Maharashtra Police Bharti 2021

Table of Contents

पोलीस भरती प्रक्रिया रखडल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन केले जाईल -पोलीस भरतीचे मार्गदर्शक !

Maharashtra Police Bharti 2021 – महाराष्ट्रात 2018 नंतर पोलीस भरती घेण्यात आली नाही. पोलीस भरती घेण्यासंदर्भात गृहमंत्री व इतर मंत्र्यांकडून घोषणांची मांदियाळी झाली. परंतु अद्यापपर्यंत पोलीस भरतीची तारीख जाहिर झाली नाही. पोलीस भरती प्रक्रिया रखडल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भावी आयुष्यात अंधार दाटून येत आहे.

नोव्हेंबर 2019 मध्ये पोलीस भरतीची जाहिरात काढून विद्यार्थ्यांचे फॉर्म भरुन घेतले, परंतु त्याचीही पुढे प्रक्रिया राबविली नाही. करोनाच्या काळात महाराष्ट्रात इतर परीक्षा घेतल्या जातात, मात्र पोलीस भरती प्रक्रिया राबविली जात नाही.ही भरती प्रक्रिया राबवली न गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे वय वाढले आहे,

आंदोलनाशिवाय सरकारला जाग येणार नाही – रुपनवर

बारामतीचे पोलीस भरतीचे मार्गदर्शक उमेश रुपनवर म्हणाले की, पहिल्या टप्प्यामध्ये दि. 21 मार्च ते 27 मार्च या कालावधीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारच्या धोरणाचा निषेध केला जाईल. 25 मार्च रोजी महाराष्ट्रात पोलीस भरती न झालेल्या घटनेला 3 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रतिकात्मक स्वरुपात केक कापून सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध केला जाईल. त्याचे ट्विट उचज महाराष्ट्रापासून सर्व मंत्र्यांना केले जाईल.

तसेच फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, डम्बलर, गुगल प्लस यांसारख्या सर्व सोशल मीडिया नेटवर्कवर हस्टॅग मोहीम महाराष्ट्रवर राबविली जाईल. एवढे करूनही सरकारने पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली नाही तर दुसरा टप्पा हा दि. 28 मार्च ते 10 एप्रिल या कालावधीदरम्यान राबविला जाईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील मंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील कार्यालयांना पोलीस भरती करण्याबाबतची निवेदने दिली जातील. सरकारने प्रतिसाद दिला नाही तर शेवटी पोलीस विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र स्वरुपात आंदोलन केले जाईल. असा इशारा त्यांनी दिली.


कोरोना परिस्थितीत सुध्या  12500 पोलिसांची भरती होणार -गृहमंत्री अनिल देशमुख!

Maharashtra Police Bharti 2021 – राज्यात पहिल्यांदाच 12500 पोलीस भरतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, कोरोनामुळे त्यावर थोडा परिणाम झाला, पण पहिल्या टप्प्यात 5300 पोलिसांच्या भरती प्रक्रिया सुरू झाली. पहिल्यांदा राज्याची आर्थिक परिस्थिती खराब असताना 12500 पोलिसांना सेवेत घेण्याचा अतिशय मोठा निर्णय घेण्यात आल्याचंही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधोरेखित केलंय.

राज्यातील पोलीस विभागात मोठे फेरबदल करण्यात आलेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय. राज्यात 12500 पोलिसांची भरती करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलंय.


राज्यात फौजदार ते पोलीस उपनिरीक्षकांच्या साडेचार हजारांवर जागा रिक्त

Maharashtra Police Bharti 2021 – In the State Police Department there is almost 4000+ vacant post. The posts from Faujdar to Sub-Inspector of Police are vacant in the sate . Read More details from below Image. 

महाराष्ट्र राज्य पोलिस विभागात सद्य स्थिती नुसार जवळपास २० हजार जागा रिक्त असून,त्यात अंदाजे चार हजार पोलिस अधिकाऱ्यांची गरज आहे. रिक्त जागांमध्ये सर्वाधिक जागा पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या आहेत. तसेच, पदोन्नतीची प्रक्रिया खोळंबल्याने उपलब्ध पोलिसांवर कामाचा ताण वाढत आहे.

आपणास माहीतच असेल, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १२ हजार ५०० पोलिस कर्मचाऱ्यांची भरती करण्याची घोषणा केली आहे. मात्र, पोलिस भरतीसाठी कोरोना स्थिती मुळे विलंब होत आहे. ही पोलीस भरती झाल्यानंतरही पोलिस विभागात आणखी रिक्त जागा राहणार आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या चार हजारांवर जागा रिक्त असल्यामुळे अधिकाऱ्यांवर कामाचा मोठा ताण आला आहे.


मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस आयुक्तालयात तब्बल ४४ टक्के अधिकारी, कर्मचारी वर्गाची कमतरता

Maharashtra Police Bharti 2021 – In Mira Bhainder and Vasai Virar their is 44% vacant posts of Police. There is a need of 20000 Police in these department. Read More details On Vasai Virar Police Bharti 2021 at below

Maharashtra Police Bharti 2021 – मीरारोड – ४ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस आयुक्तालयात ४४ टक्के इतके पोलीस मनुष्यबळ कमी असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी दिली आहे . आयुक्तालय सुरु करण्यात खूप अडचणी असताना देखील आयुक्त सदानंद दाते यांनी गेल्या चार महिन्यात आयुक्तालय उत्तम रित्या सांभाळत चांगली घडी बसवली असल्याचे नगराळे म्हणाले .

१ ऑक्टोबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मीरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालयचे उदघाटन करण्यात आले होते. आयुक्तालयाच्या पहिल्या पोलीस आयुक्त पदी ज्येष्ठ सनदी अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली. अपुरे मनुष्यबळ , आयुक्तालय व नवीन पोलीस ठाणी , नवीन कार्यालये आदींसाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा पुरेशा नसताना देखील दाते यांनी आयुक्तालयाची घडी यशस्वी रित्या बसवण्यास घेतली आहे . नागरिकांच्या आयुक्तालया बद्दल असलेल्या अपेक्षा प्रमाणे कामकाज करून घेण्याचा प्रयत्न दाते यांनी चालवला आहे .

पोलीस आयुक्तालय झाले तरी मीरारोडच्या राम नगर येथील मुख्यालयाच्या इमारतीत नियंत्रण कक्ष व आयुक्तालयाचे संकेत स्थळ तयार करण्याचे काम सुरु होते . सोमवारी त्याचे उदघाटन महासंचालकांनी केले . आधुनिक नियंत्रण कक्ष असून जीपीएस यंत्रणे मुळे घटनास्थळी तात्काळ पोलीस मदत पाठवण्यास मदत होणार आहे.

नगराळे म्हणाले कि , कोणतेही पोलीस ठाणे चालवण्यासाठी कर्मचारी अधिकारी हवेत. आपल्या ह्या नव्या आयुक्तालयात ४४ टक्के कर्मचारी – अधिकारी कमी आहेत . रिक्त जागा जास्त आहेत . हि कमी भरून काढण्यासाठी सध्या ठाणे ग्रामीण व पालघर ग्रामीण मधून पोलीस बळ घेण्यासाठी अपर पोलीस आयुक्त एस. जयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे . समिती महिन्या भारत कार्यवाही पूर्ण करेल . तसेच भरती किंवा बदलीने येणारे इच्छुक असतील त्यांना सुद्धा प्राधान्याने सामावून घेऊ.

राज्यात पोलिसांची २० हजार पदे रिक्त आहेत . ती भरण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत . त्यात काही तांत्रिक अडचणी व न्याय प्रविष्ठ प्रकरण आहेत . पण लवकरच भरती पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे . नवीन आयुक्तालय , युनिट सुरु करताना नवीन कार्यालये – पोलीस ठाणे साठी जागा , अधिकाऱ्यांना बसण्यास जागा , मनुष्य बळ अश्या बऱ्याच अडचणी असतात .

आयुक्त सदानंद दाते यांनि गेल्या ४ महिन्यात आयुक्तालयाची चांगली प्रगती केली आहे . जोमाने काम सुरु आहे . आयुक्तालयाची सर्वच प्रक्रिया कार्यान्वित होईल . नवीन पोलीस ठाणी सुरु करण्याची तयारी सुरु आहे . आता पर्यंत काय काम झाले आहे याच आढावा आणि काय अडचणी आहे हे समजून घेण्यासाठी आलो आहे . महासंचालक कार्यालया कडून किंवा गृह विभागाच्या स्तरावर जास्तीत जास्त मदत लागेल ती लवकर देऊ असे नगराळे म्हणाले .

 

 

 


Maharashtra Police Bharti 2021 New Update  : महाराष्ट्र पोलीस दलात लवकरच मोठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात ५,३०० तर दुसऱ्या टप्प्यात ७,५०० पदे भरली जाणार आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली.

पोलिस दलात आगामी काही दिवसात पोलिस भरती सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच हजार ३०० जणांची भरती केली जाणार असून दुसऱ्या टप्प्यात सात हजार ५०० जणांची भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शक्ती कायद्यासंदर्भात विधान परिषदेच्या विशेष समितीच्या बैठकीनिमित्त राज्याचे गृहमंत्री शहरात आले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, पोलिस दलात १२ हजार ५०० कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मराठा आरक्षणामुळे या भरती प्रक्रियेला विलंब झाला. मात्र विविध संघटनांशी चर्चा केल्यानंतर अखेर भरतीचा मार्ग खुला झालेला आहे. यामुळे आगामी काही दिवसात पहिल्या टप्पयात पाच हजार ३०० जणांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पोलिस भरती पाठोपाठ डॉक्टर भरतीही होणार आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राज्यात एक लाख घरे बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी संकेत दिले. आगामी काही दिवसात राज्यात ११२ हे आपतकालीन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. या क्रमांकावर सर्वसामान्य नागरिकांना लवकर मदत मिळावी. यासाठी पोलिस विभाग दोन हजार चारचाकी वाहन आणि अडीच हजार दुचाकी वाहन ‘जीपीआरएस’ तंत्रज्ञानासह विकत घेणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना लवकरच मदत मिळावी. यासाठीही याचा उपयोग होणार आहे. ही योजना आगामी काही महिन्यात लागू केली जाणार असल्याचेही संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. यावेळी पत्रकार परिषदेत आमदार विक्रम चव्हाण, अमोल मिटकरी तसेच पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांची उपस्थिती होती.


Police Bharti Pre Training 2021

Police Recruitment – Expert and experienced guides are invited to provide online training for preparation for the written exam. The application has to be done online. The deadline to apply is February 5th, 2021. See the advertisement for more information in this regard.

Police Bharti Pre Training 2021- पोलीस भरतीपूर्व – लेखी परीक्षा ऑनलाईन प्रशिक्षण 2021

Police Bharti Pre Training 2021 : सारथी, पुणे मार्फत महाराष्ट्रात रहिवासी असलेल्या मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील उमेदवारांना पोलीस भरती – लेखी परीक्षेच्या पूर्वतयारीकरिता ऑनलाईन प्रशिक्षण देणेस तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2021 आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता दिलेली जाहिरात बघावी.

  • प्रशिक्षाचे नाव – पोलीस भरतीपूर्व – लेखी परीक्षा ऑनलाईन प्रशिक्षण 2021
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 फेब्रुवारी 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – sarthi-maharashtragov.in

Police Bharti Pre Training 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Police Bharti Pre Training
जाहिरात वाचा
📝 अर्ज करा

Maharashtra Police Bharti 2021 – Out Of 12538, 5300 Vacancies Get Filled In First Stage Of Recruitment

Maharashtra Police Bharti 2021 New Update : राज्य शासनाच्या पदभरतीवर वित्त विभागाने आणलेल्या निर्बंधातून सूट देत पोलीस शिपायांची १२,५२८ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश गुरुवारी काढण्यात आला. यापैकी २०१९मधील रिक्त ५,२९७ पदे भरण्याला पहिल्या टप्प्यात अनुमती देण्यात आली असून, उर्वरित पदांसाठीचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्याच्या आर्थिक स्रोतांवर प्रतिकूल परिणाम झाला होता. त्या पार्श्वभूमीवर ४ मे २०२० रोजी एक आदेश काढून वित्त विभागाने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता अन्य विभागांनी नवीन कोणतीही पदे भरण्यावर निर्बंध घातले होते. आजच्या आदेशाने गृह विभागाला पोलीस भरतीसाठी त्यातून सूट देण्यात आली आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपायांची पदे १०० टक्के भरण्याला अनुमती देण्यात येत असल्याचे वित्त विभागाने गुरुवारच्या आदेशात स्पष्ट केले आहे. दिनांक १३ नोव्हेंबर २०२०च्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस शिपायांची २०१९मधील रिक्त ५,२९७ पदे तसेच २०२०मधील ६,७२६ पदे, मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी ५०५ अशी एकूण १२,५२८ पदे भरण्यासाठी आधीचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यासंबंधीचा शासन आदेश आज (गुरुवारी) काढण्यात आला.

पहिल्या टप्प्यातील पोलीसभरती नक्षलग्रस्त भागात
वर्धा – मराठा आरक्षणाच्या मुद्यामुळे पोलीसभरती रखडली होती. मात्र, आता पोलीसभरती घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने नक्षलग्रस्त भागासह पहिल्या टप्प्यात पाच हजार जागांसाठी भरती घेण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच भरती सुरू होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी येथे दिली.

पुण्यातील २१ नगरसेवकांनी महाविकास आघाडीत प्रवेश केला आहे. येत्या काळात भाजपचे मोठे नेते महाविकास आघाडीत प्रवेश करणार असून, लवकरच त्यांची नावेही नागरिकांना लवकरच कळणार असल्याचा टोला देशमुख यांनी भाजपला लगावला.

राज्यात पोलीस शिपायांची पदे भरण्याचा शब्द आमच्या सरकारने पाळला आहे. आजच्या आदेशाने पोलीस दल अधिक मजबूत होण्यास मदत होईल.
– अनिल देशमुख, गृहमंत्री

 

The New Update about Maharashtra Police Department Bharti process 2021 is available today. The detail News about this Recruitment process is given  below. Read All details carefully & go through the given important Links. You can also watch our Police Bharti 2021 Video Series from this link which will guide you for the coming Police Bharti process with New syllabus & important questions.

Maharashtra Police Bharti 2021 – राज्य पोलीस दलातील रिक्त पद भरतीसाठी सामाजिक, आर्थिक दुर्बल घटक (एसईबीसी) प्रवर्ग लागू ठेवण्याचा निर्णय पूर्ववत करण्यात आला आहे. गृह विभागाने त्याबाबतचा अध्यादेश बुधवारी काढला. त्यामुळे मराठा समाजातील इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

पोलीस घटकांत शिपाईच्या रिक्त पदांसाठी २०१९ मध्ये घटकनिहाय जाहिरात काढली. त्यात ‘एसईबीसी’ प्रवर्ग होता. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर त्याला अधीन राहून ४ जानेवारीला ‘एसईबीसी’ प्रवर्ग रद्द केल्याचा अध्यादेश जारी केला. त्यामुळे मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यानंतर ७ जानेवारीला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तो अध्यादेश रद्द केल्याचे जाहीर केले. त्यानुसार, गृह विभागाने भरतीत बुधवारी अध्यादेश जारी केला.


Maharashtra Police Recruitment 2021 – Big News On Police Bharti 2021. As Candidates from Maratha Category will now get benefits of EWS. They can fill Online application from through EWS. Check below update:

राज्य सरकारकडून 12528 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये मराठा उमेदवारांना आता ईडब्लूएसचा लाभ मिळणार आहे.

मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे एसईबीसी प्रवर्गातून पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करणाऱया उमेदवारांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी सरकारने आधीचा शासन निर्णय रद्द करत नवीन शासन निर्णय काढला आहे. यानुसार एसईबीसीसाठी राखीव ठेवण्यात आलेली पदे खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे ईडब्लूएस प्रमाणपत्र आहे अशा उमेदवारांना ईडब्लूएसमधूनही अर्ज भरता येईल.


Maharashtra Police Bharti 2021 – A jumbo recruitment of 12,538 posts will be done in the state police force and the advertisement for this police recruitment will be issued in the next eight days, announced by Home Minister Anil Deshmukh. See brief information at below:

Maharashtra Police Bharti 2021 Details & Latest Updates – राज्याच्या पोलिस दलात तब्बल १२ हजार ५३८ पदांची जम्बो भरती करण्यात येणार असून या पोलिस भरतीची जाहिरात येत्या आठ दिवसांत काढण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. पोलिस भरती लवकर करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांच्या शिष्टमंडळांशी चर्चा करताना देशमुख यांनी हे आश्वासन दिले आहे.

पोलिस भरतीच्या पहिल्या टप्प्यात ५ हजार २९७ पदांची भरती करण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला की लगेच दुसऱ्या टप्प्यातील पोलिस भरती करण्यात येईल, असेही देशमुख म्हणाले. त्यानंतर देशमुख यांनी माध्यमांशीही संवाद साधला.

As you know, large number of unemployed students who have recently passed the HSC class exam from the MHHSC board are waiting for the Maharashtra Police Jobs 2021 online for constable Recruitment Process 2021. Now their wait is going to over Very soon because the official examination authority is planning to recruit 12,000 Police Constable Bharti under Maharashtra Police 2021. Candidates who have attained a minimum of 19 years of age will able to download notice in Marathi language and fill the application form for these vacancies very soon. Direct links to download advertisements and fill the application form will be available on this page, So keep visiting us. The district wise advertisement links are given below For you reference. we will keep adding latest Updates about this recruitment drive on this page. Also don’t forget to download our app from Google Play store for more latest updates about Police Bharti 2021. The Official Website of Maharashtra Police Department is www.mahapolice.gov.in.

 

पोलिस भरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाला देण्यात आले आहेत. १२ हजार ५३८ जागांची भरती पूर्ण झाल्यानंतर गरज पडल्यास आणखी ५ हजार पदेही भरण्याबाबत विचार केला जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.

गृह विभागाने २०१९ मध्येच नोकरभरतीचा निर्णय जाहीर केला होता. मात्र ९ सप्टेंबर २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यामुळे पोलिस भरतीची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. २०१९ च्या पोलिस भरतीत एसईबीसी प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात गृहित धरण्याचा शासनादेश ४ जानेवारी २०२१ रोजी गृह विभागाने जारी केला होता. मात्र तो तीनच दिवसांत रद्द करून मराठा समाजाच्या उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आरक्षण देणारा नवा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे

विभागाचे  नाव एकूण जागा ऑनलाईन अर्ज (लवकरच ऍक्टिव्ह होईल)विस्तृत जाहिरात 
यवतमाळ येथे क्लिक करायेथे बघा 
गोंदिया  येथे क्लिक करायेथे बघा 
गडचिरोली येथे क्लिक करायेथे बघा 
वाशिमयेथे क्लिक करायेथे बघा 
चंद्रपूर येथे क्लिक करायेथे बघा 
वर्धायेथे क्लिक करायेथे बघा 
बुलढाणायेथे क्लिक करायेथे बघा 
अकोलायेथे क्लिक करायेथे बघा 
अमरावतीयेथे क्लिक करायेथे बघा 
नागपूर येथे क्लिक करायेथे बघा 

Maharashtra Police Bharti 2021– Home Minister Anil Deshmukh has made a big announcement in the last few days while there has been a lot of discussion about police recruitment in the state. He announced that recruitment process will be implemented for 12538 posts in the police department. In First Rount 5300 Posts will get filled and process for this has been started . So Candidates be ready with your Prepartion To Get Selected for Maharashtra Police Department Bharti 2021:

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पोलीस भरतीबाबत (Police recruitment) उलटसुलट चर्चा सुरु असतानाच आता गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली.

पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. (Mega job recruitment 2021 in Police department in Maharashtra)

तसेच 12538 जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. ते सोमवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्य सरकार पोलीस भरतीच्या निर्णयावर ठाम असल्याचे संकेत मिळत आहेत.

गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून ‘एसईबीसी’च्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर केला होता.

मात्र, या निर्णयाला मराठा संघटना आणि नेत्यांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट आहे. मात्र, आता अनिल देशमुख यांच्या वक्तव्यामुळे गृह खाते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

पोलीस भरतीबाबत काय GR- mahapolice.gov.in?

राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. राज्य सरकारनं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.

‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची मुभा देण्यात येईल. 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी लागेल. पोलीस महासंचालकांना या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 


Maharashtra Police Bharti 2021 Delayed : As per the latest news published in local news paper, now the Maharashtra police bharti 20210 process may delay,  updates & details about this news are given below.
Police Bharti Delay 2021

Maharashtra Police Bharti 2021 -The state government issued a GR regarding Police Recruitment 202 (Maharashtra Police Bharti 2021). The irony is that the state government has had to withdraw the GR in just a few hours. The GR has been withdrawn by the state government and will now be re-issued with a revised GR corrigendum.

पोलीस शिपाई भरती २०१९ करिता अर्ज केलेल्या एसईबीसी (#SEBC) उमेदवारांना दिलासा. गृह विभागाने ४ जानेवारी २०२१ रोजी काढलेला शासन निर्णय रद्द.

निर्णय प्रक्रियेवरुन चर्चेत असलेले महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राज्य सरकारने पोलीस भरती 202 (Maharashtra Police Bharti 2021) बाबत एक जीआर काढला. नामुष्कीजनक गोष्ट अशी की राज्य सरकारला अवघ्या काही तासांतच हा जीआर (GR) परत घ्यावा लागला आहे. राज्य सरकारने हा जीआर परत घेतला असून, आता पुन्हा नवा सुधारीत जीआर शुद्धीपत्रकासह काढण्यात येणार आहे. राज्य सरकारने परत घेतलेला जीआर 4 जानेवारी रोजी काढला होता. यात एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएसचा लाभ मिळावा यासाठी नवे शुद्धीपत्रक काढले जाणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आज (7 जानेवारी 2021) याबाबत माहिती दिली.

Maharashtra Police Bharti 2021

राज्याच्या गृह विभागाने 4 जानेवारी रोजी काढलेला जीआरमध्ये उल्लेख होता की, एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल. जीआरमधील या उल्लेखाला मोठा विरोध झाला. त्यानंतर गृह विभाग एक पाऊल मागे आला आणि त्यांनी जीआर मागे घेतला.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले की, पोलीस शिपाई भरती 2019 करिता अर्ज केलेल्या एसईबीसी (#SEBC) उमेदवारांना दिलासा. गृह विभागाने 4 जानेवारी 2021 रोजी काढलेला शासन निर्णय रद्द. त्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या 23 डिसेंबर 2020 च्या निर्णयाचा लाभ देण्यासाठी लवकरच सुधारित शासन निर्णय काढणार आहे.

दरम्यान, राज्याच्या गृह विभागाने 4 जानेवारी रोजी काढलेल्या जीआरमध्ये भरती प्रक्रिया एसईबीसीचे आरक्षण न ठेवता पार पाडण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. तसेच, ‘एसईबीसी’तून अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू करुन तीच पात्रता ठरविण्यात येणार होती. यासोबत खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचा विचार खुल्या प्रवर्गातूनच करावा असेही या जीआरमध्ये म्हटले होते. मात्र, आता राज्य शासनाने हा जीआरच रद्द केला आहे.

 


Maharashtra Police Bharti 2021 – The Home Department has started the process of police recruitment. For this, the finance department has also given approval and accordingly, a written examination of the candidates will be conducted at the beginning. In this regard, the Director General of Police has requested information regarding the classrooms in Zilla Parishad, Municipal Corporation, Nagarpalika, Cuttack Board, government and private secondary and higher secondary schools. Read More details at below:

पोलीस भरतीबाबत शुद्धी परिपत्रक काढणार, अनिल देशमुखांनी ग्वाही दिल्याचा मेटेंचा दावा

राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेबाबत शुद्धी परिपत्रक काढले जाणार आहे, असा दावा शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी केला. विनायक मेटेंनी काल संध्याकाळी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. पोलीस भरतीच्या जीआरवर मेटेंनी आक्षेप घेतला होता.

पोलीस भरती प्रक्रियेत इडब्ल्यूएस अर्थात आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यामुळे जीआरवर आक्षेप घेत शुद्धी परिपत्रक काढण्याची मागणी आपण केली होती. अनिल देशमुख यांनी सात जानेवारीला (आज) शुद्धी परिपत्रक काढणार, अशी ग्वाही दिल्याचा दावा विनायक मेटेंनी केला. एससीबीसीच्या विद्यार्थ्यांना इडब्ल्यूएसचा लाभ मिळेल, असा विश्वास मेटेंनी व्यक्त केला.

राज्य सरकारचा निर्णय काय?

राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण (SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरवताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाईल, असा शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला होता. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी आणि शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय घेण्यात आला.

‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाईन भरण्याची मुभा देण्यात येईल. 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी लागेल. पोलीस महासंचालकांना या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मात्र, गृह विभागाने पोलीस भरतीच्या दृष्टीने आदेश काढले.

पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा लेखी परीक्षाच ! महासंचालकांनी मागविली माहिती

गृह विभागातर्फे पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी वित्त विभागानेही मंजुरी दिली असून त्यानुसार सुरवातीला उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, कटक मंडळ, सरकारी व खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील वर्गखोल्या, आसन संख्या, उमेदवारांची बैठक क्षमता, या अनुषंगाने पोलिस महासंचालकांनी माहिती मागविली आहे.

‘एसईबीसी’च्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गाचे शुल्क
‘एसईबीसी’ आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळाल्यानंतर गृह विभागाने नवे आदेश काढत या प्रवर्गातील पात्र उमेदवारांकडून खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क भरून घ्यावे, असे स्पष्ट केले आहे. ‘एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांची पात्रता ठरविताना त्या उमेदवारांची खुल्या प्रवर्गातून वयोमर्यादा ग्राह्य धरावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम निर्णयाच्या तथा अंतरिम स्थगिती उठविण्याच्या अर्जावरील अंतिम निर्णय होईपर्यंत लागू असेल, असेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे. गृह विभागाचे उपसचिव शिरीष मोहोड यांनी पोलिस महासंचालकांनी आदेशानुसार कार्यवाही करुन तत्काळ अहवाल सादर करावा, असेही सांगितले आहे.

राज्याच्या पोलिस दलात शिपाई पदाची 22 हजारांहून अधिक पदे रिक्‍त आहेत. तत्कालीन सरकारच्या काळात पाच हजार 400 पदांच्या भरतीचा निर्णय झाला, परंतु उमेदवारांनी अर्ज करुनही परीक्षा होऊ शकली नाही. सरकार बदलल्यानंतर फडणवीस सरकारचे अनेक निर्णय महाविकास आघाडी सरकारने बदलले. विद्यमान सरकारने पोलिस भरतीसाठी सर्वप्रथम मैदानी परीक्षा व्हावी आणि त्यानंतर लेखी परीक्षा देता येईल, असा बदल प्रास्तावित केल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलिस भरतीसाठी 2019 मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांसमोर पेच निर्माण झाला असून सर्वजण संभ्रमात आहेत. दरम्यान, गृह विभागाने लेखी परीक्षा घेण्याच्या दृष्टीनेच नियोजन केल्याचे स्पष्ट झाले असून शाळा, महाविद्यालयांमधील आसन व्यवस्थेची माहिती तत्काळ मागविली आहे. माहिती देण्याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपविली आहे.


Maharashtra Police Bharti 2021 – The order was issued by the Home Department regarding Police Bharti 2021. In this report, the SEBC category students will be considered from the open category and the increased examination fee will be paid from them within 15 days after looking at the eligibility and age limit of the students concerned. Look at below details about New Order In Police Bharti 2021….

पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरूणांसाठी ही एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. पोलीस भरतीबाबत राज्य सरकारने जीआर जारी केला आहे. राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण (SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. राज्य सरकारनं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे जीआर

‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची मुभा देण्यात येईल. 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी लागेल. पोलीस महासंचालकांना या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात केली होती. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया रखडली. मात्र, आता गृह विभागाने पोलीस भरतीच्या दृष्टीने आदेश काढले आहेत. दरम्यान, 25 जानेवारीला मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच राज्याच्या गृह विभागानं नवा आदेश काढल्यानं मराठा संघटना काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.


एसईबीसी’चे आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडावी

पोलिस भरतीसंदर्भात ‘एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करुन संबंधित विद्यार्थ्यांची पात्रता, वयोमर्यादा पाहून त्यांच्याकडून वाढीव परीक्षा शुल्क 15 दिवसांत भरुन घेतले जाणार आहे. त्यानंतर पोलिस महासंचालक कार्यवाहीचा अहवाल तत्काळ शासनास सादर करणार आहेत. तसे आदेश गृह विभागाने आज काढले. दरम्यान, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम निर्णयाच्या तथा अंतरिम स्थगिती उठविण्याच्या अर्जावर अंतिम निकाल होईपर्यंत लागू राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

गृह विभागाच्या आदेशानुसार

  • ‘एसईबीसी’चे आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडावी
  • ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू करावी
  • जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून करावा विचार
  • ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारावे
  • वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरुन घेण्यात येईल; 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी
  • पोलिस महासंचालकांनी या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करावा

गृह विभागाने 2019 मध्ये पोलिस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलिस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली. मात्र, आज गृह विभागाचे उपसचिव शिरीष मोहोड यांनी पोलिस भरतीच्या दृष्टीने आदेश काढले. दरम्यान, गृह, सार्वजनिक आरोग्य व मेडिकल विभागाअंतर्गत रिक्‍त पदांची भरती करण्यास वित्त विभागाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यानुसार आता भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. मात्र, गृह विभागाच्या निर्णयात ‘एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा आणि संबंधित पात्र विद्यार्थ्यांकडून वाढीव परीक्षा शुल्क भरून घ्यावे, असे आदेशात म्हटले आहे. मात्र, या आदेशात ‘एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा ‘ईडब्ल्यूएस’मधून विचार करावा, असा उल्लेख करण्यात आलेला नाही. गृह विभागाने संबंधित विभागाला पूर्वीच्या निर्णयाचे शुध्दीपत्रक काढण्याचेही आदेश दिले आहे.

सोर्स : सकाळ


Maharashtra Police Bharti 2021 – In the Mid Of 2020, Home Minister Of Maharashtra State has announced Mega Recruitment in Police Department Of Maharashtra. He said, A total of 12,528 posts in the police force will be filled in 2020. This is a largest recruitment in State’s Police Department till Date.  So Many candidates are awaiting for this recruitment process, because students from rural and urban areas are preparing for this Maharashtra Mega Police Bharti. In this page you will get all the information regarding Maharashtra police Bharti 2021 ..Keep visiting MahaBharti.co.in for latest Update On Police Bharti..

महाविकास आघाडी सरकारच्या वतीने एकूण 12 हजार पोलीस हवालदारांची भरती करण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात 5 हजार 295 पदांची भरती करण्यात येणार आहे. याबाबत संबंधितांना लवकरच आदेश देण्यात येतील, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. तसेच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये मोठया प्रमाणात गुन्हे घडत असतात असा आरोप केला जातो. मात्र, काही वर्षांच्या तुलनेत येथील गुन्हेगारीचे प्रमाण झपाटयाने कमी झाले आहे. नागपूरमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर येथे पोलीस यूनिटची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Latest Update 30 December 2020 – देश में पुलिसकर्मियों की संख्या को लेकर पुलिस रिसर्च एंड डेवलपमेंट ब्यूरो (BPR&D) ने एक रिपोर्ट जारी की है. इसमें विभिन्न राज्यों में लगभग 5.31 लाख पुलिसकर्मियों के पद खाली हैं. वहीं केंद्रीय सशस्त्र बलों (CAPF) में 1.27 लाख पद खाली हैं.

पुलिस रिसर्च एंड डेवलपमेंट ब्यूरो (Police research & Development Bureau)  की रिपोर्ट के अनुसार साल 2019 में 1,19,069 पुलिसकर्मियों की भर्तियां की गई थी. रिपोर्ट में बताया गया है कि देश में कुल 26,23,225 पद हैं जिनमें फिलहाल 20,91,488 को भर्ती किया गया है. वर्तमान में देशभर में 1 जनवरी 2020 तक 5,31,737 पद खाली पड़े थे.

केंद्रीय गृह मंत्रालय के अधीन आने वाले पुलिस रिसर्च एंड डेवलपमेंट ब्यूरो ने बताया कि पुलिसबलों में महिला पुलिसकर्मियों की संख्या 2,15,504 है, जो कुल संख्या का 10.30 प्रतिशत है. हालांकि पिछले साल के मुकाबले इस साल महिला पुलिस की संख्या में 16.05 प्रतिशत का इजाफा हुआ है. इस रिपोर्ट के अनुसार हम कह सकते हैं कि देश की जनसंख्या के हिसाब से 1 लाख लोग पर  195.39 पुलिसकर्मी काम कर रहे हैं.

CAPF में पुलिसकर्मियों की संख्या

BPR&D की रिपोर्ट के अनुसार से सीएपीएफ (Central Armed Police Force) में कुल संख्या 11,09,511 है, जिसमें 1 जनवरी 2020 तक 9,82,391 पुलिसकर्मी काम कर रहे हैं. CAPF में इस समय 1,27,120 कर्मियों की कमी है. रिपोर्ट के मुताबिक सांसदों, विधायकों, जज व अन्य वीआईपी जिन्हें छह महीने से ज्यादा की सुरक्षा मिली है उनके लिए बड़ी संख्या में पुलिस बल तैनात किए जाते हैं.

इस रिपोर्ट के अनुसार हम कह सकते हैं कि देश की जनसंख्या के हिसाब से 1 लाख लोग पर 195.39 पुलिसकर्मी काम कर रहे हैं यानी एक पुलिसकर्मी पर करीब 512 लोगों की जिम्मेदारी है.


महाराष्ट्र के गृह मंत्री अनिल देशमुख ने रविवार को यहां कहा कि राज्य सरकार पुलिस कांस्टेबल के 12,000 पदों के लिए भर्ती करेगी, जिनमें से 5,295 पदों पर नियुक्ति के लिए जल्द ही आदेश जारी किए जाएंगे. उन्होंने यह भी कहा कि नागपुर शहर में अपराध का ग्राफ वर्ष 2019 की तुलना में काफी नीचे आया है.

नागपुर जिले की कतोल सीट से विधायक देशमुख ने संवाददाताओं से कहा, ‘ राज्य पुलिस में कुल 12,000 कांस्टेबल की भर्ती की जाएगी, जिनमें पहले चरण में 5,295 पदों पर जल्द ही नियुक्ति की जाएगी. इस बारे में यूनिट कमांडरों को आवश्यक आदेश जारी किए जाएंगे

उन्होंने कहा कि मुंबई पुलिस की तर्ज पर नागपुर में भी घुड़सवार पुलिस इकाई स्थापित की जाएगी. यह पूछे जाने पर कि विभिन्न जेलों से पैरोल पर रिहा किए गए 11,000 से अधिक बंदियों को वापस जेल कब भेजा जाएगा तो देशमुख ने कहा कि कोरोना वायरस का खतरा अभी समाप्त नहीं हुआ है

Latest Update 28 December 2020महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी येथे सांगितले की राज्य सरकार पोलिस हवालदारांच्या १२,००० पदांसाठी भरती करणार असून त्यापैकी, 5295 पदांवर नियुक्ती करण्याचे आदेश लवकरच दिले जातील. 2019च्या तुलनेत नागपूर शहरातील गुन्हेगारीचा आलेख खाली आला आहे, असेही ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यातील काटोल सीटचे आमदार देशमुख यांनी पत्रकारांना सांगितले की, “राज्य पोलिसांत एकूण १२,००० कॉन्स्टेबल भरती होणार आहेत, त्यापैकी पहिल्या टप्प्यात लवकरच 5,295 पदांची नेमणूक केली जाईल. ” यासंदर्भात युनिट कमांडर्सना आवश्यक आदेश दिले जातील. “ते म्हणाले की, मुंबई पोलिसांच्या धर्तीवर नागपुरातही आरोहित पोलिस युनिटची स्थापना केली जाईल.”

MahaPolice Recruitment 2021- ग्रामीण व शहरी भागातील लाखो तरुण पोलीस भरतीची आस लावून बसले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून भरतीच झाली नसल्याने तरुणांचे मानसिक संतुलन ढासळू लागले आहे. अनेकांना नैराश्याने ग्रासले आहे. पोलिस भरती कधी होणार असा उद्विग्न सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

राज्यात पहिल्यांदाच १२ हजार ५२८ पदांची मोठी पोलीस भरती करणार, या भरतीमध्ये मराठा आरक्षणाचा अडसर येणार नाही आदी घोषणा राज्य सरकारने केल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र या दिशेने कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

कोरोनाची साथ आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा यामुळे सर्वच स्पर्धा परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. पोलीस भरतीची तयारी करणारा विद्यार्थ्यांचा विशेष वर्ग आहे. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील, आदिवासी पट्यातील, शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पोलीस होण्याचे ध्येय ठेऊन अनेक युवक-युवती तयारी सुरू करतात.

मात्र राज्य शासनाच्या ढिलाईमुळे भरती प्रक्रिया रखडली आहे. यात हजारो तरुण-तरुणींची ऐन उमेदीची वर्षे वाया चालली आहेत. तीन वर्षे भरती झाली नसल्याने अनेकांची वयोमर्यादा ओलांडली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा विद्यार्थ्यांनी न्याय कोणाकडे मागावा, राजकारणामुळे अनेकांचे स्वप्न भंग पावते आहे या प्रश्नांंमध्ये विद्यार्थी गुरफटले आहेत. पोलीस भरती तीन वर्षे रखडल्याने आर्थिक, मानसिक प्रश्न निर्माण होत असल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

सौर्स

लोकमत


राज्यात जम्बो पोलीस भरती, साडेबारा हजार पदे भरणार; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

राज्यात जम्बो पोलीस भरती करण्यात येणार आहे. पोलीस दलातील एकूण साडेबारा हजार पदे भरण्यात येणार असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील पोलीस दलातील ही आजवरची सर्वात मोठी भरती असल्याचंही सांगण्यात येतं.

Vacancy in Maharashtra Police Constable Bharti 2021

Fresh And New VacancyTotal
Pending vacancy of 20195,297
New Vacancy of 20206726
For Police commissionerates in Mira Bhayandar &
Vasai- Virar
505
Total12528

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मीडियाशी संवाद साधत ही माहिती दिली. राज्यात पोलीस दलातील साडेबारा हजार पदे भरण्यात येणार आहेत. पोलीस शिपाई संवर्गातील १०० टक्के पदे भरण्यात येणार आहेत, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं. ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. या भरतीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुण-तरुणींना पोलीस दलात संधी मिळेल, असं सांगतानाच महाराष्ट्राच्या इतिहासातील पोलीस दलातील ही सर्वात मोठी भरती असल्याचा दावाही त्यांनी केला.

लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला होता. शिवाय अनेक पोलिसांना करोनाची लागण झाली होती. त्यात काही पोलिसांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे पोलिसांवरील हा ताण कमी करण्यासाठी पोलीस दलात नवी भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.

या पूर्वी जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पोलीस दलात दहा हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी गृहविभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या ८ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव आला होता. त्यात उपमुख्यमंत्र्यांनी आणखी दोन हजार जागा वाढवल्या होत्या. आज झालेल्या मंत्रिंडळाच्या बैठकीत आणखी अडीच हजार जागांची भर घालून साडेबारा हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला.

2 thoughts on “Maharashtra Police Bharti 2021”

Leave a Comment

सरकारी नोकरी अपडेट्स व्हाट्सप्प वर मिळवा..