उमेदवारांसाठीच्या कमाल संधींची मर्यादा MPSC कडून रद्द- MPSC Recruitment 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पदभरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या कमाल संधींबाबत फेरबदल केला आहे. उमेदवारांच्या कमाल संधींची मर्यादा रद्द करण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला असून, आता पूर्वीप्रमाणेच उमेदवारांना प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

एमपीएससीमार्फत विविध शासकीय पदांच्या भरती परीक्षा घेतल्या जातात. या प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची नियुक्तीसाठीची शिफारस एमपीएससीकडून शासनाला केली जाते.

एमपीएससीने निश्चित केलेल्या वयोमर्यादेत उमेदवाराला कितीही वेळा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होती. मात्र निवड प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून एमपीएससीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर खुल्या गटातील (अराखीव) उमेदवारांना कमाल सहा संधी, उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल नऊ संधी २०२० मध्ये निश्चित केल्या, तर अनुसूचित जातीजमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नसल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले होते.

या निर्णयाच्या अनुषंगाने संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. मात्र आता एमपीएससीकडून या निर्णयात फेरबदल करण्यात आला आहे.

MPSC Rajyaseva Bharti Exam 2022:The Maharashtra Public Service Commission (MPSC) has made the General Study Paper 1 (200 marks) and General Studies Paper 2 (200 marks) the qualifying rule for the pre-service examination. In order to qualify for the main examination, the Commission has made it mandatory to get at least 33% marks in Paper 2. Students who get 33% marks in this paper will now be declared merit list for the main examination based on the marks in paper 1. The students have welcomed the decision as it would benefit the UPSC.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सामान्य अध्ययन पेपर १ (२०० गुण) आणि सामान्य अध्ययन पेपर २ (२०० गुण) या दोन पेपरपैकी सामान्य अध्ययन पेपर २ हा अर्हताकारी नियम लागू (क्वालिफाय) केला आहे. मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय करण्यासाठी आयोगाने या पेपर २ मध्ये किमान ३३ टक्के गुण मिळवणे बंधनकारक केले आहे. या पेपरमध्ये ३३ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर १ मधील गुणांच्या आधारे आता मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी यापुढे जाहीर करण्यात येणार आहे. यूपीएससीच्या धर्तीवर फायदा होणार असल्याने विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सामान्य अध्ययन पेपर १ आणि २ मधील निर्णय निर्धारण व समस्येचे निराकारण (डिसिझन मेंकिंग अॅण्ड प्रोब्लेम स्वॅल्विंग) चे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांकरीता नकारात्मक गुणदान लागू राहणार आहे. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५ टक्के किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा तसेच एखाद्या प्रश्नाचे एकापेक्षा अधिक उत्तरे लिहिल्यास २५ टक्के गुण वजा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही, असे आयोगाने बुधवारी काढलेल्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट केले आहे. तसेच राज्यसेवा पूर्वपरीक्षा मराठी आणि इंग्रजी या माध्यमातून देता येणार आहे. परीक्षेची पद्धत वैकल्पिक (ऑब्जेक्टिव्ह) आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम (एकूण गुण ४००)

पेपर १ (२०० गुण)

१) राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी. २) भारतीय इतिहास (महाराष्ट्रच्या संदर्भात) आणि राष्ट्रीय चळवळ.

(३) महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा भौतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल.

४) महाराष्ट्राची व भारताची राज्यव्यवस्था आणि शासन. ५) आर्थिक व सामाजिक विकास.

६) पर्यावरण परिस्थिती.

७) सामान्य विज्ञान.

पेपर २ (२०० गुण)

१) आकलन क्षमता.

२) वैयक्तिक कौशल्य संवाद कौशल्यासह. ३) तार्किक व विश्लेषण क्षमता.

४) निर्णय निर्धारण व समस्येचे निराकरण.

५) सामान्य बौद्धीक क्षमता.

६) मूलभूत संख्याशास्त्र.

७) मराठी व इंग्रजी भाषा आकलन कौशल्ये (दहावी/बारावी)


MPSC Preliminary Exam 2022 :

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 मध्ये 100 जागांची वाढ. आता एकूण 390 जागांसाठी परीक्षा होणार !!

MPSC Rajyaseva Bharti Exam 2021-22 : – Maharashtra Public Service Commission, MPSC State Service Exam 2021 notification was released on October 4, 2021. The written exam would be conducted for around 390 vacancies in various departments on January 2, 2022. Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced vacancies for the posts of Deputy Collector, Deputy Superintendent, Assistant Commissioner of State Taxes, Room Officer and other posts. Candidates who are interested to apply for state service examination can get more details on the official website of MPSC, mpsc.gov.in. Application forms can be submitted from 05th October 2021 to 25th October 2021 2 November 2021 on the official website

राज्य सेवा पूर्व परीक्षा ची पण नवीन फॉर्म भरण्यासाठी लिंक open… ज्यांची वयोमर्यादा संपली आहे अश्यासाठी..

MPSC Rajyaseva Bharti Exam 2021

राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात येत आहे

MPSC Rajyaseva Bharti Exam 2021

Increase of 100 seats in State Service Pre-Examination 2021. Now there will be an examination for a total of 390 seats …!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी, तर मुख्य परीक्षा 7 ते 9 मे रोजी होणार आहे. एकूण 390 पदांसाठी ही परीक्षा होत असून, राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर परीक्षा होणार असल्याचे आयोगाने सोमवारी जाहीर केले. त्यामुळे स्पर्धा परीक्षा उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 390 पदांसाठी प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अर्ज दाखल करण्यासाठी २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुदत दिली 

एमपीएससीनं नवीन परिपत्रक काढत अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ दिल्याचं जाहीर केलं आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक २ नोव्हेंबर २०२१ रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. एकूण 20 संवर्गातील 390 पदांची जाहिरात आली आहे. विद्यार्थ्यांना विहित मुदतीत अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलंय.

MPSC Rajyaseva Bharti Exam 2021

जाहिरात क्रमांक 106/2021 राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 आयोगाच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 मध्ये 100 जागांची वाढ. आता एकूण 390 जागांसाठी परीक्षा होईल …!

पदाचे नाव & तपशील: Vacancy Details For MPSC Rajyaseva Bharti 2021

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 उप जिल्हाधिकारी, गट-अ 12
2 पोलीस उप अधिक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट-अ 16
3 सहायक राज्य कर आयुक्त, गट-अ 16
4 गट विकास अधिकारी व तस्यम पदे, गट-अ 15
5 सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ 15
6 उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ 04
7 सहायक कामगार आयुक्त, गट-अ  22
8 उपशिक्षणाधिकारी व तस्यम पदे, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब 25
9 कक्ष अधिकारी, गट-ब 39
10 सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब 04
11 सहायक गटविकास अधिकारी, व तस्यम पदे, गट-ब 17
12 सहायक निबंधक सहकारी संस्था, गट-ब 18
13 उप अधीक्षक, भूमि अभिलेख, गट-ब 15
14 उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,  गट-ब 01
15 सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क,  गट-ब 01
16 कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी,  गट-ब 16
17 सरकारी कामगार अधिकारी,  गट-ब 54
Total 290

MPSC Rajyaseva Bharti 2021

उपजिल्हाधिकारी (12 पदे), पोलीस उपअधीक्षक आणि सहायक पोलीस आयुक्‍त (16), सहायक राज्य कर आयुक्‍त (16), गटविकास अधिकारी (15), वित्त व लेखा सेवा सहायक संचालक (15), सहायक कामगार आयुक्‍त (22), उपशिक्षणाधिकारी (25), कक्ष अधिकारी (39), सहायक गटविकास अधिकारी (17), सहायक निबंधक सहकारी संस्था (18), कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी (16), सरकारी कामगार अधिकारी (54) अशा एकूण 390 पदांसाठी ही परीक्षा होणार आहे.

Application Fee For MPSC Rajya Seva Purv Pariksha 2021

राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी 5 ऑक्‍टोबरपासून अर्ज करण्याची सुरुवात होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत राहील. खुल्या प्रवर्गासाठी 544 रुपये, तर मागासवर्गीय गटांसाठी 344 रुपये अर्जाचे शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. सविस्तर माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राज्य सेवा परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक काय?

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. 2021 च्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास 5 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक २ नोव्हेंबर २०२१ आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MPSC Rajyaseva Bharti Exam 2021

? PDF जाहिरात- शुद्धिपत्रक
https://bit.ly/3Clrua2
? PDF जाहिरात
https://bit.ly/3Clrua2
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3mXrwAb

 


MPSC च्या रिक्त पदांची लवकरच भरती

MPSC Bharti 2021 -The Maharashtra government on Wednesday relaxed the restrictions put on the recruitment process as a special case to make way for the recruitment by the Maharashtra Public Service Commission (MPSC). All the government departments have been asked to submit a proposal of vacant posts to the MPSC by August 15.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेली आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 28 जुलै रोजी झालेल्या बैठकीनंतर अवघ्या दोन दिवसांत 30 जुलै रोजी वित्त विभागाचा हा शासन निर्णय जारी झाला आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित विभागांनी बिंदू नामावली तयार करुन, उचित मान्यता घेऊन 30 सप्टेंबरपर्यंत “एमपीएससी’कडे प्रस्ताव पाठविण्याचे शासननिर्णयात स्पष्ट केले आहे.

राज्य शासनातील एमपीएससीकडील पदांच्या भरतीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील 28 जुलै रोजी मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याबैठकीत एमपीएसच्या पदभरतीसंदर्भातील हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर तातडीने हा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे.

ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन राज्यातील कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित विभागांनी 30 सप्टेंबरपर्यंत “एमपीएससी’कडे रिक्तपदांचा प्रस्ताव पाठविण्यास सांगण्यात आल्याने एमपीएससीची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


15 ऑगस्टपर्यंत संबंधित विभागांनी ‘एमपीएससी’कडे रिक्तपदांचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश

MPSC Bharti 2021  – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे निर्देश देले आहेत. उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून 4 मे 2021 आणि 24 जून 2021च्या शासन निर्णयातून सूट देण्यात यावी. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. ही रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 15 ऑगस्टपर्यंत ‘एमपीएससी’कडे संबंधित विभागांनी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश अजित पवार यांनी आज दिले आहेत. (All departments in government should send proposal regarding vacancies to MPSC, Ajit Pawar’s instructions)

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात राज्य शासनातील एमपीएससीकडील पदांच्या भरतीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, लेखा व कोषागार विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबईच्या सचिव स्वाती म्हसे-पाटील आदी उपस्थित होते.

‘कोरोना’च्या संकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला मंजूरी देण्यात आली आहे. दिनांक ४ मे २०२१ आणि दिनांक २४ जून २०२१ च्या शासननिर्णयानुसार राज्यातील इतर विभागातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला निर्बंध लावण्यात आले होते. मात्र विशेष बाब म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनातील विविध विभागांतील रिक्त असणाऱ्या पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदासह उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून 4 मे 2021 आणि 24 जून 2021 च्या शासन निर्णयातून सूट देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन राज्यातील कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.ही रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 15 ऑगस्टपर्यंत संबंधित विभागांनी ‘एमपीएससी’कडे रिक्तपदांचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले. त्यामुळे ‘एमपीएससी’ ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


MPSC च्या SEBC  प्रवर्गातील वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना दिलासा!!

MPSC Bharti 2021 – The State Government has directed the MPSC Commission to maintain the age limit and examination fee concession payable to the backward classes as per the provisions of advertisements of students who have applied for the open category but have exceeded the prescribed age limit. This will bring relief to the SEBC candidates of MPSC.

दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय – 

एमपीएससीच्या सहसचिवांना शासनाने गुरुवारी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सूचना दिल्या आहेत. एमपीएससीच्या रखडलेल्या विविध परीक्षांचे निकाल आणि मुलाखतींचा मार्ग राज्य सरकारने यामुळे मोकळा केला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत आर्थिक दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेताच एमपीएससीलाही भरतीप्रक्रियेसंदर्भात गुरुवारी सूचना पाठविल्या आहेत. यानुसार आता एमपीएससीच्या रखडलेल्या पूर्व व मुख्य परीक्षा आणि मुलाखतीसाठी ‘एसईबीसी’ वर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना खुल्या व ईडब्ल्यूएस प्रवर्गातून लाभ घेता येईल.

दरम्यान, नव्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे मराठा समाजातील काही उमेदवार आरक्षणामुळे पात्र ठरले असतील तरी मुलाखतीनंतरच पुढील प्रक्रिया पार पडेल.

नव्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्याच्या सूचना

एमपीएससीला पत्र पाठवून ‘एसईबीसी’ वर्गाकरिता राखीव असलेली पदे खुल्या व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात (ईडब्ल्यूएस) रूपांतरित करून निकाल, मुलाखती, शारीरिक चाचणी परीक्षांचे निकाल सुधारित केल्यानंतर केवळ नव्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्याच मुलाखती, परीक्षा व शारीरिक चाचणी घेण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. ज्या उमेदवारांची शारीरिक चाचणी प्रलंबित आहे, त्यांच्यासाठी सुधारित निकालानुसार ती घेण्यात यावी, अशा सूचनाही सरकारने एमपीएससीला केल्या आहेत.


मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता – MPSC द्वारे उद्योग निरीक्षक संवर्गातील पदभरती करण्यात येणार !!

MPSC Bharti 2021 – Good News For Students Preparing For Group C!! The cabinet meeting of the Mahavikasaghadi government was held yesterday. Three decisions were taken in this meeting. It has been decided to hand over the recruitment process for the posts of Industry Inspectors from Industry Department, Energy Department and Labor Department to Group C category to Maharashtra Public Service Commission.

सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रामुख्यानं तीन निर्णय घेण्यात आले. उद्योग विभाग, उर्जा विभाग आणि कामगार विभागाकडील उद्योग निरीक्षक या गट क संवर्गातील पदाची भरतीप्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचा राज्यातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. राज्यातील विद्यार्थी विविध विभागातील सरळसेवा भरती MPSC करावी, अशी मागणी करत होते. सरकरारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

 

जिल्हा निवड समितीकडून परीक्षा लोकसेवा आयोगाकडे

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील उद्योग संचालनालय व क्षेत्रीय कार्यालयातील उद्योग निरीक्षक (गट क,अराजपत्रित) या पदाची निवड यापूर्वी जिल्हा निवड समितीकडून केली जात होती. मात्र, ही पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे भरण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.


MPSC ची मोठी घोषणा – राज्यातील हजारो उमेदवारांना दिलासा !! आता अभियांत्रिकी पदवीधर, 12 वी विज्ञान शाखा चे विध्यार्थी वनक्षेत्रपाल पदासाठी पात्र..

MPSC Recruitment 2021 – Despite fulfilling the required educational qualifications for the post of Forest Ranger under the Maharashtra Forest Service Examination, the Maharashtra Public Service Commission had re-opened the Preference Link to exclude some equivalent engineering graduates for the post of Forest Ranger. Now, the MPSC has announced that the students who have passed 12th Science and Degree including Mathematics are eligible. This has created an opportunity for many students to get this position.

महाराष्ट्र वनसेवा परीक्षांतर्गत वनक्षेत्रपाल पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करूनही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुन्हा नव्याने खुल्या केलेल्या प्रेफरन्स लिंकमध्ये काही समकक्ष अभियांत्रिकी शाखेच्या पदवीधारकांना वनक्षेत्रपाल पदासाठी वगळण्याची भूमिका घेतली होती. आता त्यापैकी गणित विषयासह बारावी विज्ञान व पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पात्र ठरविण्यात आल्याची घोषणा एमपीएससीने केली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना हे पद मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.

जाहिरातीत वनक्षेत्रपाल पदासाठी नमूद मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आदी अभियांत्रिकी शाखेच्या समकक्ष इतर अभियांत्रिकी शाखा उत्तीर्ण उमेदवारांना पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच मुलाखत देता आली. मात्र, अंतिम निकाल प्रसिद्ध करण्याआधीच त्यांना वगळण्यात आले. अशी माहिती विद्यार्थ्यांना मिळाली होती. यामुळे हातातोंडाशी आलेला घास एमपीएससी हिरावून घेणार होती. मात्र, याचा पाठपुरावा करण्यात आला.

याचा नाहक त्रास व आर्थिक फटका उमेदवारांना सहन करावा लागला होता. तसेच त्यांना मंत्रालय, एमपीएससी कार्यालय व महाराष्ट्र प्रशासकीय, न्यायाधीकरण (मॅट) यांचे उंबरठे झिजवावे लागले होते.

भारत सरकारच्या वनक्षेत्रपाल सेवाशर्ती नियमावर आधारित महाराष्ट्र शासनाने २०१५मध्ये नियम बनवल्यानंतर त्यातील शैक्षणिक अर्हता – विज्ञान शाखेची पदवी सोडून इतर गणित विषयासह पदवीधारक आणि गणित विषयासह बारावी विज्ञान उत्तीर्ण असणे – हा निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना एमपीएससीने संदिग्धतेचे कारण देत पाच वर्षांपासून डावलले होते. वनविभागाकडून या संदर्भात आयोगाला सप्टेंबर २०२१ मध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले. त्यानुसार एमपीएससीने निर्णय जाहीर केल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

पाच वर्षांपासून याची अंमलबजावणी केली जात नव्हती. हा मुद्दा शासनाच्या निदर्शनास आणून दिला. सतत पाठपुरावा केल्यामुळे आता माझ्या सारख्या राज्यातील अनेक विद्यार्थांना वनक्षेत्रपाल होण्याची संधी मिळणार आहे


मोठी बातमी! ‘MPSC मार्फत वैद्यकीय शिक्षण विभागातील पदभरती लवकरच

MPSC Recruitment 2021 – The Maharashtra Public Service Commission is recruiting Class 1 and Class 2 posts required for the Medical Education Department and this process will be completed soon. Medical Education Minister Amit Deshmukh said that the post of class 4 should be filled by the superintendent at his level.

Medical Education Department Vacancies To Fill Soon By Mpsc

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागासाठी आवश्यक असणाऱ्या वर्ग १ आणि वर्ग २ ची पदभरती करण्यात येत असून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. तर वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत वर्ग ३ पदभरतीबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे. वर्ग ४ बाबतची पदभरती अधिष्ठाता यांनी आपल्या स्तरावरुन करावी, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद‌्यालयात करण्यात येणाऱ्या बांधकामाच्या अनुषंगाने आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी सन २०१७ मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारानुसार तीन वर्षासाठी सर्व कर्मचारी तसेच आवश्यक ती यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यात आली होती. आता हा करार जरी संपला असला तरी नवीन करारासंदर्भातील प्रस्ताव त्वरित पाठविण्यात यावा आणि प्रस्तावाला परवानगी मिळावी यासाठी जळगाव अधिष्ठाता यांनी वैद्यकीय शिक्षण संचालकांकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश देशमुख यांनी दिले.


मोठी बातमी! ‘MPSC ची सर्व रिक्त पदे ३१ जुलैपर्यंत भरणार’, ESBC वर्गातील उमेदवारांच्या वयोमर्यादेत वाढ

MPSC Recruitment 2021 – The rainy session of the state legislature began today with Leader of Opposition in the Legislative Assembly Devendra Fadnavis raising the issue of Swapnil Lonakar’s suicide and asking the government to respond. BJP leader Sudhir Mungantiwar demanded help from Swapnil’s family. Replying to a question raised by the opposition, Deputy Chief Minister Ajit Pawar announced to fill all the vacant posts of MPSC by July 31, 2021.

आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली असून विधिमंडळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करत सरकारला जाब विचारला. तर भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वप्निलच्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीची सर्व रिक्त पदे ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्याची घोषणा केली.

MPSC Recruitment 2021 -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत गाजला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत.

स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येनंतर ४३० विद्यार्थी आम्हीपण आत्मदहन करु असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी फोन करुन सभागृहात हा विषय मांडण्याची मागणी केली आहे. नोकरीच्या वयोमर्यादेत दोन वर्ष वाढ द्या, म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण हलका होऊ शकतो, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये सरकारनं द्यावेत, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली.

विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीची सर्व रिक्त पदे ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्याची घोषणा केली. ते म्हणाले, मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात चर्चा केली आहे. स्वप्निलने असे करायला नको होते, अशी सगळ्यांचीच भावना आहे. पण, तो नाउमेद झाला असेल, त्याचा भ्रमनिरास झाला असेल.

पण, काल झालेल्या बैठकीत रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. या विषयावर सर्वांनीच भूमिका मांडली. सरकारने ही गोष्ट गांभिर्याने घेतलेली आहे. आज सभागृहात सांगू इच्छितो की, सरकार ३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या संपूर्ण रिक्त जागा भरेल. यात कोणताही अडथळा येणार नाही’ अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

MPSC Bharti Age Limit Details 

राज्य सरकारकडून एसईबीसी अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांची मयोवर्यादा ४३ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशोक चव्हाण यांनी विधानपरिषदेत बोलताना ही माहिती दिली. एसईबीसी अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांची मयोवर्यादा ४३ पर्यंत वाढवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने यासाठी मान्यता दिली आहे असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.


‘MPSC’च्या ३ हजार नियुक्त्या, रखडलेल्या मुलाखती कधी ?

MPSC Recruitment 2021 – For the last three years, along with the State Service Examination-2019, interviews and main examinations of thousands of candidates for 2996 posts such as Civil Engineering, Livestock Development Officer, Sub-Inspector of Police, Regional Transport Officer have been delayed.

‘एमपीएससी’ने ४२० जागांसाठी जुलै २०१९मध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा घेतली. जून २०२०मध्ये मुलाखती घेऊन अंतिम निकाल जाहीर केला. यात ४१३ उमेदवारांची निवड झाली. त्यानंतर नियुक्ती देण्याचे काम राज्य शासनाचे असते. मात्र, सरकारने ९ सप्टेंबर २०२०च्या आधी नियुक्त्या के ल्या असत्या तर ४१३ मधील ‘एसईबीसी’ प्रवर्गातील काही उमेदवारांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन असती. मात्र, दोन वर्षांपासून नियुक्त्याच न केल्याने तहसीलदारपदासाठी निवड झालेले उमेदवारही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

स्थापत्य अभियांत्रिकी सेवेच्या ११४५ पदांसाठी जून २०१९ मध्ये पूर्वपरीक्षा, तर नोव्हेंबर २०१९मध्ये मुख्य परीक्षा झाली. तब्बल आठ महिन्यांनी जुलै २०२०ला मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर होऊनही ३६०० उमेदवार वर्षभरापासून मुलाखतीच्या प्रतीक्षेत आहेत. स्वप्निल लोणकर हा त्यापैकीच एक होता. याच काळात विद्युत अभियांत्रिकीच्या ५० उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. मात्र, दोन वर्षांपासून त्यांचीही नियुक्ती रखडली आहे. सरळसेवेतून भरल्या जाणाऱ्या ४३५ पशुधन विकास अधिकारीपदासाठी २२ डिसेंबर २०१९ रोजी परीक्षा घेण्यात आली. मात्र, दीड वर्षांपासून परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या १३०० उमेदवारांच्याही मुलाखती घेतलेल्या नाहीत. राज्य सरकार मुलाखती, नियुत्यांची प्रक्रिया सातत्याने पुढे ढकलत असल्याने निवड झालेल्या उमेदवारांचे भवितव्य अधांतरी आहे.

पद आणि संख्या                                          पूर्वपरीक्षा                   मुख्य परीक्षा                             मुलाखत

राज्य सेवा परीक्षा(४१३)                                 २०१९                           जुलै २०१९                 जून २०२०(नियुक्ती रखडली)

स्थापत्य अभियांत्रिकी(११४५)                       जून २०१९                       नोव्हेंबर २०१९                   रखडली

पशुधन विकास अधिकारी (४३५)                  डिसेंबर २०१९                   सरळसेवा भरती                   रखडली

प्रादेशिक परिवहन अधिकारी(२४०)               मार्च २०२०                       रखडली                             रखडली

पोलीस उपनिरीक्षक (४९६)                           मार्च २०१९                  ऑगस्ट २०१९                        रखडली (शारीरिक चाचणी)

या परीक्षांचा निकालच नाही

प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या २४० जागांसाठी जानेवारी २०२०मध्ये ९८ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. मात्र, दीड वर्षांपासून या परीक्षेचा निकाल जाहीर केलेला नाही. तर दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गेल्या मार्चमध्ये झालेल्या राज्य सेवा पूर्वपरीक्षेचा निकालही अद्याप प्रलंबित आहे. तर याबरोबरच होणाऱ्या संयुक्त परीक्षेचाही अद्याप पत्ता नाही.

पशुधन विकास अधिकारीपदासाठी १९ महिन्यांपूर्वी परीक्षा दिली. अद्याप मुलाखत नाही. आम्ही मानसिक आणि आर्थिक तणावात आहोत, सरकारने आता तरी लक्ष द्यावे.


“लाखो विद्यार्थ्यांना दिलासा !! ‘MPSC’ ची परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार”

MPSC Conducting Online Exam– The exams are scheduled to be held on Sunday (April 11) against the backdrop of weekend lockdown and strict restrictions in the state. The commission clarified that no change has been made regarding the date of the examination. The examination will be conducted in the corona’s background following proper precautions and rules.

MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी 

राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी (11 एप्रिल) होणारी परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहे. परीक्षेच्या तारखेबाबत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन करत परीक्षा पार पाडली जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व स्तरातील व्यक्तींसोबत चर्चा केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पण विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 11 एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परिक्षेवर अनिश्चिततेचं सावट होतं.

परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे महत्वाची मागणी केली आहे. ‘लॉक डाऊन’ असताना रविवारी (ता.11) होणाऱ्या #MPSC परिक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी. परीक्षा होणार असेल तर कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत. तसंच बाधित मुलांची वयोमर्यादा संपत असेल तर त्यांना आणखी एक संधी देण्याबाबत सरकारने विचार करावा, ही विनंती. असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.


MPSC Conducting Online Exam – As per the plan of Maharashtra State Public Service Commission, State Service Pre-Examination, Engineering Service Pre-Examination and Secondary Service Non-Gazetted Group-B Joint Pre-Examination will now be held on March 14, March 27 and April 11. However, the commission has decided to conduct the upcoming main exam online so that the results can be taken on time and twice a year. The first experiment will be conducted through the Engineering Service Examination to be held in July-August

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या नियोजनानुसार आता 14 मार्च, 27 मार्च आणि 11 एप्रिलला राज्य सेवा पूर्व परीक्षा, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्‍त पूर्व परीक्षा होणार आहे. परंतु, आता निकाल वेळेत लागावा, एका वर्षात दोनदा परीक्षा घेता यावी म्हणून आयोगाने आगामी मुख्य परीक्षा ऑनलाइन घेण्याचे निश्‍चित केले आहे. जुलै- ऑगस्टमध्ये होणाऱ्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या माध्यमातून पहिला प्रयोग केला जाणार आहे.

30 हजार पदे रिक्‍त, तरीही मागणीपत्रे नाहीत

राज्यातील सुमारे 28 लाखांहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी राज्य सरकारच्या विविध विभागांकडून सप्टेंबरपासून त्यांच्याकडील रिक्‍त पदांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिली जाते. त्यानुसार आयोगाकडून परीक्षांचे नियोजन होते. राज्यातील विविध विभागांमध्ये दोन लाखांहून अधिक पदे रिक्‍त असून त्यात प्रथम व द्वितीय श्रेणीतील 30 हजारांहून अधिक पदे आहेत. मात्र, यंदा कोणत्याही विभागाने आयोगाला मागणीपत्र दिले नसल्याने या वर्षातील परीक्षा पुन्हा विलंबानेच होतील. आयोकडून मागणीपत्रासाठी पाठपुरावा सुरु आहे, परंतु कोरोनाच्या संकटामुळे राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी आणि मराठा समाजाला सर्वोच्च न्यायालयातून मिळालेली स्थगिती, यामुळे राज्य सरकारने रिक्‍त पदांची मागणीपत्रे दिली नसल्याचे आयोगातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

‘एमपीएससी’तर्फे राज्य सेवा पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा पूर्व परीक्षा, कृषी सेवा, वन सेवा, अभियांत्रिकी सेवा, कर सहायक, दुय्यम निरीक्षक (संयुक्‍त सेवा परीक्षा, गट- क) अशा परीक्षा घेतल्या जातात. राज्यभरातील सुमारे 30 लाखांपर्यंत विद्यार्थी या परीक्षा देतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील विद्यार्थ्यांची परीक्षा घेताना आयोगाला विविध अडचणींचा सामना करावा लागतो. दुसरीकडे प्रश्‍नपत्रिका, उत्तरपत्रिका छपाई, त्याची तपासणी आणि निकालासाठी दोन ते तीन महिन्यांचा वेळ लागतो. पूर्व आणि मुख्य परीक्षा ऑफलाइन होत असल्याने परीक्षा घेणे, उत्तरपत्रिकांची तपासणी व निकालासाठी चार- सहा महिन्यांचा कालावधी जातो. या काळात अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपुष्टात येते. आता आयोगाने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सहावेळाच परीक्षा देता येईल, असे स्पष्ट केले आहे. उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आयोगाने मुख्य परीक्षा ऑनलाइन घेण्याचे नियोजन केले आहे. सुरवातीला कमी उमेदवार असलेल्या परीक्षेत हा प्रयोग केला जाणार असून त्यानंतर तांत्रिक अडचणी व त्रुटी दूर करुन आगामी सर्वच मुख्य परीक्षा ऑनलाइन होतील, असे आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


MPSC Conducting Online Exam– The Maharashtra Public Service Commission has taken a final decision on the new dates of the examinations which have been stalled for over a year. The state service pre-examination will be held in the second week of March and the pre-engineering service examination will be held in the third week. Secondary Service Non-Gazetted Group-B Joint Pre-Examination will be held in the month of April. Official dates are announced by the state government . Read it briefly at below:

मागील तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मार्चमध्ये होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांबद्दल अंतिम निर्णय घेतला आहे. (MPSC Exams Date Announcement)

तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मार्चमध्ये होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांबद्दल अंतिम निर्णय घेतला असून परीक्षांच्या तारखेबाबत आज (8 जानेवारी) अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यसेवा पूर्व परिक्षा तर तिसऱ्या आठवड्यात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. (MPSC exams will be held in march , date has been announced )

https://drive.google.com/file/d/1QOlwjQca-GKV_69jkt5GmEEcIMfG8kRe/view?usp=sharing

कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे राज्यात प्रतिष्ठेचं वलय असणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या होत्या. अनेक वर्षांपासून तयारी करत असलेले उमेदवार या परीक्षांची वाट पाहत होते. अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षादेखील लवकरात लवकर घेण्यात याव्यात अशी मागणी या उमेदवारांकडून केली जात होती. त्याची दखल घेत, आता एमपाएससीची परीक्षा लवकरच घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

अधिकृत घोषणा 

मिळालेल्या माहितीनुसार या परीक्षांबद्दल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अंतिम निर्णय घेतला असून परीक्षांच्या तारखांची अधीकृत घोषणा केली . मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि तिसऱ्या आठवड्यात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. तर दुय्याम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा याच वर्षी एप्रिल महिन्यात होणार आहे. या सर्व परीक्षांची अधिकृत घोषणा राज्य सरकारतर्फे आज करण्यात आली

यापूर्वी परीक्षा पुढे ढकलण्याच निर्णय

दरम्यान मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर ठाकरे सरकारनं MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यावेळी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. MPSC च्या परीक्षेची पुढची तारीख लवकरच जाहीर करू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यांनतर आता आज परीक्षेची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे


Now MPSC Online Exam : एमपीएससीने ऑनलाइन परीक्षा घेण्याची तयारी केली आहे…ऑनलाइन-ऑफलाइनच्या खेळात विद्यार्थी मात्र द्विधा मनःस्थितीत आहेत. राज्यात अराजपत्रित पदांच्या भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राबवाव्या की महाआयटी विभागाने, याबाबत राज्यात विद्यार्थ्यांचे दोन गट पडले असतांनाच, आता एमपीएससीने ऑनलाइन परीक्षा घेण्याची तयारी केली आहे. त्यासाठी एमपीएससीने महाआयटी विभागाप्रमाणे खासगी आयटी कंपनी नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याला सुरुवात केली आहे. एमपीएससीकडून आतापर्यत ऑफलाइन परीक्षा घेण्यात येत असल्याने, विद्यार्थ्यांचा एमपीएससीला पाठिंबा होता. मात्र, आता एमपीएससीनेच ऑनलाइन परीक्षांची तयारी केल्याने, राज्यात स्पर्धा परीक्षांचे तयारी करणारे विद्यार्थी द्विधा मनःस्थितीत सापडले आहेत.

सध्याच्या परिस्थितीत एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या पदभरतीच्या परीक्षा लेखी (ऑफलाइन) पद्धतीने घेतल्या जातात. मात्र, तंत्रज्ञानामुळे होत असलेले बदल आत्मसात करून त्यानुसार कामकाजात बदल करण्याचा प्रयत्न एमपीएससीकडून करण्यात येत आहे. त्या दृष्टीनेच ऑनलाइन परीक्षांचे पाऊल टाकण्यात आले आहे. संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी निविदा प्रक्रियेतून खासगी कंपनीची निवड केली जाणार आहे.ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांवर संपूर्णपणे आयोगाचेच नियंत्रण असेल. मोठ्या प्रमाणात उमेदवार असलेल्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार नाहीत. त्याचप्रमाणे ऑनलाइन परीक्षा सायबर कॅफेमध्ये न होता आयोगाकडून परीक्षेसाठीची संस्था निवडली जाईल. या ऑनलाइन परीक्षेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख करण्यात येणार आहे. त्यासाठीचा विशेष नियंत्रण कक्ष एमपीएससीच्या कार्यालयात असेल. आयोगाच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीतच ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे, असे निविदा प्रक्रियेतून स्पष्ट होते. दरम्यान, या संपूर्ण प्रकारात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती पदभरतीची प्रक्रिया होणार आहे की नाही, याबाबत कोणीच बोलायला तयार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहावे लागणार असल्याचे चित्र आहे.

चाचणीनंतर ऑनलाइन होणार परीक्षा

एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी एमपीएससी प्रशासनाकडून चाचपणी करण्यात येत आहे. निविदा प्रक्रियेतून ऑनलाइन परीक्षेसाठी संगणकीय प्रणाली विकसित झाल्यानंतर, छोट्या स्वरुपाच्या परीक्षांचे ऑनलाइन माध्यमातून आयोजन करण्यात येईल. ही चाचणी यशस्वी झाल्यावर, मोठ्या संख्येने परीक्षार्थी असणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाइन परीक्षा पद्धतीचा वापर करण्यात येईल.

Table of Contents

Leave a Comment