषज्ञ स्वरूपाचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत, असेही डॉ.राऊत यांनी सूचित केले.

प्रशिक्षण घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्याकरिता कंपनीने आपल्या स्तरावर कर्मचाऱ्याकरिता योजना आखाव्यातकिंबहुना, नियतकालिन प्रशिक्षण घेण्याची तरतूद कंपनी स्तरावर करावी. प्रशिक्षण न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्यमूल्यांकनात ह्यासंदर्भात विपरित नोंद घेण्याची यंत्रणाही कार्यान्वित करावी, असे त्यांनी यावेळी निर्देश दिले.

२ महिन्यांचे वर्गांतर्गत प्रशिक्षण आणि १ महिन्याचे प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था

ऊर्जा क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अशा प्रकारे तयार करण्यात यावे की, ते पुढील पदोन्नती व सरळसेवा भरतीद्वारे वरिष्ठ पदावर नियुक्त झाल्यानंतर त्या पदाच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडतील, अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. वीज क्षेत्रातील विशेष प्राविण्याची कामे, उदा.एचव्हीडीसी, एसएलडीसी, एसटीयू हॉटलाईन, एस/एसएम ऑटोमेशन आदींसाठी उच्च दर्जाच्या संस्थांच्या सहाय्याने विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करून कर्मचारी वर्गास प्रवीण बनविण्याचे ध्येय ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
त्यांनी पुढे असेही सूचित केले की, विशेष प्रावीण्याची कामे करण्याकरिता सुयोग्य कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांना दीर्घ मुदतीच्या प्रशिक्षणासाठी, ज्यामध्ये साधारणतः २ महिन्यांचे वर्गांतर्गत प्रशिक्षण आणि १ महिन्याचे प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था असेल, अशा प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात यावे.

या प्रशिक्षणामुळे प्रावीण्य असलेले अनेक कर्मचारी सातत्याने घडत राहतील व त्या अन्वये यंत्रणेतील अती महत्वाची पदे उदा. कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांवर योग्य व्यक्तीची पदस्थापना करण्यामध्ये व्यवस्थापनाला अडचण येणार नाही आणि पर्यायाने यंत्रणा सुरळीतपणे अखंडपणे व अविरत सुरू राहू शकेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

वीज क्षेत्रामध्ये काम करणारा प्रत्येक अभियंता, अधिकारी व कर्मचारी हे जागतिक पातळीवर होत असलेल्या विविध घडामोडीबाबत अनभिज्ञ असता कामा नये. या घडामोडी व बदलांचे त्यांना अद्ययावत आणि शास्त्रशुद्ध ज्ञान असावे यासाठी त्यांना वेळप्रसंगी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण देण्यात यावे अशी सूचना त्यांनी आढावा बैठकीत केली.
सोबतच त्यांनी ऊर्जा क्षेत्रातील घडामोडींबाबत कर्मचारी यांना कायम अद्ययावत माहिती मिळावी यासाठी त्यांना वेगवेगळी माध्यमे जसे की फेसबुक आणि ट्विटर इत्यादींवरील चर्चासत्रामध्ये सहभागी होण्यासाठी विविध नामांकित संस्थांचे सदस्यत्व घेण्यास तसेच परिषदा आणि परिसंवाद यामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश त्यांनी दिले.


महावितरणच्या तृतीय व चतुर्थ श्रेणीचे ३६९६ पदे रिक्त

Mahavitaran Mega Bharti 2022 – In Vidarbha, 3696 third and fourth class posts of MSEDCL are vacant. In such a situation, the Maharashtra State Electricity Workers Federation has opposed this as the management is threatening the employees to recover the electricity bill arrears. Vacancies place enormous work stress on employees. “However, we are opposed to the order to take action if the arrears recovery target is not met,” the union said in a statement. Know More about Mahavitaran Mega Bharti 2022 at below

Mahavitaran Mega Bharti 2022

विदर्भात महावितरणच्या तृतीय व चतुर्थ श्रेणीचे ३६९६ पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत व्यवस्थापनाकडून वीज बिल थकबाकी वसुलीसाठी कर्मचाऱ्यांना धमकावले जात असल्याने महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरनेशनने याचा विरोध केला आहे. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. असे असतानाही थकबाकी वसुलीचे लक्ष्य पूर्ण न झाल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे आम्ही याचा विरोध करीत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

MSEB Recruitment 2022 Details | Mahavitaran Bharti 2022

कंपनीचे प्रादेशिक संचालकांनी थकबाकी वसुलीमध्ये निष्काळजी केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे जाहीर केले आहे. फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी याचा विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मनुष्यबळाची कमतरता असूनही मार्च २०२१ पासून आतापर्यंत ८५४५ कोटी रुपयाची वसुली झाली. विदर्भात मागील दोन-तीन वर्षांपासून ३६९६ पदे रिक्त आहेत. परंतु व्यवस्थापन याकडे लक्ष देत नाही आहे. आधीच कर्मचाऱ्यांवर वीजपुरवठा व्यवस्थित व्हावा, याचा भर आहे. यातच थकबाकी वसुलीसाठीही दबाव टाकला जात आहे. एकेका कर्मचाऱ्यांवर १२ गावांची जबाबदारी देण्यात आली आहे.


महावितरणमध्ये तब्बल 26 हजार  अधिकारी-कर्मचाऱयांची पदे रिक्त !!

Mahavitaran Mega Bharti 2022 – MSEDCL, the largest power distribution company in the country, has 25,800 vacancies. With the number of retiring employees increasing day by day, on the other hand, the number of power consumers is increasing rapidly. This is increasing the stress on the existing employees. Read Below details

देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी अशी ओळख असलेल्या महावितरणमध्ये तब्बल 25 हजार 800 अधिकारी-कर्मचाऱयांची पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. निवृत्त होणाऱया कर्मचाऱयांमुळे त्यामध्ये दिवसागणिक भर पडत आहे, तर दुसरीकडे वीज ग्राहकांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेले कर्मचाऱयांवर ताण वाढतो आहे.

महावितरणचे राज्यभरात अडीच कोटी वीज ग्राहक असून त्यांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी 87 हजार 627 अधिकारी-कर्मचाऱयांची मंजूर पदे आहेत. या मंजूर पदांपैकी आज 68 टक्के कर्मचारी-अधिकारी कार्यरत असून जवळपास 32 टक्के पदे रिक्त आहेत. वर्ग-1 मध्ये 1676 पदे मंजूर असली तरी 230 पदे रिक्त आहेत. वर्ग-2 मध्ये 6433 मंजूर पदे असून त्यापैकी 708 पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱयांवर कामाचा ताण येत असल्याने कंत्राटी वीज कामगारांची मदत घ्यावी लागत असल्याचे महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.

रिक्त पदांमध्ये फिल्डवर काम करणाऱयांची मोठी संख्या

महावितरणमध्ये एकूण पदांच्या जवळपास 32 टक्के पदे रिक्त असली तरी त्यामध्ये प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱया कर्मचाऱयांची मोठी संख्या आहे. वर्ग एकमधील 17 टक्के, वर्ग दोनमधील 12 टक्के पदे रिक्त आहेत, तर वर्ग तीनमधील 34 टक्के तर वर्ग चारमधील रिक्त पदांचे प्रमाण 35 टक्के एवढे मोठे आहे. वर्ग तीन आणि चारमधील कर्मचारी प्रत्यक्ष फिल्डवर काम करत असून त्यांच्याच रिक्त पदांची संख्या मोठी आह


ऊर्जा विभागात 8500 जागांसाठी पदभरती लवकरच होणार !!

Mahavitaran Mega Bharti 2021 – MSEB’s Mahatransco department will soon be recruiting for 8500 posts. All the hurdles have been removed and the way for recruitment has been cleared. Read Below detail on Mahavitaran Mega Bharti 2021

कोरोनामुळे  संपूर्ण महाराष्ट्रात नोकरीसाठी उमेदवारांना वाट बघावी लागतेय. त्यात सरकारी नोकरीच्या जागाही (Government jobs) निघत नसल्यानं तरुणाईमध्ये नाराजीचं वातावरण आहे. मात्र आता MSEB च्या महापारेषण (Mahatransco) विभागात लवकरच तब्बल 8500 जागांसाठी पदभरती होणार आहे. यामध्ये येणारे सर्व अडथळे दूर झाले आहेत आणि पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊतांनी  दिली आहे.

महावितरण (Mahadiscom) , महापारेषण (Mahatransco) आणि महामात्रनिर्मिती (Mahagenco) या कंपन्यांमधील रिक्त पदाची भरती प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आलेली होती.

मात्र सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानं राज्यात भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती, असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. ‘परंतु यावर तोडगा काढण्यासाठी कंपन्यांचे उच्चाधिकारी या नात्यानं काय प्रयत्न केले’, असा प्रश्न विचारत डॉ. राऊत यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं.

आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महापारेषण कंपनीत तब्बल 8,500 जागांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पदभरतीची वाट बघत असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या सूचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी ;पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.


महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये या तब्ब्ल ३६ हजारांवर पदे रिक्त 

Mahavitaran Mega Bharti 2021 – In Maharashtra States Electricity Department there is almost 36 thousand vacant posts in all three companies under Department of Energy Maharashtra. Companies Like Mahaparesha, Mahavitaran and Mahanirmiti is in lack of number of employees. Read Below update on Mahavitaran Mega Bharti 2021 :

ऊर्जा विभागात तब्ब्ल ३६ हजारांवर पदे रिक्त 

या वीज कंपन्यांमध्ये नौकारभरती साठी  सुशिक्षित बेरोजगार वाट बघत असून पात्रता असून देखील संधी मिळत नाही. गेल्या ३ वर्षांपासून नौकर भरती झालेली नाही. अभियंता कर्मचाऱ्यांची ३६ हजार ७६४ पदे रिक्त आह. उमेदवार खाली दिलेल्या इमेज वरून अधिक माहिती वाचू शकतात…


Mahavitaran Bharti 2020 For 7000 Posts – नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महावितरण कंपनीत उप-केंद्र सहायक (२०००) व विद्युत सहायक (५०००) अशा तब्बल ७ हजार पदांची भरती करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत ही पदे तातडीने भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स. या भरती संदर्भातील पुढील माहिती आणि जाहिरात आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करू. 

महावितरणमध्ये अनेक पदे रिक्त असून, ही पदे भरण्याबाबत रेटा वाढला होता. याची दखल घेत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी २३ जून रोजी उपकेंद्र सहायक व विद्युत सहायकांची पदे भरण्याचे आदेश २३ जून रोजी दिले होते; परंतु कोरोना संकटाच्या पृष्ठभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती.

मंगळवार, ४ जून रोजी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी ही पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले.

भरती दोन टप्प्यात
महावितरणकडून ही भरती दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात उप-केंद्र सहायकांचे दस्तावेज तपासणी करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर विद्युत सहायक पदासाठीच्या परीक्षांचा निकाल जाहीर करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ७००० जागांची भरती असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग आणि कोविड प्रतिबंधात्मक नियमांच्या अधीन राहून ही पदभरती करण्यात यावी, असे निर्देश ऊजामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.

11 thoughts on “Mahavitaran Mega Bharti 2022”

    • Sir i have done diploma in information technology and 4 year experience and also English and marathi typing so give me the permission to this job

      Reply

Leave a Comment