Advertisement

Maharashtra TET Bharti 2022

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय ! 2013 पासूनच्या ‘TET’ची होणार पडताळणी

Maharashtra TET Bharti 2022 : The Department of Primary Education has now taken a big decision after the misconduct in the Teacher Eligibility Test. Accordingly, teachers and other candidates appointed after 13th February 2013 are required to submit their original certificates to the concerned Headmaster, Group Education Officer by 2 pm on 6th January.

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! 2013 पासूनच्या ‘TET’ची होणार पडताळणी. शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहारानंतर आता प्राथमिक शिक्षण विभागाने (मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 6 जानेवारीला दुपारी दोन वाजेपर्यंत 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्‍त झालेल्या शिक्षकांना व इतर उमेदवारांना त्यांच्याकडील मूळ प्रमाणपत्र संबंधित मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करावयाचे आहे.

Shikshan Vibhag Bharti 2022

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेचे (Maharashtra State Examination Council, Pune) आयुक्‍त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना टीईटी परीक्षेतील गैरव्यहार प्रकरणी अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत. टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन अनेकांनी नियुक्‍ती, पदस्थापना मिळविली, असा शालेय शिक्षण विभागाला संशय आहे. त्यामुळेच 4 जानेवारी रोजी त्यासंबंधीचा स्वतंत्र आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार 13 फेब्रुवारी 2013 नंतर टीईटी उत्तीर्ण होऊन शिक्षकपदी नियुक्‍त झालेल्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. सर्व गटशिक्षणाधिकारी व खासगी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना त्यासंबंधीचे सक्‍त आदेश देण्यात आले आहेत. गुरुवारी (ता. 6) दुपारी दोन वाजेपर्यंत ते प्रमाणपत्र संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व जिल्हा परिषद अथवा गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे ते प्रमाणपत्र जमा करायचे आहे. प्रत्येकांनी त्यांच्याकडील टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.

टाळाटाळ केल्यास कारवाईची शक्‍यता 

शालेय शिक्षण विभागाने (प्राथमिक) खासगी प्राथमिक शाळा व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये (ZP School) शिक्षकपदी नियुक्‍त झालेल्यांना त्यांच्याकडील मूळ प्रमाणपत्र संबंधितांकडे जमा करावे लागणार आहे. गुरुवारी (ता. 6) दुपारी दोन वाजेपर्यंत जे शिक्षक प्रमाणपत्र देणार नाहीत, त्यांच्या बाबतीतील अहवाल संबंधित शाळांचे मुख्याध्यापक गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. तो अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागाला पाठविला जाईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली.

आदेशातील ठळक बाबी…

  • 13 फेब्रुवारी 2013 नंतर टीईटी उत्तीर्ण झालेले व नियुक्‍ती दिलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची होणार पडताळणी
  • संबंधितांनी ‘टीईटी’चे (शिक्षक पात्रता परीक्षा) मूळ प्रमाणपत्र तत्काळ शिक्षण विभागाकडे सादर करण्याचे आदेश
  • सर्व गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांनी (खासगी प्राथमिक शाळा) त्यांच्या कार्यक्षेत्रातील नियुक्‍त शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करावी
  • वैयक्‍तिक मान्यता, पदस्थापना दिलेल्या शिक्षकांचे टीईटी मूळ प्रमाणपत्र 6 जानेवारीनंतर कार्यालयात सादर करावे
  • 6 जानेवारी रोजी दुपारी दोनपर्यंत प्रमाणपत्र सादर करावे; टाळाटाळ करणाऱ्यांचा अहवाल शिक्षण विभागाला होणार सादर


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ नोंदणी सुरु ! जाणून घ्या पात्रता

Maharashtra TET Bharti 2021 – MAHTET 2021 schedule has been announced by Varsha Gaikwad through her Twitter handle. The exam would be conducted between September 15 to December 31, 2021.The exam is being conducted after 2 years and would help in increasing employment opportunities. Check Maha Tet Syllabus, Maha Tet Exam Dates and Other details at below

नवीन अपडेट – Maha TET Registration date has been extended from 25th August 2021 to 5th September 2021. Read Belo Notice and apply if not applied yet

Maharashtra State Council of Examination, Pune has postponed the Maha TET (Maharashtra Teacher Eligibility Test 2021) Exam 2021 today. As per the previous schedule the exam was planned to hold on 10 October 2021. But now the board has postponed the exam.

शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ परीक्षेचे आयोजन १०.१०.२०२१ रोजी करण्यात आलेले आहे. तथापि त्यामध्ये covid -१९ प्रादुर्भाव व अन्य (MPSC / UPSC ) परीक्षा आयोजन या कारणामुळे बदल होण्याची शक्यता आहे.

 

Maha TET Registration 2021

इयत्ता ६ वी ते इ ८ वी च्या गटातील उच्च प्राथमिक शिक्षकांना नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. II संबंधित उमेदवाराने त्यांनी प्राप्त केलेल्या पदवीच्या विषयानुसार राहील. उदा. विज्ञान / गणित विषयासाठी विज्ञान / गणित विषयातील शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. II, सामाजिकशास्त्र शिक्षकांसाठी सामाजिकशास्त्र या विषयातील शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. II व इतर विषयांसाठी उपरोक्त गणित / विज्ञान आणि सामाजिकशास्त्र यापैकी कोणताही एका विषयातील शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. II उत्तीर्ण असणे आवश्यक राहील.

राज्यातील विविध शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा (महा-टीईटी) घेतली जाणार आहे

पहिली ते पाचवी गट आणि सहावी ते आठवी अशा दोन गटांसाठी परीक्षा असणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर शिक्षण विभाग टीईटी घेणार आहे. यासाठी नोंदणी‍ प्रक्रिया आणि त्याचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद लवकरच जाहीर करणार आहे.

राज्यातील सरकारी, अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सरकारने सहा हजारांहून अधिक शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी मान्यता दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी आयोजित केली जाणार आहे. यामुळे राज्यातील शाळांना मोठ्या प्रमाणात टीईटी परीक्षा देण्याची संधी शिक्षकांना उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०२१ चे वेळापत्रक- MahaTET Exam Time Table

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ आणि २ सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

अ.क्र. कार्यवाहीचा टप्पा दिनांक व कालावधी
ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ३ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१ (वेळ रात्री २३.५९ वाजेपर्यंत)
प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. २५ सप्टेंबर २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ १० ऑक्टोबर २०२१ सकाळी १०.३० ते दुपारी १
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक व वेळ १० ऑक्टोबर २०२१ दुपारी २ ते सायंकाळी ४.३०

Maha TET Exam Fee – परीक्षा शुल्क

प्रवर्ग फक्त पेपर – १ किंवा फक्त पेपर – २ पेपर – १ व पेपर – २ (दोन्ही)
सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा. / भ.ज. रू. ५००/- रू. ८००/-
अनु.जाती, अनु.जमाती व अपंग
(Differently abled person)
रू. २५०/- रू. ४००/-

MH TET Registration 2021 Link and Detailed Notification as given below

Online Registration For TET Link

Maha TET Advt 2021

Maha TET Qualification

  • Class 1 to 5th (Paper I) : (i) 12th Pass with 50% Marks (ii) D.El.Ed/ B.Ed
  • Class 6th to 8th (Paper II): (i) 12th Pass with 50% Marks & Graduation (ii) B.A./ B.Sc.Ed. or B.A.Ed./ B.Sc.Ed/ D.Ed.
  • For more qualification details refer notification.

Below is a link to Download Maha Tet Detailed Syllabus. Go through it and Prepare well for Maharashtra TET Exam 2021

Maha TET Syllabus 2021

पात्रता गुण

या परीक्षेमध्य़े किमान ६० टक्के गुण प्राप्त करणा-या उमेदवारास (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती / भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग, इतर मागासप्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि अपंग उमेदवारांना ५५ टक्के) पात्र समजण्यात येईल.

TET योग्यता प्रमाणपत्राची वैधता

वर्षा गायकवाड यांनी ‘ट्विटर हँडल’ च्या माध्यमातून स्मेट २०२० चे वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार १ सप्टेंबर, २०२१ रोजी महाहेट २०२० घेण्यात येईल. राज्यातील १ ते 8 वर्गातील शिक्षकांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

Maharashtra TET Bharti 2021

२० जुलै रोजी संध्याकाळी वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या ट्विटर हँडलद्वारे ही घोषणा केली. ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, “अध्यापनात करियर बनविण्याच्या इच्छुक उमेदवारांना संधी आहे. आम्ही महाराष्ट्र राज्य परिषद परीक्षेला परवानगी दिली आहे. 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान शिक्षक पात्रता परीक्षा (महाएएचएटीटी, 2021). ” परीक्षेची अधिकृत सूचना येथे तपासली जाऊ शकते. ही परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येते. पहिला टप्पा इयत्ता 1 ते 5 साठी अर्ज करणार्‍या इच्छुकांसाठी असेल आणि दुसरा टप्पा 6 ते 8 च्या वर्गांसाठी अर्ज करणार्या इच्छुकांसाठी असेल तर या परीक्षेसाठी प्रवेश पत्र देखील देण्यात येईल, त्यासंबंधीचा तपशील नंतर उपलब्ध करुन दिला जाईल.

MSCE चे कमिशनर तुकाराम सुपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, TET 2021ही ऑफलाईन घेतली जाणार आहे. यामध्ये ऑप्टिकल मार्क्स रेकक्निशन च्या आधारे ही परीक्षा होणार आहे. जुलै 2021 मध्ये या परीक्षेसाठी फॉर्म भरण्यास सुरूवात होणार आहे. आम्ही ऑनलाईन जाण्याचा विचार करत होतो पण त्यासाठी अजून काही काळ जाईल. सध्या ही परीक्षा ऑफलाईन माध्यमातूनच घेतली जाणार आहे.

महाराष्ट्रात पहिल्यांदा टीईटी परीक्षा 2013 साली घेण्यात आली होती. त्यानंतर सहा वेळेस परीक्षा घेण्यात आल्या आहेत. 2019 ला राज्यात शेवटची टीईटी झाली होती. मागील वर्ष दीड वर्षात राज्यात असलेलं कोरोना संकट पाहता या परीक्षेचं आयोजन करण्यात आलेले नाही. जानेवारी महिन्यात ही परीक्षा होणं अपेक्षित होते पाण तेव्हा देखील कोरोनामुळे ही परीक्षा लांबणीवर पडल्याने आता सप्टेंबर 2021 मध्ये टीईटी 2021 परीक्षेचं आयोजन केले जाणार आहे.

MAHATET 2021 Exam Date-Maharashtra Teacher Eligibility Test – 2021

Name of the Event Dates
Process begins September 15, 2021
Process ends December 31, 2021

How To Apply For Maha TET Exam 2021

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२१

१) www.mahatet.in संकेतस्थळावर भेट देणे.

२) संकेतस्थळावरील MAHATET परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती, शासन निर्णय व परिपत्रके, परीक्षेचा आराखडा व अभ्यासक्रम, वेळापत्रक, परीक्षेस प्रविष्ट होण्याच्या अटी व शर्ती, आवश्यक प्रमाणपत्रे, परीक्षा शुल्क व इतर माहितीचे बारकाईने वाचन करावे.

३) सर्व माहितीचे अवलोकन केल्यानंतरच होमपेज वरील “नवीन नोंदणी” या बटनावर क्लिक करा.

४) नोंदणी विषयी सूचना काळजीपूर्वक वाचून सूचनांच्या तळाशी असलेले चेकबॉक्स (Checkbox ) वर क्लिक केल्यानंतरच “नवीन नोंदणी” या बटनावर क्लिक करा.

५) उघडलेल्या ऑनलाईन नोंदणी अर्जात दर्शवलेली माहिती प्रथम नाव, वडिलांचे नाव, आडनाव, जन्म दिनांक (एस.एस. सी. प्रमाणपत्राप्रमाणे), मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी अचूकपणे भरा.

६) नोंदणी अर्जात नमूद केलेल्या ई-मेल व मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या SMS मधील TET Resgistration ID व Password द्वारे Login करा.

७) उघडलेल्या ऑनलाईन अर्जात दर्शविलेली माहिती अचूकपणे भरा, तसेच आपला नवीनतम फोटो आणि स्वाक्षरीची इमेज अपलोड करा. माहिती अचूकपणे भरल्यानंतर “Save & Preview” या बटनावर क्लीक करा.

८) स्क्रीनवर आलेली माहिती अचूक असल्याची खात्री करा.

९) Preview मध्ये काही बदल करावयाचा असल्यास Edit बटणाचा वापर करून बदल करू शकता. भरलेल्या माहितीची खात्री झाल्यास सबमिट (Save and Preview) या बटनावर क्लिक करा. (शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्रामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.)

१०) PAYMENT च्या पेज वर गेल्यानंतर Confirm and Pay या बटणाचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट/ डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑफलाईन शुल्क भरता येणार नाही.)

११) शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्राची प्रिंट विहित मुदतीत घेऊन अर्जदाराने जतन करून ठेवावी त्याकरिता Preview / Print या टॅब चा वापर करावा. तसेच Transaction History या टॅब वर क्लिक करून झालेल्या Transaction ची माहिती पाहता येइल.

१२) आवेदनपत्राची एक प्रत तुमच्या माहितीसाठी स्वतःजवळ जतन करून ठेवावी.


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) नवीन अपडेट – “या” महिन्यामध्ये टीईटी 2021 परीक्षेचं आयोजन केले जाणार !! अर्ज प्रक्रिया जुलैपासून

Maharashtra TET Bharti 2021 – All Aspirants who are in search of Teaching Job or Awaited for MH TET Exam 2021 here is a goof news For Them. The Maharashtra State Council of Examination (MSCE) is going to conduct Teacher Eligibility Test (TET) in September. The online process to fill forms for the examination will starts in July. Read Latest Update On Maharashtra TET Bharti 2021, MH TET Registration 2021, TET Maharashtra 2021 Application Form at below section

MH TET Registration 2021

महाराष्ट्रामध्ये टीचर्स एजिबिलिटी टेस्ट यंदा सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. नुकतीच पुण्याच्या महाराष्ट्र स्टेट काऊंसिल ऑफ एक्झामिनेशन कडून त्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान शिक्षणक्षेत्रामध्ये शिक्षकी पेशा स्वीकारू इच्छिणार्‍या उमेदवारांना ही टीचर्स एजिबिलिटी टेस्ट पार करणं आवश्यक आहे. 19 जानेवारी 2019 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच TET योग्यता प्रमाणपत्राची वैधता आता 7 वर्षावरून आजीवन करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदी सरकारने केली होती. त्यामुळे आता अनेकांना या परीक्षेबाबत उत्सुकता वाढली आहे.

TET Maharashtra 2021 Application Form

टाईम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना, MSCE चे कमिशनर तुकाराम सुपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, TET 2021ही ऑफलाईन घेतली जाणार आहे. यामध्ये ऑप्टिकल मार्क्स रेकक्निशन च्या आधारे ही परीक्षा होणार आहे. जुलै 2021 मध्ये या परीक्षेसाठी फॉर्म भरण्यास सुरूवात होणार आहे. आम्ही ऑनलाईन जाण्याचा विचार करत होतो पण त्यासाठी अजून काही काळ जाईल. सध्या ही परीक्षा ऑफलाईन माध्यमातूनच घेतली जाणार आहे.

महाराष्ट्रात पहिल्यांदा टीईटी परीक्षा 2013 साली घेण्यात आली होती. त्यानंतर सहा वेळेस परीक्षा घेण्यात आल्या आहेत. 2019 ला राज्यात शेवटची टीईटी झाली होती. मागील वर्ष दीड वर्षात राज्यात असलेलं कोरोना संकट पाहता या परीक्षेचं आयोजन करण्यात आलेले नाही. जानेवारी महिन्यात ही परीक्षा होणं अपेक्षित होते पाण तेव्हा देखील कोरोनामुळे ही परीक्षा लांबणीवर पडल्याने आता सप्टेंबर 2021 मध्ये टीईटी 2021 परीक्षेचं आयोजन केले जाणार आहे.


टीईटी उत्तीर्ण  नसलेल्या शिक्षकांसाठी महत्वाची बातमी 

Maharashtra TET Bharti 2021 – Only teachers who have passed the TET can remain in the service, the Aurangabad bench has ruled. As a result, thousands of teachers’ jobs in subsidized schools in the district that did not pass the TET have been threatened. There are at least 3,000 teachers in non-subsidized schools in the district who have not even passed the TET.

शासनाने शिक्षक म्हणून रुजू होताना २०१३ पासून शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. विशेष म्हणजे २०१२ पासून शिक्षक भरती बंद करण्यात आली होती; परंतु संस्थाचालकांनी विषयशिक्षकांच्या नावाने मोठ्या प्रमाणात भरती केली. या भरतीत मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झालेली होती; परंतु ज्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती, अशा डी.एड., बी.एड. झालेल्या शिक्षकांनी टीईटीची परीक्षा दिली. २०१३ पासून आजपर्यंत राज्यात किमान ९० हजारांच्या जवळपास टीईटी पात्रताधारक आहेत. टीईटी उत्तीर्ण झालेले हे शिक्षक नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. यातील अनेकांचे वयसुद्धा निघून गेले आहे. औरंगाबाद न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे टीईटी पात्र शिक्षकांची अपेक्षा वाढली आहे; तर दुसरीकडे टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.

अनुदानित शाळेतील शिक्षक – १४९७२
टीईटी उत्तीर्ण जिल्ह्यातील शिक्षक – १३८४२
टीईटी उत्तीर्ण नसलेले शिक्षक – ३०००

अनेक शिक्षकांच्या नियुक्तीपत्रात व मान्यता आदेशात टीईटीबाबत उल्लेख नाही. अशा शिक्षकांवर न्यायालयाच्या निर्णयामुळे अचानक गदा येणार आहे, याचा सहानुभूतिपूर्वक विचार करून या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करण्यासाठी अजून संधी उपलब्ध करून द्यावी


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) नवीन अपडेट -परीक्षा न दिलेले शिक्षक अपात्र ठरणार

Maharashtra TET Bharti 2021 – During the final hearing in the bench, all the petitions seeking extension and challenge of the examination were rejected, stating that the provisions of the Teacher Eligibility Test were in accordance with the Right to Education Act and could not be changed. Assistant Public Prosecutor A. from the Government. R. Kale saw the work.

शिक्षक पात्रता परीक्षेलाच (टीईटी-टीचर इलिजिबिलिटी टेस्ट) आव्हान देणाऱ्या व उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढीची मागणी करणाऱ्या ८९ रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी फेटाळल्या. या निर्णयामुळे शिक्षक पात्रता परीक्षा न दिलेले प्राथमिकचे शिक्षक अपात्र ठरणार आहेत.

३१ मार्च २०१९ पर्यंत टीईटी न दिलेल्या शिक्षकांना मुदतवाढ देण्यात आली होती

याचिकांनुसार भारत सरकारच्या शिक्षण हक्क कायद्यान्वये (आरटीई) शिक्षक पात्रता परीक्षा देणे बंधनकारक आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, काही शिक्षकांनी परीक्षा देण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ मागितली. यासंदर्भात सरकारने आदेश काढून ३१ मार्च २०१९ ही मुदत दिली होती. तरीही नाराजीतून अनेक शिक्षकांनी खंडपीठात रिट याचिका दाखल केल्या होत्या. या प्रकरणात अंतरिम स्थगिती आदेशही देण्यात आला होता.


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण झालेल्या राज्यातील ४० हजार उमेदवारांना नवीन प्रमाणपत्र

Maharashtra TET Bharti 2021 – The State Council of Teacher Education has decided to give lifetime validity to the certificates of TET passing candidates. Therefore, 40,000 teachers in the state will have to be given new certificates.

राज्य शिक्षक  शिक्षण परिषदने TET उत्तीर्ण उमेदवारांच्या प्रमाणपत्राला आजीवन वैधता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील ४० हजार शिक्षकांना नवीन प्रमाणपत्रे द्यावे लागणार .

राज्यात 2015 नंतर TET  उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांवर सात वर्षांच्या वैधतेचा उल्लेख नाही. त्यामुळे 2015 नंतरच्या उमेदवारांना नवीन प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. तर 2013 आणि 2014 च्या TET प्रमाणपत्रावर वैधतेचा कालावधी नमूद केलेला असल्याने त्या उमेदवारांना नवीन प्रमाणपत्र द्यावे लागेल.

त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेला राज्यातील 40 हजार 667 उमेदवारांना आता नवीन TET उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. TET उत्तीर्ण प्रमाणपत्राची वैधता आजीवन करण्यात आल्याने आता मुदत संपलेल्या उमेदवारांना नवीन प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक टी प्रक्रिया राबवली जाईल.


Maharashtra TET Bharti 2021 –  The certificates of 31,000 candidates in the state who passed the Maharashtra Teacher Eligibility Test (TET) in 2013 will expire in 2021. This certificate is valid for seven years. As it is clearly stated on the certificate. Read below Article On Shikshak Bharti 2021

सन २०१३ मध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण झालेल्या राज्यातील ३१ हजार उमेदवारांची प्रमाणपत्रे २०२१मध्ये मुदतबाह्य होणार आहेत. या प्रमाणपत्राची वैधता सात वर्षे असते. प्रमाणपत्रावर तसे स्पष्ट नमूद करण्यात आले असल्याने या प्रमाणपत्रधारकांची पंचाईत होणार आहे.

गत सात वर्षांपासून विविध विषयांतील पदवीधर युवक शिक्षण शास्त्रातील पदवी, पदविका व टीईटी उत्तीर्ण परीक्षेचे प्रमाणपत्र घेऊन प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये नोकरी मिळण्याचे आशेवर वणवण भटकत आहेत. मात्र, अद्यापही नोकरी मिळाली नाहीच.

दिवसेंदिवस अनुदानित शाळांतील घटत्या पटसंख्येमुळे संचमान्यतेत शिक्षक संख्या कमी होत आहे. शिक्षक अतिरिक्त होत आहे. अद्याप अतिरिक्त शिक्षकांचा तिढाही कायम आहे. अशातच या ३१ हजार शिक्षकांची टीईटी परीक्षा प्रमाणपत्रे मुदतबाह्य झाल्यामुळे त्यांच्या समोर भवितव्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

शासकीय अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया गत दहा वर्षांत विविध कारणांनी रखडली आहे. मेहनत आणि चिकाटीने अभ्यास करून २०१३ मध्ये ३१ हजार ७२ विद्यार्थी टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले. मात्र, त्यांना अद्याप नोकऱ्या नाहीत. बेरोजगार असणाऱ्या या शिक्षकांची टीईटी प्रमाणपत्र अवैध होणार असून २०२१ पासून पुढील शिक्षक भरतीसाठी हे उमेदवार अपात्र ठरणार आहेत.

अशा उमेदवारांना आपले प्रमाणपत्र पुन्हा मिळविण्यासाठी पुन्हा टीईटी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. ज्यात दहा लाखांहून अधिक बीएड, डीएडधारक बेरोजगार आहेत. दहा वर्षांपासून शिक्षक भरती रखडली आहे. आता कुठे शिक्षक भरती सुरू होणार तशात या ३१ हजार उमेदवारांची टीईटी प्रमाणपत्र कालबाह्य होणार असल्याने त्यांचेवर संकट ओढवले आहे.

कायम वैधतेचा निर्णय तत्काळ घ्यावा

२०१३ ते २०१९ या कालावधीत टीईटी उत्तीर्ण होऊन शिक्षक पात्रता प्रमाणपत्र प्राप्त करणारे राज्यात ८६,२९८ उमेदवार आहेत. २१३ मध्ये उत्तीर्ण झालेले ३१ हजार उमेदवार व २०१४ ते २०१९ पर्यंत उत्तीर्ण झालेले आणखी ५५ हजार उमेदवार नोकरीशिवाय घरी बसून आहेत. यापैकी अनेक जणांनी सेंट्रल टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

अनेक उमेदवारांनी केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालयात पार्ट टाइम किंवा कंत्राटी तत्त्वावर शिक्षक पदावर रुजू होऊन तात्पुरती सोय केली आहे. मात्र नोकरीत कायम होण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागणार आहे. २०२१नंतर टीईटी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शासनाकडून कायम वैधता मिळणार असल्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन असल्याची चर्चा आहे.

Leave a Comment