Naib Tahsildar Bharti 2022 : अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील नायब तहसीलदारांची १६० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे मंडळ अधिकारी यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण वाढून कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. त्याच बरोबर नागरिकांची संवैधानिक कामे मनुष्य बळाअभावी प्रलंबित तथा खोळंबून राहत आहेत. त्यांच्या कामात दिरंगाई होत आहे नागरिकांचा शासन व प्रशासनावर प्रचंड रोष निर्माण होत आहे..
अमरावती सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या तहसील कार्यालयात नागरिकांची ससेहोलपट सुरू आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १६० पेक्षा अधिक नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत.
ही पदे सेवाज्येष्ठ मंडळ अधिकारी व अव्वल कारकून यांच्यामधून भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. परंतु, अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाचे अडेलतट्टू धोरण व दप्तर दिरंगाईमुळे चार महिन्यांपासून पदे भरली गेली नसल्याचे पुढे आले आहे.
: : महत्वपूर्ण नवीन जाहिराती : :
✅राष्ट्रीय सहकारी बँक लि, मुंबई अंतर्गत ग्रॅजुएट उमेदवारांसाठी नोकरीची संधी; ऑनलाइन अर्ज करा
✅१० वी उत्तीर्णास संधी - भारतीय डाक विभागांतर्गत 38920+ पदांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज सुरु
✅राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा येथे 110+ पदांवर भरती; नवीन जाहिरात
✅10वी, 12वी उमेदवारांना सैन्य कल्याण शिक्षण संस्था HQ दक्षिणी कमांड पुणे अंतर्गत नोकरीची संधी
✅ महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती, नवीन जाहिरात
तत्काळ निर्णयाच्या अंमलबजावणीकरिता नायब तहसीलदार पदावर सेवाज्येष्ठ मंडळ अधिकारी व अव्वल कारकून यांना नियुक्ती देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी महासंघाच्यावतीने अध्यक्ष विजयकुमार चौरपगार, कार्याध्यक्ष बी.ए. राजगडकर, महासचिव प्रल्हाद धुर्वे, कोषाध्यक्ष विश्वास दंदे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनात केली आहे