Major Changes In MPSC Examination

आता MPSC च्या रखडलेल्या विविध परीक्षांचे निकाल आणि मुलाखतीं राज्य शासनाच्या सूचनेनुसार लागणार

Major Changes In MPSC Examination – सप्टेंबर २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. मात्र, या सर्व परीक्षांमध्ये मराठा आरक्षण लागू करण्यात आल्याने राज्य सरकारपुढे पदभरतीसंदर्भात मोठा पेच निर्माण झाला होता. परिणामी, स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११६१ पदांच्या मुख्य परीक्षेचा निकाल जुलै २०२० मध्ये जाहीर करण्यात आला असला तरी मुलाखती अद्यापही रखडल्या आहेत.   महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) रखडलेल्या विविध परीक्षांचे निकाल आणि मुलाखतींचा मार्ग राज्य शासनाने मोकळा केला आहे.

Major Changes In MPSC Examination

‘एमपीएससी’ला पत्र पाठवून ‘एसईबीसी’ वर्गाकरिता राखीव असलेली पदे खुल्या व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात (ईडब्ल्यूएस) रूपांतरित करून निकाल, मुलाखती, शारीरिक चाचणी परीक्षांचे निकाल सुधारित केल्यानंतर केवळ नव्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्याच मुलाखती, परीक्षा व शारीरिक चाचणी घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.  सुधारित निकालानुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांना निकाल प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहे.


PSI परीक्षेच्या शारीरिक चाचणीच्या नियमांत बदल, काय आहेत नवीन नियम?

Major Changes In MPSC Examination – Changes have been made in the standards of physical testing in the recruitment process for the post of Sub-Inspector of Police, Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group-B. Read Below Information about Changes in MPSC PSI Physical Exam

पोलीस उपनिरीक्षक, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब या पदासाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीच्या मानकांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भातील सूचना राज्य लोकसेवा आयोगाने संकेतस्थळावर जारी केली आहे. हे सुधारित निकष २०२० च्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षेपासून लागू होणार आहेत.

आयोगाने परिपत्रकात असे म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीच्या मानकांमध्ये बदल करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती. त्यानुसार हे बदल करण्यात आले आहेत.’

नवीन नियमांनुसार शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान 60 गुणांची अट ठेवण्यात आली आहे. म्हणजेच मुलाखतीसाठी पात्र होण्यासाठी शारीरिक चाचणीत किमान 60 गुण आवश्यक आहे. या गुणांचा अंतिम निवडीकरता विचार केला जाणार नाही.

 

सुधारित मापदंड पुढीलप्रमाणे असतील –

 •  पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी शारीरिक चाचणीची गुण अर्हताकारी करण्यात आले असून शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ६० टक्के गुण (म्हणजे ६० गुण) मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील.
  तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता / अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही.
 • या सर्व शारीरिक चाचणीतील एकूण गुणांचे बेरीज अपुर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल.

शारीरिक चाचणीचा तपशील पुढीलप्रमाणे –
पुरुष उमेदवारांकरिता –

गोळाफेक – वजन ७.२६० कि.ग्रॅ. – कमाल गुण – १५
पुलअप्स – कमाल गुण – २०
लांब उडी – कमाल गुण – १५
धावणे (८०० मीटर) – कमाल गुण – ५०

महिला उमेदवारांकरिता –

गोळाफेक – वजन ४ कि.ग्रॅ. – कमाल गुण – २०
धावणे (४०० मीटर) – कमाल गुण – ५०

लांब उडी – कमाल गुण – ३०

CHECK OFFICAIL NOTICE HERE


Major Changes In MPSC Examination – The Maharashtra Public Service Commission (MPSC) has given a deadline of January 15 for candidates in the ‘SEBC’ category to opt for the open or central government’s ‘EWS’ option as the reservation for the Maratha community remains in abeyance. On the other hand, the UPSC  examination will be held from January 8 to 17. After that, the Maharashtra Public Service Commission examination will be held after February 15, senior sources in the general administration department have said.

आरक्षण बदलासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2020 मध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा, राज्य सेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्‍त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी जाहीरात काढली. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या ‘एसईबीसी’ आरक्षणास स्थगिती दिली. या पार्श्‍वभूमीवर आयोगाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्गाचा दावा केलेल्या विद्यार्थ्यांनी आता खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) या प्रवर्गातून आरक्षण बदलावे, असे आदेश काढले आहेत. त्यासाठी 5 ते 15 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे.

या परीक्षांसाठी पर्याय

 • – सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा २०२०
 • – राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०
 • – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा २०२०
 • – महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२०

आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी ‘हे’ करा –

 • आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाइलद्वारे १५ जानेवारीपर्यंत संबंधित परीक्षेसाठी अर्जाद्वारे खुला किंवा ‘ईडब्ल्यूएस’ यापैकी कोणत्या आरक्षणातून लाभ घ्यायचा आहे, याचा विकल्प देणे आवश्यक.
 • खुला किंवा ‘ईडब्ल्यूएस’चा दावा विहित कालावधीत सादर न करणाऱ्या उमेदवारांचा फक्त अराखीव (खुला) पदावरील निवडीकरीता विचार करण्यात येईल.
 •  ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ घेतल्यास संबंधित उमेदवार ‘एसईबीसी’ आरक्षणासाठी पात्र ठरणार नाही.
 • आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे पर्य़ाय सादर न केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत दाव्यातील बदलाबाबतची विनंती नंतरच्या टप्प्यावर कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही.

मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती कायम असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ‘एसईबीसी’ प्रवर्गातील उमेदवारांना आता खुल्या अथवा केंद्र सरकारच्या ‘ईडब्ल्यूएस’चा पर्याय निवडण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. दुसरीकडे 8 ते 17 जानेवारीदरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा 15 फेब्रुवारीनंतर होईल, अशी शक्‍यता सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी वर्तविली आहे.

राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्यभर लॉकडाउन करण्यात आला. विद्यार्थ्यांना वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने आणि परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने आयोगाच्या माध्यमातून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. कोरोनासंबंधीचे निर्बंध व नियमांचे पालन करुन परीक्षा घेण्याचे आयोगाने निश्‍चित केले आणि विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रही वितरीत केले. मात्र, मराठा समाजाचे आरक्षण स्थगित झाल्याने पुन्हा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आयोगाच्या प्रश्‍नपत्रिका अद्यापही जिल्ह्याच्या कोषागार कार्यालयातच पडून आहेत. दुसरीकडे हजारो विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपुष्टात आली असून त्यांच्यासमोर बेरोजगारीचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. या पार्श्‍वभूमीवर आयोगाने 23 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयाचा आधार घेऊन परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु केल्याचेही सांगण्यात आले. तत्पूर्वी, आयोगाने स्पर्धा परीक्षा देण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना यापुढे अधिकाधिक सहा संधी तर अनुसूचित जाती- जमातीतील विद्यार्थ्यांसाठी अमर्याद संधी असेल, असा निर्णय घेतला. तर उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांना नऊ संधी देण्यात येतील, असेही स्पष्ट केले आहे. त्यानुसार पुढील काळात कार्यवाही केली जाणार आहे.


Major Changes In MPSC Examination – Like the Union Public Service Commission (UPSC), the Maharashtra Public Service Commission (MPSC) has now limited the number of attempts or opportunities for candidates.

According to the new changes, each candidate in the open category will now get six opportunities, while the maximum opportunity limit will not apply to SC and ST candidates, while the remaining backward category candidates will have a maximum of nine opportunities. Read More details on Major Changes In MPSC Examination at below:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देऊन अधिकारी होऊ पाहणाऱ्या उमदेवारांसाठी मोठी बातमी आहे. आता एमपीएससी UPSC पटर्न राबवणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना किती वेळा परीक्षा देता येईल याबाबत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान सहा संधी उपलब्ध असतील.

एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरला उपस्थित राहिल्यास ती संधी मानली जाईल. उमेदवार कोणत्याही कारणास्तव परिक्षेला गैरहजर राहिला तरी ती संधी मानली जाईल.

Major Changes In MPSC Examination

स्पर्धा परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवारांना संधीची मर्यादा

 • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान सहा संधी उपलब्ध असतील.
 • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना संधीची मर्यादा नसेल.
 • उर्वरीत मागास प्रवर्गातील उमेदवारांना किमान नऊ संधी उपलब्ध असतील.
 • उमेदवारांनी पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ती संधी मानली जाईल.
 • एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरला उपस्थित राहिल्यास ती संधी मानली जाईल.
 • उमेदवार कोणत्याही कारणास्तव परिक्षेला गैरहजर राहिला तरी ती संधी मानली जाईल.
 • हा निर्णय 2021 मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या परीक्षांबाबतच्या जाहिरातींना लागू होईल.

परीक्षेच्या कमाल संधीबाबतचा आयोगाचा प्रस्तुत निर्णय सन 2021 मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीस अनुसरून आयोजित परीक्षांपासून लागू होण्यात येईल.

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे IAS, IPS या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षांसाठी सुद्धा संधीची संख्याही अशीच आहे. MPSC परीक्षांसाठी खुल्या वर्गासाठी सध्या वयोमर्यादा 38 वर्षे आहे.


Major Changes In MPSC Examination: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) तांत्रिक सेवांच्या परीक्षा पद्धतीमध्ये मोठा बदल के ला आहे. महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा या संवर्गासाठी स्वतंत्र परीक्षा न घेता आता ‘महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा’ या नावाने एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार असून हा बदल २०२१ मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीपासून केला जाणार आहे.

Major Changes In MPSC Examination

एमपीएससीने संके तस्थळावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. महसूल आणि वन, कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि विकास, मत्स्य व्यवसाय विभाग, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, जलसंपदा आणि जलसंधारण विभागातील राजपत्रित गट अ आणि गट ब संवर्गातील भरतीसाठी आयोगाकडून महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा यासाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध केली जात होती. तसेच या संवर्गाच्या परीक्षेसाठी उमेदवारांकडून स्वतंत्र अर्ज मागवून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जात होत्या. मात्र तीनही परीक्षांच्या आयोजनाबाबत विविध पैलूंचा विचार करून तीनही संवर्गातील भरतीसाठी आता ‘महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा’ ही एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट के ले आहे.

संयुक्त पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीला अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ते एक, दोन किं वा तीनही परीक्षांना बसू इच्छितात का, या बाबतचा विकल्प घेतला जाईल. संबंधित परीक्षेसाठी उमेदवाराने दिलेले विकल्प हे संबंधित संवर्गातील परीक्षेसाठी अर्ज समजण्यात येतील. त्या आधारे, भरल्या जाणाऱ्या पदसंख्येच्या आधारे, संबंधित परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करायच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गासाठी पूर्व परीक्षेचे स्वतंत्र निकाल जाहीर केले जातील. पूर्वपरीक्षेच्या निकालाआधारे पात्र उमेदवारांसाठी प्रत्येक संवर्गासाठी संबंधित संवर्गासाठी आयोगाकडून विहित करण्यात आलेल्या परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमाच्या आधारे स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतल्या जातील.

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्याची पद्धत, पात्रता, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षायोजना, अभ्यासक्रम आदी तपशील स्वतंत्रपणे प्रसिद्ध के ला जाणार असल्याची माहिती आयोगाने दिली.

आतापर्यंत उमेदवारांना तीन परीक्षांसाठी स्वतंत्र अर्ज आणि शुल्क भरावे लागत होते. तसेच परीक्षांचा अभ्यासही स्वतंत्रपणे करावा लागत होता. सर्वसाधारणपणे तीनही परीक्षांसाठी सामाईक उमेदवारांची संख्या मोठी होती. या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून आता एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला. संयुक्त पूर्वपरीक्षा उमेदवारांसाठी सर्वच बाजूंनी सोयीची ठरणार आहे.

Leave a Comment

सरकारी नोकरी अपडेट्स व्हाट्सप्प वर मिळवा..