सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकर भरती सुरु

सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच काही पदांसाठी मोठी पदभरती होणार आहे. या पदभरतीसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.

दरम्यान, सदर पदभरती ही वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी होणार आहे. सदर पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी थेट दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचे असल्याची माहिती देण्यात आली आहे. २३ सप्टेंबर २०२१ रोजी मुलाखतीची तारीख असणार आहे. मुलाखतीचा पत्ता, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर असा आहे.

एकापेक्षा अधिक विषयांमध्ये उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले असेल, तर अशा उमेदवारांसाठी मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे. जर मुलाखतीच्या वेळी कोणताही पदव्युत्तर शिक्षण घेतलेला उमेदवार प्राप्त झाला नाही, तर अशावेळी एमबीबीएस उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी क्लिनिकल विषय पदव्युत्तर शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. त्याच उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही कळवण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय महाविद्यालयातून उमेदवारांनी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेतली असेल, तर अशा उमेदवारांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ही शासकीय महाविद्यालय सोलापूर येथून प्राप्त केली असेल तर अशा उमेदवारांना देखील अधिक प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

उमेदवारांची प्रतीक्षा यादी मुलाखतीवेळी तयार करण्यात येणार आहे आणि त्यानंतर उमेदवारांना पुढच्या सर्व मुलाखतींसाठी उपस्थित राहावे लागेल. थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

Leave a Comment