महसूल विभागात पद रिक्त – Mahsul Vibhag Bharti 2021

मंत्रिमंडळाचा निर्णय -महसूल विभागातील रिक्त पदे भरणार

Mahsul Vibhag Bharti 2021 – The Cabinet also approved to cancel the Revenue Department Allocation Rules 2015 and to implement the notification of the new Revenue Department Allocation Rules 2021 for direct appointment and promotion of government officials in the state. Read Mahsul Vibhag Bharti 2021 updated at below

 रिक्त पदे समप्रमाणात भरणार

राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांना सरळसेवेने नियुक्ती तसेच पदोन्नतीच्या नियुक्तीसाठी महसूली विभाग वाटप नियम २०१५ रद्द करण्यास व नवीन महसूल विभाग वाटप नियम २०२१ ची अधिसूचना लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हे नियम अ आणि ब गटातील सर्व राजपत्रित व अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी असतील.

या अधिसूचनेची ठळक वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे – सर्व महसूली  विभागातील रिक्त पदे समप्रमाणात भरण्यात येतील.  एका महसूली विभागातील कालावधी किमान 3 वर्ष राहील.  एकल पालकत्व सिद्ध झालेल्या अधिकाऱ्यांना या नियमातून सूट देण्यात येईल. 30 पेक्षा कमी पदसंख्या असणाऱ्या संवर्गांना हे नियम लागू होणार नाहीत.

महसूली विभाग वाटप धोरणाच्या अंमलबजावणीत अडचणी येतात. त्याबाबत लोकप्रतिनिधी, प्रशासकीय विभाग तसेच, शासकीय अधिकारी संघटनांकडून निवेदनेही देण्यात आली आहेत.  त्यांचा विचार करून सध्याचा महसूल विभाग वाटप नियम 2015 रद्द करून, नवीन  महसूल विभाग वाटप नियम 2021 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 


Mahsul Vibhag Bharti 2021 – तालुक्यातील महसूल विभागातील रिक्त पदाची भरती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष हनुमंतराव मांढरे-पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

करमाळा महसूल कार्यालयात नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, अव्वल कारकून, तलाठी व लिपिक ही पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला आहे. करमाळा तालुक्याचे कार्यक्षेत्र विस्ताराने मोठे असून रिक्त पदाचा अतिरिक्त पदभार इतर अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे लोकांची कामे वेळेवर होत नाहीत. एका कामासाठी कार्यालयात नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचे निवेदनात कार्याध्यक्ष मांडरे-पाटील यांनी म्हटले आहे. करमाळा महसूल कार्यालयात रिक्त पदांची भरती त्वरित करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Department of Revenue Bharti 2021 : भौगोलिक विस्ताराने मोठा असलेल्या चंदगड तालुक्यातील तहसील कार्यालयात ३ नायब तहसीलदारांसह ३ मंडल अधिकारी, ४ तलाठी, ५ लिपीक, ३ शिपाई, १० कोतवाल व एक स्वच्छक अशी २९ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. तसेच कामे वेळेत न झाल्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना वेळेबरोबर आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कार्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. तालुक्यात वाड्या- वस्त्यांसह १७० गावांचा समावेश आहे. तालुक्याचे ठिकाण असलेले चंंदगड हे पश्चिमेला असल्याने शिवाय दळणवळणाची सोय नसल्याने कामासाठी येणारे विद्यार्थी, शेतकरी, नागरिकांना दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे.

Leave a Comment

सरकारी नोकरी अपडेट्स व्हाट्सप्प वर मिळवा..