Railway Recruitment Board Bharti

Railway Bharti Group D -परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा अपडेट !!

Railway Recruitment Board Bharti -Everyone was waiting for the RRB Group D exam. RRB Group D Recruitment 2021 Recruitment Exam Dates may be announced soon. More information about Railway Recruitment Board Bharti are as given below

दोन वर्षांपूर्वी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डनं (RRB) आरआरबी ग्रुप डी  च्या भारतीयांबत भरतीबाबत (RRB Group D Recruitment) घोषणा केली होती. तेव्हापासूनच या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांनी  सुरुवात केली होती. परीक्षा कधी होणार (RRB Group D exam) याची प्रतीक्षा सर्वजण करत होते. RRB Group D भरती 2021 भरती परीक्षेच्या तारखा (RRB Group D exam Dates) लवकरच जाहीर केल्या जाऊ शकतात असं अनेक मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. मात्र यंदा या परीक्षांबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

RRB ने मार्च 2019 मध्ये 1.03 लाखापेक्षा जास्त पदांवर या भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती. परंतु कोरोना महामारीमुळे गेल्या 2 वर्षांपासून परीक्षा होऊ शकली नाही. परंतु, हळूहळू परिस्थिती सुधारल्यानं भरती परीक्षांची फेरी पुन्हा सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत, आरआरबी ग्रुप डी भर्ती 2021 भरती परीक्षा देखील लवकरच घेतली जाऊ शकते.

मात्र यंदा ही भरती परीक्षा अनेक टप्यांमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या घेतलेल्या सर्व भरती परीक्षांमध्ये कोविड नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. सुमारे 1.15 कोटी उमेदवारांनी आरआरबी ग्रुप डी भर्ती परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. अशा परिस्थितीत, कोरोनामुळे एकावेळी अनेक उमेदवारांची परीक्षा घेणं शक्य नाही. त्यामुळे ही भरती परीक्षा ही अनेक टप्प्यांमध्ये घेतली जाण्याची शक्यता आहे.


Railway Recruitment Board Bharti Fake Emails – जानेवारीपासून टप्याटप्याने रेल्वे विभागात ‘ग्रुप सी’मध्ये एनटीपीसी पदासाठी भरती सुरू आहे. देशभरात हजारो केंद्रावर उमेदवार परीक्षा देत आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात असल्यामुळे कॉल लेटर, परीक्षा केंद्र, परीक्षेची वेळ आणि परीक्षेबाबत इतर माहितीसुद्धा इमेल आणि मोबाईलवर पाठविण्यात येते. याच संधीचा फायदा सायबर क्रिमिनल्सनी घेतला आहे.
रेल्वेचा अर्ज भरणाऱ्यांपैकी अनेक विद्यार्थ्यांना मोबाईलवर लिंक, एसएमएस आणि इमेल पाठवणे सुरू केले आहे. त्या ईमेलमधील लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईल हॅंग होणे किंवा व्हायरस घुसविण्यात येत आहे. तसेच परीक्षेसंदर्भात माहिती देत पुन्हा फार्म भरण्यास सांगण्यात येत आहे. त्यावरून अनेक जण सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकले. अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यातून सायबर गुन्हेगारांनी पैसे उकळल्याची माहिती आहे.

एसएमएस किवा ईमेल पाठवू शकतात
सायबर गुन्हेगार बॅंक खात्याची माहिती घेण्यासाठी लिंक, एसएमएस किवा ईमेल पाठवू शकतात. ते फेक ईमेल असतात. अशा लिंकवर कुणीही क्लिक करू नये. तसेच गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकू नये. जर कुणाची फसवणूक झाल्यास त्यांनी थेट सायबर क्राईममध्ये तक्रार करावी.
– केशव वाघ,
सहायक पोलिस निरीक्षक, (सायबर क्राईम)

 


Railway Recruitment Board Bharti : About 27 lakh candidates will appear for the second phase of Computerized Examination (CBT 1) to be conducted in the first phase of Non-Technical Popular Category Recruitment (NTPC) 2019 by the Railway Recruitment Board. RRB has activated the link to provide information about the date, session and city of the examination center.

रेल्वे भरती बोर्डाद्वारे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी भरती (NTPC) २०१९ प्रक्रियेंतर्गत पहिल्या टप्प्यात आयोजित केली जाणारी संगणकीकृत परीक्षा (सीबीटी १) च्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे २७ लाख उमेदवार परीक्षा देणार आहेत. आरआरबीने परीक्षेची तारीख, सत्र आणि परीक्षा केंद्राचं शहर आदी माहिती देण्यासाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे.

उमेदवारांनी आपला रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड देून लॉग इन करायचे आहे. अॅडमिट कार्ड आणि परीक्षा केंद्राचं शहर पाहण्यासाठी ही लिंक पुढे देण्यात येत आहे.

RRB NTPC 2019 परीक्षेच्या कँडिडेट लॉगइनच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

अॅडमिट कार्ड कधी?

परीक्षेत ई-कॉल लेटर / अॅडमिट कार्डशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. आरआरबी एनटीपीसी फेज-२ परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड परीक्षा सुरू होण्याआधी चार दिवस म्हणजेच १२ जानेवारी २०२१ पर्यंत सर्व आरआरबी वेबसाइट्सवर दिले जातील. उमेदवारांना आपल्या रिजनल वेबसाइटवर जाऊन अॅडमिट कार्ड मिळवता येईल.

या परीक्षेसंबंधी कोणत्याही प्रकारची मदत किंवा माहितीसाठी हेल्प डेस्क ही बनवले आहेत. आरआरबीच्या सर्व अधिकृत संकेतस्थळावर हे ऑनलाइन हेल्पडेस्क उपलब्ध आहेत.


Railway Recruitment Board Bharti : The 2nd phase of 1st Stage Computer Based Test (CBT-1) will be held from 16.01.2021 to 30.01.2021 for approx.27 lakh candidates. For the candidates scheduled in this phase, the LINK for viewing the Exam City & Date and downloading of Free Travelling Authority for SC/ST candidates will be made available on all RRB websites on or before 06.01.2021

RRB NTPC Phase-2 Exam: रेल्वे भरती बोर्डाच्या (RRB) नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी परीक्षेच्या (NTPC Exam) पहिल्या टप्प्यातील दुसरी फेरी सुरू होत आहे. यासंबंधी आरआरबीने परिपत्रकही जारी केले आहे. यानुसार, आरआरबी एनटीपीसी परीक्षा सीबीटी-१ चा दुसरा टप्पा १६ जानेवारी २०२१ पासून सुरू होईल.

दुसऱ्या टप्प्यातील ही परी७ा ३० जानेवारी २०२१ पर्यंत चालेल. यात सुमारे २७ लाख उमेदवार सहभागी होणार आहेत. कोणत्या शहरात आणि कोणत्या तारखेला उमेदवारांना परीक्षा द्यायची आहे, याची माहिती देण्यासाठी ६ जानेवारीपर्यंत सर्व आरआरबी वेबसाइट्सवर लिंक अॅक्टिव्ह केल्या जातील. या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यात परीक्षा द्यायची आहे, त्यांना त्यांनी अर्जात दिलेला ई-मेल आयडी आणि रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर देखील सूचना पाठवली जाणार आहे.

अॅडमिट कार्ड कधी?

परीक्षेत ई-कॉल लेटर / अॅडमिट कार्डशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. आरआरबी एनटीपीसी फेज-२ परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड परीक्षा सुरू होण्याआधी चार दिवस म्हणजेच १२ जानेवारी २०२१ पर्यंत सर्व आरआरबी वेबसाइट्सवर दिले जातील. उमेदवारांना आपल्या रिजनल वेबसाइटवर जाऊन अॅडमिट कार्ड मिळवता येईल.

या परीक्षेसंबंधी कोणत्याही प्रकारची मदत किंवा माहितीसाठी हेल्प डेस्क ही बनवले आहेत. आरआरबीच्या सर्व अधिकृत संकेतस्थळावर हे ऑनलाइन हेल्पडेस्क उपलब्ध आहेत.

RRB NTPC Phase-2 परीक्षा संबंधी नोटिफिकेशन


Railway Recruitment Board Bharti: The latest update from the Indian Railways will bring cheer for the jobseekers. The Railways announced the recruitment bonanza that will be undertaken by the 21 Railway Recruitment Boards across India. The dates for the Computer Based Test also known as CBT have been announced. According to the statement released by the Indian Railway, the exams will be held for 1.4 lakh vacancies. Latest updates suggest that nearly 2.5 crore candidates will be appearing for these CBT-1 exams. Read Further details about Railway Recruitment Board Bharti at below:

Indian Railways Recruiting for 1.4 lakh Vacancies: आजपासून या भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरु होईल. 15 ते 18 डिसेंबर या कालावधीत उमेदवारांची लेखी परीक्षा होईल.

लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले असताना आता सरकारी क्षेत्रातून एका आशादायक बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेकडून (Indian Railways) 1 लाख 40 हजार पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. (Indian Railways Recruiting for 1.4 lakh vacancies)

रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून (RRB) यासंदर्भात माहिती देण्यात आली असून तीन टप्प्यांत ही भरती प्रक्रिया पार पडेल. आजपासून या प्रक्रियेला प्रारंभ होईल. रेल्वे विभागाने 11 डिसेंबरला प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार तब्बल सव्वा लाख पदांसाठी 2.44 लाख उमेदवार इच्छूक आहेत. त्यामुळे रेल्वेतील नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

आजपासून या भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरु होईल. 15 ते 18 डिसेंबर या कालावधीत उमेदवारांची लेखी परीक्षा होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC) पदांसाठी 28 डिसेंबर ते मार्च 2021 या काळात परीक्षा होतील.

तर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात पहिल्या श्रेणीतील (CEN No. RRC- 01/2019) पदांसाठीची परीक्षा पार पडेल. या परीक्षेचा कालावधी साधारण एप्रिल 2021 ते जून 2021 असा असेल.

आयसोलेटेड आणि मिनिस्टिअरल श्रेणीसाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना ई-मेल आणि एसएमएसच्या माध्यमातून परीक्षेची वेळ, तारीख आणि ठिकाणाची माहिती देण्यात येईल. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या संकेतस्थळावर परीक्षेच्या चार दिवस आधी ई-कॉल लेटर उपलब्ध होईल. त्यापुढील प्रक्रियेची माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल.

परीक्षेसाठी रेल्वेकडून विशेष खबरदारी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून या परीक्षेसाठी विशेष खबरदारी बाळगण्यात आली आहे. यावेळी परीक्षा केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर्स आणि मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल. शरीराचे तापमान तपासल्यानंतरच उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळेल.

या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना त्यांच्या राज्यातच परीक्षा केंद्र उपलब्ध होणार आहे. जेणेकरून उमेदवार सहजपणे याठिकाणी पोहोचू शकतील. मात्र, काही उमेदवारांना दुसऱ्या राज्यातही परीक्षा केंद्र मिळू शकते. त्यासाठी रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडल्या जातील. यासाठी प्रत्येक राज्याच्या मुख्य सचिवांना सहकार्य करण्याची विनंती रेल्वे विभागाकडून करण्यात आली आहे.

सौर्स  : डेली हंट

2 thoughts on “Railway Recruitment Board Bharti”

Leave a Comment