Part 2 11th Admission Nashik, Nagpur, Pune mumbai 2020

Part 2 11th Admission Nashik, Nagpur, Pune Mumbai 2020 is started now. The Candidates applied for the 11th Admission process 2020 – 2021 can now Fill up the second phase Form Section Online. You must enter the required details carefully. Also follow the instructions carefully. The First Merit List of 11th Admission will be declared on 30th August 2020. The Secon Round Details & updates are given here. 

अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे पहिल्या गुणवत्ता यादीपर्यंतचे वेळापत्रक शिक्षण संचालनालयाने अखेर सोमवारी जाहीर केले. या वेळापत्रकानुसार १२ ऑगस्टपासून अल्पसंख्याक, इनहाऊस आणि व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. तर पहिली गुणवत्ता यादी ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे.
राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद या सहा विभागांसाठी सुरू असलेल्या अकरावी प्रवेशप्रक्रियेला २४ जुलैपासून सुरुवात झाली. नोंदणीनंतर १ ऑगस्टपासून अर्जातील ‘भाग-१’ भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्जातील महत्त्वाचा टप्पा असलेला ‘भाग-२’ कधी, असा प्रश्न विद्यार्थी, पालकांना पडला होता. त्याची प्रक्रिया शिक्षण विभागाने सोमवारी जाहीर केली. नोंदणी केलेल्या आणि अर्ज प्रमाणित झालेल्या विद्यार्थ्यांना आता भाग-२ मध्ये विद्यार्थ्यांना प्रामुख्याने आवडीच्या कॉलेजांचे प्राधान्यक्रम (गुणवत्तेनुसार) भरायचे आहेत. या अर्ज भरण्याच्या प्रक्रिया, तसेच प्रवेशप्रक्रियेचे हे वेळापत्रक आहे. पहिल्या फेरीचे हे वेळापत्रक शिक्षण संचालनालयाने वेबसाइटवर जाहीर केले. पुढील नियमित दोन प्रवेशफेऱ्या, तसेच विशेष फेऱ्याचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले आहे.

11th Admission Part two Details

For More updates about 11th Admission process of Amravati, nashik, Mumbai, Aurangabad, Nagpur, Pune, mumbai. Keep visiting us. Also the updates will be available on 11thadmission.org.in.

Leave a Comment