राष्ट्रीय आरोग्य मिशन, यूपी (National Health Mission, UP) द्वारे सहाय्यक परिचारिका (Auxiliary Nurse Midwife – ANM) च्या पाच हजार पदांची भरती (Recruitment) केली जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशन, यूपीने या पदांसाठी अधिसूचना जारी करून अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाली असून, इच्छुक व पात्र उमेदवार 30 सप्टेंबर 2021 पर्यंत अधिकृत वेबसाइट upnrhm.gov.in द्वारे अर्ज करू शकतात.
सहाय्यक परिचारिका पदांसाठी उमेदवाराकडे राज्य सरकारच्या नर्सिंग कौन्सिलद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून सहाय्यक नर्सिंग आणि मिडवाईफमध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा असावा.
असे आहे एएनएम पदांचे आरक्षण
- सामान्य श्रेणी : 2484
- ओबीसी श्रेणी : 1381
- SC श्रेणी : 1066
- एसटी श्रेणी : 69
- ईडब्ल्यूएस : 463
अशी आहे वयोमर्यादा
: : महत्वपूर्ण नवीन जाहिराती : :
✅राष्ट्रीय सहकारी बँक लि, मुंबई अंतर्गत ग्रॅजुएट उमेदवारांसाठी नोकरीची संधी; ऑनलाइन अर्ज करा
✅१० वी उत्तीर्णास संधी - भारतीय डाक विभागांतर्गत 38920+ पदांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज सुरु
✅राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा येथे 110+ पदांवर भरती; नवीन जाहिरात
✅10वी, 12वी उमेदवारांना सैन्य कल्याण शिक्षण संस्था HQ दक्षिणी कमांड पुणे अंतर्गत नोकरीची संधी
✅ महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती, नवीन जाहिरात
सहाय्यक नर्सिंग आणि मिडवाईफ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा तीन वर्षे तसेच एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्षे शिथिल आहे.
राष्ट्रीय आरोग्य मिशन, यूपीने जारी केलेल्या सहाय्यक नर्सिंग आणि मिडवाईफ भरती अधिसूचनेनुसार, या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 12,128 रुपये प्रति महिना मानधन दिले जाईल. ही बाब नोंद करावी की, उमेदवारांची नियुक्ती कराराच्या आधारावर केली जाईल.