ZP Sangli Bharti 2021

“या” जिल्हा परिषदेत बांधकाम ते पशुसंवर्धन विभागात अनेक महत्वाची पदे रिक्त !

ZP Sangli Bharti 2021 –  As many as 109 posts are vacant in various departments of Zilla Parishad. This proportion is as critical as 33% of the sanctioned posts. The process of recruitment or transfer of new officers to these posts is in full swing. As a result, the pace of development work has slowed down. The Department of Animal Husbandry and Education has a big problem. Read below update on ZP Sangli Bharti 2021:

Zilla Parishad Sangli Bharti 2021– जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील तब्बल १०९ पदे रिक्त आहेत. हे प्रमाण मंजूर पदांच्या ३३ टक्के इतके गंभीर आहे. या पदांवर भरती किंवा नवीन अधिकाऱ्यांची बदली होण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. त्यामुळे विकास कामांची गतीही रोडावली आहे. पशुसंवर्धन आणि शिक्षण विभागाची मोठी अडचण झाली आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्रव्यवहार केला आहे, मात्र शासनाकडून अद्याप फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. पालकमंत्री जयंत पाटील यांनी या विषयात लक्ष घालण्याची ग्वाही दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या वित्त आणि लेखा विभागाचा अपवाद वगळता अन्य सर्व विभागांमध्ये रिक्त जागांची समस्या आहे. शिक्षण विभागाने आता मॉडेल स्कूलचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. परंतु, जिल्हा शिक्षणाधिकारी हे महत्त्वाचे पदच रिक्त आहे. त्या शिवाय, एकूण सतरा पदे रिक्त आहेत. त्यात शिक्षकांच्या पदांचा समावेश नाही. ही प्रशासकीय पदे आहेत. पालकमंत्री जयंत पाटील यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. हा विषय येत्या काही दिवसांत मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

पशुसंवर्धन हा जिल्ह्यातील महत्त्वाचा शेती पूरक व्यवसाय आहे. त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहेत. तब्बल ५१ पदे रिक्त आहेत. ही पदे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची आहेत. त्यामुळे उपलब्ध डॉक्‍टरांवर प्रचंड ताण आहे. या सर्व परिस्थितीत पद भरतीसाठी ग्रामविकास विभागाकडे ताकदीने पाठपुरावा सुरू आहे. त्यात किती यश येते, याकडे लक्ष असेल.

विभागनिहाय रिक्त पदांची माहिती 

Sr. NoName Of DepartmentNo Of Vacancy
01बांधकाम विभाग04
02जलसंधारण07
03पाणीपुरवठा06
04आरोग्य14
05पशुसंवर्धन51
06कृषी02
07समाजकल्याण01
08शिक्षण17
09बाल विकास07

 

प्रतिक्रिया

जिल्हा परिषदेच्या कामकाजात रिक्त पदांची अडचण मोठी आहे. कामे गतीने मार्गी लागत नाहीत आणि एखादा नवा उपक्रम हाती घ्यायचा तर मनुष्यबळाची अडचण होते. त्या बाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.
– प्राजक्ता कोरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद

जिल्हा परिषद अध्यक्षांना मी मंत्रालयात बोलावले आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या सोबत एक बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला जाईल. मी या विषयात लक्ष घातले आहे.
-जयंत पाटील, पालकमंत्री, सांगली.

Leave a Comment

सरकारी नोकरी अपडेट्स व्हाट्सप्प वर मिळवा..