महसूल विभागात पद रिक्त – Mahsul Vibhag Bharti 2022

Mahsul Vibhag Bharti 2022 – From 4th April  the employees of the sub-divisional office and the tehsildar’s office have started an strike in front of the tehsil office. Reason behind the strike is to fill the vacancies in the Revenue Department and also to give promotions to the employees and implement the old pension scheme.

Mahsul Vibhag Bharti 2022

Vijay Nevulkar, president of the revenue employees’ union, said that the employees of the revenue department have started an indefinite agitation to demand justice. Government in the tehsil office said. In this movement B.V. Adkine, Raju Thombre, Meghdoot, Dattatreya Salbarde, Anand Gaikwad, Dhol Singh Chavan, Raju Dhore, Rajendra Akhde and other employees have participated. The strike has affected the functioning of the government in the tehsil office but ordinary citizens are being affected.

महसूल विभागातील रिक्त पदे भरण्यात यावी तसेच कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी व जुनीच पेन्शन योजना लागू करण्यात यावी याकरिता उपविभागीय कार्यालयातील व तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ४ एप्रिलपासून तहसील कार्यालयापुढे बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी न्याय मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू केले असल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय नेवूलकर यांनी संगितले.  तहसील कार्यालयातील शासकीय यांनी सांगितले. या आंदोलनात बी.व्ही. अडकिने, राजू ठोंबरे, मेघदूत, दत्तात्रेय सालबर्डे, आनंद गायकवाड, धोलसिंग चव्हाण, राजू ढोरे, राजेंद्र आखडे आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत. कर्मचार्‍यांच्या संपामुळे तहसील कार्यालयात शासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे मात्र सामान्य नागरिकणा त्याचा फटका बसतो आहे.

 

 


Mahsul Vibhag Bharti 2022 – On behalf of the Maharashtra State Revenue Employees’ Union (MREU), there is a huge vacancy in the post of Revenue Assistant. As a part of the same, today the employees of Vaijapur tehsil office have been working with black ribbons. Also, a one-day symbolic strike will be held on 28.03.2022.

महसूल विभाग सर्वसामान्यांशी निगडित विभाग असून या विभागांतर्गत अनेक कामे केली जातात. ही कामे सहजतेने आणि बिनचूक झाली पाहिजेत, अशी शासनाची भूमिका आहे.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून 2024 पर्यंत विभागाच्या अनेक सुविधा ऑनलाइन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. या निर्णयामुळे नागरिकांची कामे सहज आणि सोप्या पद्धतीने होतील. त्याचबरोबर सातबारा नव्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा नवीन सातबारा ऑनलाइन उपलब्ध आहे. याचसह महसूल विभागातील रिक्त पदे भरण्याबाबतची प्रक्रिया सुरु असून लवकरच पदे भरली जातील, असेही थोरात यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने महसुल खात्यामधील महसुल सहाय्यकाची पदे मोठया प्रमाणावर रिक्त असल्याने सदरील पदे तात्काळ भरणेबाबत तसेच अव्वल कारकुन व मंडळ अधिकारी संवर्गातुन नायब तहसिलदार पदी पदोन्नतीची प्रकीया तात्काळ करावी या दोन मागण्यासाठी संपुर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने आदोलनाची भुमिका जाहीर केली आहे. त्याचाच एक भाग म्हणुन आज वैजापुर तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काळया फिती लावुन कामकाज केले आहे. तसेच दि.28.03.2022 रोजी एक दिवसीय लाक्षणीक संप करण्यात येणार आहे.


राज्यात १ ऑगस्ट पासून नवीन सातबारा -महसूल विभागाच्या आणखी ३ नव्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार !!

Mahsul Vibhag Bharti 2022 – On the backdrop of Revenue Day, from August 1, three more new online facilities of the Revenue Department will be available to the people of the state. So far, digital signatures have been made available in Satbara, from now on, digitally signed changes, new Satbara and changes in income sheets will also be made available online.

महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर येत्या १ ऑगस्ट पासूनच राज्यातील जनतेला महसूल विभागाच्या आणखी तीन नवीन ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये आता पर्यंत डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उपलब्ध करून देण्यात आला असून, यापुढे डिजिटल स्वाक्षरीत फेरफार,  नवीन सातबारा आणि मिळकत पत्रकांचे फेरफार देखील ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या तिन्ही नवीन सुविधांचा शुभारंभ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

दैनंदिन कामासाठी लागणारा सातबारा , आठ अ चा उतारा, फेरफार,  प्रॉपर्टी कार्ड फेरफार सहज व विना हेलपाट्याशिवाय मिळण्यासाठी शासनाने डिजिटल सातबारा प्रकल्प सुरू केला. राज्यात गेल्या दीड-दोन वर्षांपासून ऑनलाईन व डिजिटल सातबारा दैनंदिन व्यवहारात वापरण्यात येत असून , दिवसाला तब्बल एक लाख डिजिटल स्वाक्षरीत सातबारे वापरले जात आहेत. या येत्या १ ऑगस्ट पासून डिजिटल स्वाक्षरीत सातबा-यासोबतच डिजिटल स्वाक्षरीत फेरफार देखील नागरिकांना घर बसल्या उपलब्ध होणार असल्याचे या प्रकल्पाचे राज्याचे समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले.

राज्यात सन २०१५ -१६ पासून ऑनलाईन फेरफार मोहिम सुरू करण्यात आली. यात आतापर्यंत राज्यातील १ लाख ३६ हजार फेरफार ऑनलाईन करण्यात आले असून, १ कोटी १८ हजार फेरफार डिजिटल स्वाक्षरीत उपलब्ध आहेत. आता हे सर्व फेरफार डिजिटल स्वाक्षरीत ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

राज्यात १ ऑगस्ट पासून नवीन सातबारा 

राज्यातील सातबा-यात तब्बल पन्नास वर्षानंतर बदल करण्यात आले आहे. नवीन सातबारा साधा, सहज समजेल व सुटसुटीत संगणकीय सातबा-याच्या गरजा व सर्वसामान्य नागरिकांना सहज समजेल अशा भाषेत हा सातबार तयार केला आहे. राज्यातील सर्व २ कोटी २५ लाख सातबारे नवीन बदलासह तयार झाले असून, नागरिकांना १ ऑगस्ट पासून नवीन सातबारा उपलब्ध होणार आहे. याशिवाय मिळकत पत्रकांचे फेरफार ऑनलाईन मिळणार आहेत.


मंत्रिमंडळाचा निर्णय -महसूल विभागातील रिक्त पदे भरणार

Mahsul Vibhag Bharti 2022 – The Cabinet also approved to cancel the Revenue Department Allocation Rules 2015 and to implement the notification of the new Revenue Department Allocation Rules 2021 for direct appointment and promotion of government officials in the state. Read Mahsul Vibhag Bharti 2021 updated at below

 रिक्त पदे समप्रमाणात भरणार

राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांना सरळसेवेने नियुक्ती तसेच पदोन्नतीच्या नियुक्तीसाठी महसूली विभाग वाटप नियम २०१५ रद्द करण्यास व नवीन महसूल विभाग वाटप नियम २०२१ ची अधिसूचना लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हे नियम अ आणि ब गटातील सर्व राजपत्रित व अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी असतील.

या अधिसूचनेची ठळक वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे – सर्व महसूली  विभागातील रिक्त पदे समप्रमाणात भरण्यात येतील.  एका महसूली विभागातील कालावधी किमान 3 वर्ष राहील.  एकल पालकत्व सिद्ध झालेल्या अधिकाऱ्यांना या नियमातून सूट देण्यात येईल. 30 पेक्षा कमी पदसंख्या असणाऱ्या संवर्गांना हे नियम लागू होणार नाहीत.

महसूली विभाग वाटप धोरणाच्या अंमलबजावणीत अडचणी येतात. त्याबाबत लोकप्रतिनिधी, प्रशासकीय विभाग तसेच, शासकीय अधिकारी संघटनांकडून निवेदनेही देण्यात आली आहेत.  त्यांचा विचार करून सध्याचा महसूल विभाग वाटप नियम 2015 रद्द करून, नवीन  महसूल विभाग वाटप नियम 2021 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 


Mahsul Vibhag Bharti 2021 – तालुक्यातील महसूल विभागातील रिक्त पदाची भरती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष हनुमंतराव मांढरे-पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

करमाळा महसूल कार्यालयात नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, अव्वल कारकून, तलाठी व लिपिक ही पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला आहे. करमाळा तालुक्याचे कार्यक्षेत्र विस्ताराने मोठे असून रिक्त पदाचा अतिरिक्त पदभार इतर अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे लोकांची कामे वेळेवर होत नाहीत. एका कामासाठी कार्यालयात नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचे निवेदनात कार्याध्यक्ष मांडरे-पाटील यांनी म्हटले आहे. करमाळा महसूल कार्यालयात रिक्त पदांची भरती त्वरित करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Department of Revenue Bharti 2022 : भौगोलिक विस्ताराने मोठा असलेल्या चंदगड तालुक्यातील तहसील कार्यालयात ३ नायब तहसीलदारांसह ३ मंडल अधिकारी, ४ तलाठी, ५ लिपीक, ३ शिपाई, १० कोतवाल व एक स्वच्छक अशी २९ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. तसेच कामे वेळेत न झाल्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना वेळेबरोबर आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कार्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. तालुक्यात वाड्या- वस्त्यांसह १७० गावांचा समावेश आहे. तालुक्याचे ठिकाण असलेले चंंदगड हे पश्चिमेला असल्याने शिवाय दळणवळणाची सोय नसल्याने कामासाठी येणारे विद्यार्थी, शेतकरी, नागरिकांना दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे.

There are 29 vacancies in Chandgad taluka tehsil office including 3 deputy tehsildars, 3 divisional officers, 4 talathis, 5 clerks, 3 sepoys, 10 kotwals and one cleaner. These vacancies put extra workload on the available staff. Also, due to untimely completion of works, citizens and students have to bear financial burden with time. Therefore, there is a demand from the farmers that the vacancies in this office should be filled immediately. The taluka consists of 170 villages with hamlets. Chandgad, which is the seat of the taluka, is in the west, and due to lack of transportation facilities, students, farmers and citizens have to wait all day.

Leave a Comment