ST महामंडळात ५००० चालकांची भरती दोन दिवसात होणार! – ST Mahamandal Bharti 2022

ST Mahamandal Bharti 2022 – MSRTC Bharti 2022 is expected Soon. This recruitment will be carried for the 5000 Vacancies of Driver Post. The recruitment will be on the contract basis. More details are mentioned below. Read all details carefully. For more updates keep visiting Mahabharti.co.in.

 

एसटीमध्ये सुमारे पाच हजार चालकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आह़े याबाबत दोन दिवसांत जाहिरात काढण्यात येणार आह़े

शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी झालेल्या संपादरम्यान चालकांविना एसटी प्रवाशांचे हाल झाले होते. एसटी महामंडळाने कंत्राटी चालक भरती करून एसटी सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. संप मिटताच कंत्राटी चालकांची संख्या कमी केली. तसेच मुदत संपलेल्या काहींना मुदतवाढही देण्यात आली. त्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद या विभागांचा समावेश आहे.

एसटीत प्रतीक्षा यादीवरील दोन हजारांहून अधिक उमेदवार असून, त्यातील बहुसंख्य चालक- वाहक आहेत. दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही त्यांना अद्यापही सेवेत घेण्याचा निर्णय झालेला नाही. ‘‘प्रतीक्षा यादीवर असलेले कर्मचारी हे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून एसटीत येऊ शकतात. एसटीत निवृत्त कर्मचारी संख्या वाढल्यास त्यांची भरती होईल. याबाबत लवकरच निर्णय होणार आहे’’, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले.

पाच हजार कंत्राटी चालकांची खासगी कंपनीमार्फत भरती करण्यात येईल़ ही भरती टप्प्याटप्प्याने होईल़ याबाबतची जाहिरात दोन-तीन दिवसांत काढण्यात येईल़.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शासनात विलीनीकरणाची शक्यता संपुष्टात आली आहे. यानंतर रोपाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधान केलेल्या निवेदनानुसार सेवा समाप्त झालेल्या २०१९ कर्मचायना पुन दिली मार्ग मोकळा झाला आहे. तर बडतर्फ करण्यात आलेल्या १०, २७५ कर्मचाऱ्यांना शिस्त आवेदन पद्धतिनुसार कार्यवाही करून कामावर घेतले जाणार आहे.

एसटी संपाला पाच महिने उलटत आहेत. अजूनही ५०,३०५ कर्मचारी संपत सहभागी आहेत. काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, तर २०हजाराहून अधिक कर्मचारी विविध कारवाईत अडकेल आहेत. बदली, बडतर्फी, निलंबन, सेवा समाप्ती अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.

१०,२७५ बडतर्फ कामगारांना संधी

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सहभागी झालेल्या १०,२७५ कामगारांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे हे कामगार जे संपकरी.कामगार सेवेत सहभागी होऊ इच्छित आहेत त्यांच्यावर दबाव आणत होते. कारण बडतर्फ कामगारांना सेवेत सहभागी होता येणार नाही, असा महामंडळाचा निर्णय होता. ही चिंतेची बाब बनली होती. परंतु आता महामंडळाच्या परिपत्रकामुळे बडतर्फ कामगारांच्या सेवेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पत्रकानुसार जे बडतर्फ कामगार ३१ मार्च २०२२ पर्यंत सेवेत सहभागी झाले, तर त्यांची सेवाज्येष्ठता कमी केली जाणार नाही.

 


ST Mahamandal Bharti 2022 – विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या कामबंद आंदोलनाला चार महिने उलटल्यानंतरही, अनेक कर्मचारी अद्यापही आपल्या मागणीवर ठाम राहून कामावर परतलेले नाहीत. त्यामुळे महामंडळाने पूर्ण क्षमतेने सेवा सुरू करण्यासाठी राज्यभरात कंत्राटी चालकांची भरती प्रक्रिया सुरू केली असून, जळगाव विभागातही २३ मार्चपासून ९५ कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवायला सुरुवात झाली आहे. भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला एका महिन्यांसाठी नियुक्ती देण्यात येणार असून, त्यानंतर महामंडळाच्या सूचनेनुसार नियुक्तीचा कालावधी वाढविण्यात येणार आहे.

ST Mahamandal Driver Bharti 2022 


राज्य परिवहन महामंडळाच्या या विभागात विभागीय वाहतूक अधिकारी यांसह विविध पदे रिक्त 

ST Mahamandal Bharti 2022 –There are six to seven vacancies in the Ahmednagar division of the State Transport Corporation, including Divisional Warehousing Officer, Divisional Transport Officer. These vacancies are being filled by handing over to others. The Ahmednagar division has been functioning smoothly for the last several days due to lack of officers and staff.

Rajya Parivahan Vibhag Ahmednagar Bharti 2022

राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागात विभागीय भांडार अधिकारी, विभागीय वाहतूक अधिकारी यांसह सहा ते सात पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांचा पदभार इतरांकडे देऊन सध्या दैनंदिन कामकाज केले जात आहे. कमी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बळावर गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर विभागाचे कामकाज सुरळीत सुरू आहे. कोरोना काळात एसटी तोट्यात गेलेली आहे. त्यानंतर एसटीचे चाक रुळावर येत असतानाच कर्मचाऱ्यांचा संप सुरू झालेला आहे. या संपामुळे एसटीचे मोठे नुकसान झालेले आहे. संप मिटवावा व कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, यासाठी राज्य सरकारसह एसटी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र काही जण, आपल्याला अहमदनगर जिल्ह्यात नियुक्ती मिळणार आहे, अशी चर्चा अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भेटून घडवून आणत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ही आहेत रिक्त पदे

  • यंत्र अभियंता (चालन)
  • विभागीय भांडार अधिकारी (नगर)
  • विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी
  • विभागीय वाहतूक अधिकारी
  • विभागीय वाहतूक अधीक्षक
  • संगमनेर, तारकपूर, पाथर्डी आगार व्यवस्थापन

सातारा राज्य परिवहन महामंडळात 50 कंत्राटी चालकांची भरती !

ST Mahamandal Bharti 2022 – Corporation employees across the state have been on strike for the last three months demanding various things. The workers continued their strike, insisting on a merger. After that, the corporation administration suspended the employees who did not show up for work. As a result of this action, more than 50 per cent of the employees in the depots went to work. Due to the strike by the employees of the State Transport Corporation, the number of ST round trips in rural areas has been reduced and passengers have to face difficulties in getting to the city. In this context, the corporation administration has informed that 50 contract drivers will be recruited on behalf of the Satara divisional office. Know More about ST Mahamandal Bharti 2022, ST Mahamandal Vacancy 2022, ST Mahamandal Recruitment 2022, Satara ST Mahamandal Vacancy 2022, ST Mahamandal Driver Bharti 2022 at below :

ST Mahamandal Bharti 2022

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱयांच्या संपामुळे ग्रामीण भागातील एसटी फेऱया कमी असल्याने प्रवाशांना शहरात येताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा विभागीय कार्यालयाच्या वतीने 50 कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळ प्रशासनाने दिली आहे.

MSRTC Driver Recruitment 2022

महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱयांनी विविध मागण्यांसाठी मागील तीन महिन्यांपासून संप पुकारला आहे. ऐन दिवाळीत संप सुरू झाल्याने अनेक चाकरमान्यांचे हाल झाले होते. कर्मचारी संघटना व परिवहनमंत्र्यांनी तीन बैठका घेऊन सुमारे 41 टक्के पगारवाढ केली. तरीदेखील कर्मचाऱयांनी विलीनीकरण या मुद्यावर ठाम राहात संप सुरूच ठेवला. त्यानंतर महामंडळ प्रशासनाने कामावर हजर न होणाऱया कर्मचाऱयांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांचे निलंबन केले. या कारवाईमुळे आगारांतील 50 टक्क्यांहून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले. त्यामुळे सलग दोन महिने बंद असलेली वाहतूक काहीअंशी पूर्वपदावर येऊ लागली आहे.

ST Mahamandal Recruitment 2022

जिह्यातील आगारांतून अद्यापही पूर्ण क्षमतेने फेऱया सुरू नाहीत. त्यामुळे कंत्राटी चालकांची भरती केली जाणार आहे. याबाबत कंत्राटी कर्मचाऱयांच्या ठेकेदारांशी चर्चा झाली असून, लवकरच कर्मचारी देण्याची मागणी केली आहे. जेणेकरून जिह्यात फेऱयांची संख्या वाढून प्रवाशांची गैरसोय दूर केली जाणार आहे, असे वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड यांनी सांगितले.

Leave a Comment