MPSC Vacancy 2021

महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथे “सहाय्यक प्राध्यापक, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी” पदांची भरती !!

MPSC Vacancy 2021 – MPSC  has issued job recruitment Notification for Various Posts like Deputy Director, Professor , Assistant Professor, Associate Professor, Administrative Officer Group-B and Group A. This vacancies will be filled for Government Medical College, Satara, Alibaug, Nandurbar and Sindhudurg, Maharashtra Medical and Health Services. There is 48 vacant posts to be filled under MPSC Vacancy 2021. Those candidates who wish to apply for MPSC Bharti 2021, MPSC Recruitment 2021 can apply Online from 8th October 2021 and the last date to apply for MPSC Job Vacancy 2021 is 28th October 2021. More details about MPSC GMC Recruitment 2021 are as given below:

MPSC Recruitment 2021 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “उपसंचालक, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी” पदांच्या  एकूण 48 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

कोणत्या पदांसाठी जाहिरात ?

राज्य लोकसेवा आयोगाने वेगवेगळ्या विभागांसाठी सलग एकूण तीन जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. आरोग्य, सार्वजिनक विभागासाठी ही पदभरती केली जाणार आहे. यामध्ये गट अ आणि गट ब संवर्गातील काही पदांचा समावेश आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर याविषयीची सविस्तर माहिती मिळेल.

  • पदाचे नाव –उपसंचालक, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी
  • पद संख्या –48 जागा
  • वयोमर्यादा – 18 वर्ष ते 38 वर्ष
  • फीस –
    • अराखीव प्रवर्ग – रु. 719/-
    • मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अनाथ – रु. 449/-
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑक्टोबर 2021

रिक्त पदांचा तपशील – MPSC GMC  Recruitment 2021

01 Deputy Director 04 Posts
02 Professor 05 Posts
03 Assistant Professor 13 Posts
04 Associate Professor 17 Posts
05 Administrative Officer 09 Posts

MPSC Assistant Professor Bharti 2021  – Application Fees

Open category ₹ 719/-
Reserved category ₹ 449/-

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MPSC Bharti 2021

📝 अर्ज करा
जाहिरात वाचा -DD
जाहिरात वाचा -Professor
जाहिरात वाचा -AO
अधिकृत वेबसाईट

MPSC Vacancy 2021 – Maharashtra Public Service Commission has issued latest recruitment Notification for Various Posts like Chief Administrative Officer, Administrative Officer, Associate professor in Various Subjects, Professor, Dean, Maharashtra Medical Education and Research Service, Group-B and Group A. There is 228 vacant posts to be filled under MPSC Vacancy 2021. Those candidates who wish to apply for MPSC Assistant Professor Bharti 2021, MPSC Assistant Professor Recruitment 2021 can apply Online from 20th September 2021 and the last date to apply for MPSC Job Vacancy 2021 is 11th October 2021. More details about MPSC AMO Recruitment 2021 are as given below:

MPSC Recruitment 2021 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “मुख्य प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, डीन” पदांच्या  एकूण 228 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – मुख्य प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, डीन
  • पद संख्या –228 जागा
  • वयोमर्यादा – 18 वर्ष ते 40 वर्ष
  • फीस –
    • प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, सहायक प्राध्यापक
      • अराखीव प्रवर्ग – रु. 719/-
      • मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अनाथ – रु. 449/-
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑक्टोबर 2021

रिक्त पदांचा तपशील – MPSC Recruitment 2021

01 Assistant Professor 111 Posts
02 Administrative  Officer 18 Posts
03 Professor 91 Posts
04 Chief Administrative Officer 02 Posts
05 Dean 06 Posts

MPSC Assistant Professor Bharti 2021  – Application Fees

Open category ₹ 719/-
Reserved category ₹ 449/-

‘MPSC’ न्यायालयाकडे स्वतंत्र परवानगी मागणार – ‘स्थापत्य’च्या मुलाखतीसाठी’

MPSC Vacancy 2021 -The MPSC has informed that the interviews of 3600 posts of Civil Engineering of Maharashtra Public Service Commission (MPSC) have been stalled due to court process and the court’s counsel will request the court to allow us to conduct these interviews immediately. The revelation was made on Twitter by the members of the MPSC after the Loksatta reported that the interviews were delayed due to the time consuming nature of the MPSC.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्थापत्य अभियांत्रिकीच्या ३६०० पदांच्या मुलाखती न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे रखडल्या असून या मुलाखती घेण्यासाठी न्यायालयाने आम्हाला त्वरित परवानगी द्यावी, अशी विनंती आयोगाच्या वकिलाकडून न्यायालयात केली जाणार असल्याची माहिती एमपीएससीकडून देण्यात आली आहे. ‘एमपीएससी’च्या वेळकाढूपणामुळे मुलाखती रखडल्याच्या ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर ‘एमपीएससी’च्या सदस्यांकडून ट्विटरवर हा खुलासा करण्यात आला आहे.

स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११४५ जागांसाठी सुरुवातीला ३६०० उमेदवारांची निवड करण्यात आली होती. ५ जुलैच्या शासन निर्णयानुसार या ११४५ जागांमध्ये एसईबीसी प्रवर्गासाठी असलेल्या १३ टक्के जागा खुल्या वर्गामध्ये रूपांतरित करण्यात आल्या. यानंतर ईडब्ल्यूएस प्रवर्गातील कमी गुण असणारे काही उमेदवार वगळले गेले. यातील एका उमेदवाराने मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुधारित यादीला आवाहन देणारी याचिका  केली. याशिवाय अन्य विभागातील ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांनीही मुंबई उच्च न्यायालयात याच धर्तीवर याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाने महावितरण, एमपीएससी आणि अन्य विभागातील याचिका एकत्रित केल्या. त्यामुळे एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या मुलाखती रखडल्याचे आयोगाने स्पष्ट केले.  एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या पदांच्या मुलाखती या तातडीने घेणे आवश्यक असून त्यासाठी न्यायालयाने परवानगी द्यावी, अशी विनंती केली जाणार आहे. ‘एमपीएससी’ आज बाजू मांडणार एमपीएससीच्या वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या याचिकेत सोमवारी मध्यस्थी केली जाणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालय आणि राज्य शासनाच्या ५ जुलैच्या शासन निर्णयाचा दाखला देत या पदांची मुलाखत घेण्यासाठी स्वतंत्र परवानगी द्यावी, अशी विनंती केली जाणार असल्याची माहिती आहे.

स्थापत्य अभियांत्रिकी पदाच्या मुलाखती लवकर व्हाव्या अशी काळजी आयोगालाही आहे. मात्र, न्यायालयात ईडब्ल्यूएस प्रवर्गातील काही विभागांच्या याचिका एकत्रित केल्याने उशीर झाला आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयाला स्थापत्य अभियांत्रिकीच्या मुलाखती लवकर घेण्यासाठी स्वतंत्र परवानगी मागणार आहोत.– दयावान मेश्राम, सदस्य, एमपीएससी.


आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागात MPSC अंतर्गत 15 हजार जागा भरणार

MPSC Vacancy 2021  – The Maharashtra Public Service Commission (MPSC) will soon begin the process of filling up a total of 15,511 posts from Group A to C in the Department of Public Health and Medical Education. Some important decisions have been taken in the meeting chaired by Deputy Chief Minister Ajit Pawar in connection with the examinations conducted by MPSC and recruitment of Vacant Posts.

सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना भरतीच्या निर्बंधामधून सूट दिली असून गट ‘अ’ ते ‘क’ पर्यंतची एकूण १५ हजार ५११ जागा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी बुधवारी दिली. भरणे म्हणाले, ‘‘एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्‍त जागांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले घेतले आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग इत्यादी विभागांना जागा भरतीच्या निर्बंधांमधून सूट दिली आहे. तसेच गट ‘अ’ ची चार हजार ४१७ जागा, गट ‘ब’ ची आठ हजार ३१ आणि गट ‘क’मधील तीन हजार ६३ जागा अशा एकूण १५ हजार ५११ जागा भरण्यास अर्थ विभागाने २०१८ पासून मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने त्यांचे आरक्षण तपासून भरती गतीने राबविण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.’’

उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने ‘एमपीएससी’ सदस्यांच्या चार रिक्त जागा भरणे गरजेचे आहे. यासाठी जुलै अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्याबाबतही बैठकीत निर्देश दिले. याशिवाय केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यसंख्येत वाढ करण्याच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा करण्यात आली, जेणेकरून भविष्यातील मुलाखती गतीने पार पाडता येतील.


MPSCच्या 817 पदांची भरती प्रक्रिया लवकर सुरू करण्याच्या सूचना !!

MPSC Vacancy 2021 – An important meeting was held today in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar. The meeting also discussed the recommendations made by the MPSC for 817 seats, he said. So in Upcoming days these vacant posts will get filled by MPSC

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत MPSC ने 817 जागांसाठी केलेल्या शिफारशीबाबतही चर्चा झाल्याची माहिती भरणे यांनी दिलीय. SEBCच्या जागांबाबत आम्ही विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागितला आहे. आज संध्याकाळपर्यंतच तो अभिप्राय येईल, असं सांगतानाच आयोगावर 31 जुलैपर्यंत सदस्यांची रिक्त पदे भरली जातील असंही भरणे यांनी सांगितलं.

या बैठकीत 48 SEBC सह 413 विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचं आश्वासन देण्यात आल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधींनी दिली आहे. MPSCच्या 817 पदांची भरती लवकरच केली जाणार आहे. SEBC च्या कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, असा दावा यावेळी भरणे यांनी केलाय. तसंच 31 जुलैपर्यंत MPSC आयोगावर 4 सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

MPSC च्या परीक्षांचं वेळापत्रक एक वर्ष आधी जाहीर करण्याची सूचना

त्याचबरोबर UPSC च्या धर्तीवर राज्यात MPSC च्या परीक्षांचं वेळापत्रक एक वर्ष आधी जाहीर करण्याची सूचनाही आजच्या बैठकीत अजित पवार यांनी MPSCला दिल्याचं भरणे म्हणाले. 15 हजार 717 पदांच्या भरतीची प्रक्रियाही लवकर सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोना काळात वित्त विभागाने शासकीय भारतीवर बंदी आणली होती. ही पदे भरण्यासाठी ती बंदी काहीशी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही भरणे यांनी सांगितलं.


MPSC Vacancy 2021 – The finance department has given the green light to fill a total of 15,515 posts in the state. Necessary action will be taken with the approval of the Finance Department, Deputy Chief Minister Ajit Pawar announced in the Assembly. Check below Update on MPSC Vacancy 2021

राज्यात १५ हजार ५१५ MPSC ची पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता

महाराष्ट्रात २०१८ पासून रिक्त असलेली विविध श्रेणीतील रिक्त पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यासाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. राज्यातील एकुण १५ हजार ५१५ पदे भरण्यासाठी वित्त विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. वित्त विभागाच्या मान्यतेमुळे आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केले. ही रिक्त पदे भरणे आवश्यक असल्याच्या अनुषंगाने उपाययोजना करत ठोस निर्णय घेण्यात आला. या भरतीसाठी मान्यता देण्यात आल्याचेही अजित पवार यांनी विधानसभेत सभागृहाला सांगितले.

परीक्षांचे निकाल जलद गतीने लावण्यासाठी उपाययोजना करताना ठोस निर्णय घेण्यात आले. त्यासाठीच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला रिक्त पदे भरण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
या एकुण १५ हजार ५१५ रिक्त पदांमध्ये गट अ, ब आणि क श्रेणीतील रिक्त पदांचा समावेश आहे. अप्पर मुख्य सचिव वित्त विभागाकडून या पदांच्या भरतीसाठी मान्यता देण्यात आली आहे. एमपीएससीची रिक्त पदे तातडीने भरावीत अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत होती. या पदांच्या भरतीला आता वित्त विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये ही भरती प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील असेही अजितदादांनी सभागृहाला सांगितले.

कोणत्या गटाअंतर्गत किती जागा ?

  • गट जागा
    अ ४४१७
    ब ८०३१
    क ३०६३
  • एकुण जागा – १५ हजार ५१५

Table of Contents

Leave a Comment