Mumbai Govt And Private Hospital Bharti 2022

राज्यातील सरकारी रुग्णालयांत डॉक्टरांची तब्बल इतके पदे रिक्त !!

Mumbai Govt Bharti 2022 : Specialist doctors, who carry out important responsibilities from delivery to care of babies, are now seen to be in government hospitals only for medicine. As many as 75 per cent vacancies for gynecologists, pediatricians and ophthalmologists are vacant in hospitals across the state. It is seen that only 170 specialists have been appointed in many hospitals. Some of them do not even return to the hospital for months. Therefore, there is a situation where pregnant and young children are suffering without treatment.

It is necessary to appoint gynecologists, pediatricians and ophthalmologists in government hospitals for the purpose of providing proper treatment and counseling to women and children. Accordingly, 676 specialist posts have been secured in the last few years. However, it seems that the health department has not been able to fill 506 of these posts. It has also been revealed that pregnant women die due to untimely delivery due to untimely delivery.

प्रसूतीपासून ते लहान मुलांची काळजी घेण्यापर्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे तज्ज्ञ डॉक्टर आता सरकारी रुग्णालयांत औषधापुरतेच राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यभरातील रुग्णालयांत स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नेत्र शल्य चिकित्सकांच्या तब्बल ७५ टक्के जागा रिक्त आहेत. अनेक रुग्णालयांत जेमतेम १७० तज्ज्ञांची नेमणूक झाल्याचे दिसून येते. त्यातील काहीजण तर महिनोंमहिने रुग्णालयात फिरकत देखील नाहीत. त्यामुळे गर्भवती आणि लहान मुलांचे उपचाराविना हाल होत असल्याची परिस्थिती आहे.

कोरोना साथीच्या काळात स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध न झाल्याने प्रसूती गुंतागुतीची असूनही गभर्वतीला घरीच राहावे लागल्याची उदाहरणे पुढे आली आहेत. या काळात महिला, मुली आणि बालकांच्या आरोग्याकडे स्थानिक आरोग्य खात्याचे दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी आहेत. गंभीर बाब म्हणजे, अशा घटनांत न्यायालयात याचिकाही दाखल झाल्या आहेत. आरोग्य संचालकांकडील ही माहिती फेब्रुवारी २०२२ मध्ये जाहीर झाली असून, ही पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाहीच्या घोषणा कागदोपत्री राहिल्याचे दिसून येते.

महिला, लहान मुलांच्या आरोग्याच्या समस्यांवर लक्ष ठेवून, योग्य उपचार करणे, सल्ला देण्याच्या उद्देशाने सरकारी रुग्णालयांत स्त्रीरोग, बालरोग, नेत्र शल्य चिकित्सकांची नेमणूक आवश्यक असते. त्यानुसार गेल्या काही वर्षांत ६७६ तज्ज्ञांच्या जागा निश्चित झाल्या. मात्र, यापैकी ५०६ जागा भरण्यासाठी आरोग्य खात्याला सवडच मिळाली नसल्याचे दिसत आहे. प्रसूती वेळेत न झाल्यापासून नेमक्या उपचारांअभावी गर्भवतींचा मृत्यू झाल्याचे प्रकारही उघड झाली आहेत. सरकारी रुग्णालयात तज्ज्ञ नसल्याने प्रसुतीसाठी गर्भवतींना खासगी रुग्णालयात जावे लागते.अशा रुग्णालयांचा खर्च परवडत नसल्याच्याही तक्रारी आहेत.

खर्चातील कपातीमुळे समस्या

आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याची हमी देणाऱ्या यंत्रणांनी स्त्रीरोग, बालरोगतज्ज्ञांची ५० टक्के पदेही भरलेली नाहीत. आरोग्य खात्यातील पदे भरण्याबाबत पाठपुरावा करूनही त्याकडे काणाडोळा केला जात आहे. आरोग्याच्या खर्चात कपात करण्याच्या प्रयत्नांमुळेच या खात्याकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाले नसल्याचे ‘समर्थन’ (अर्थसंकल्प अध्ययन केंद्र) केंद्राचे विश्‍लेषक रूपेश कीर यांनी सांगितले.

एक हजार १६४ मातामृत्यू

राज्यात डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत एक हजार १६४ मातामृत्यू झाले आहेत. या आकड्यांत मुंबई, नागपूरसह बीड, नांदेड, रायगड जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रसुतीआधीच्या तपासण्यांत सातत्य नसल्याने देखील माता मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या घटनांबाबत आरोग्य विभाग पुरेसा गंभीर नसल्याचे दिसून येते.


Mumbai Govt And Private Hospital Bharti 2022– On-the-job training on health will be provided in government and private hospitals in Mumbai. The recruitment will be done through the State Government’s Mumbai City District Skill Development, Employment, Entrepreneurship Guidance Center. Training will be conducted free of cost in Mumbai City only Know More about Mumbai Govt And Private Hospital Bharti 2021, Mumbai PMKVY Registration Form 2022 at below

Mumbai Govt And Private Hospital Bharti 2022

Trained manpower is being imparted to the youth in the age group of 18 to 45 years who wish to work in the health sector by imparting free training in selected courses in the health sector in government and reputed private hospitals in Mumbai city district. After the completion of the training, on-job training will also be given and scholarships will be given during this period. Interested persons should apply for this, appealed Chhaya Kubal, Assistant Commissioner, Mumbai City District Skill Development, Employment, Entrepreneurship Guidance Center.

आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या १८ ते ४५ वर्षे वयोगटातील युवक-युवतीना मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय व नामांकित खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्य क्षेत्रातील निवडक अभ्यासक्रमांमध्ये विनाशुल्क प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऑन जॉब ट्रेनिंगही देण्यात येणार असून या कालावधीत विद्यावेतन देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजगता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त छाया कुबल यांनी केले आहे.

  • मुंबईतील शासकीय, खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्यविषयक ऑन जॉब ट्रेनिंगची संधी
  • प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऑन जॉब ट्रेनिंगही देण्यात येणार
  • या कालावधीत विद्यावेतनही देण्यात येणार आहे

सद्यस्थितीत कोरोना प्रादुर्भावामुळे आरोग्य व वैद्यकीय सेवा क्षेत्रात विशेषत: पॅरामेडिकल व हेल्थकेअर विषयक आवश्यक कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याने केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना विशेष प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु केली आहे. प्रशिक्षण योजनेत प्रवेश घेण्याकरिता इच्छुकांनी

Mumbai PMKVY Registration Form 2022

https://docs.google.com/forms/d/1TaeY0k_DLf_VWbYkpag4XK6ffngk-QolUogJgeiL3OU/edit या लिंकवरुन नोंदणी करावी. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहील. अधिक माहितीकरीता इच्छुक उमेदवारांनी दुरध्वनी क्रमांक (०२२) २२६२६३०३ किंवा ९०२९५६६३९३ यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

2 thoughts on “Mumbai Govt And Private Hospital Bharti 2022”

Leave a Comment