Mega Bharti 2021

राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदातील जवळपास तीन लाखांहून अधिक पदे रिक्त !!

Mega Bharti 2021 – गेल्या काही वर्षांपासून राज्यातील रिक्त पदांचा आकडा वाढत असूनही राज्य शासनाकडून ही पदे भरण्यात आलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश गुज्जलवार यांनी माहिती अधिकारात वर्ग एक ते वर्ग चारच्या रिक्त पदांचा तपशील राज्य शासनाकडे मागितला होता. सामान्य प्रशासन विभागाने प्रशासकीय विभागांकडून माहिती संकलित करून त्या अर्जाला दिलेल्या उत्तरातून ३१ डिसेंबर २०१९ अखेर राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदांमध्ये २ लाखांहून अधिक पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आह

राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मिळून जवळपास तीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहे. माहिती अधिकारात डिसेंबर २०१९ पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार रिक्त असलेल्या पदांपैकी १ लाख ४१ हजार ३२९ पदे सरळ सेवेने, तर ५८ हजार ८६४ पदे पदोन्नतीने भरायची आहेत. २०२० आणि २०२१ या वर्षातही मोठ्या संख्येने शासकीय सेवेतील पदे रिक्त झाली आहे. हा आकडा ३ लाखापेक्षा जास्त आहे. अशात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी संधीच्या प्रतीक्षेत आहे.

माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदांमध्ये मिळून १० लाख ९९ हजार १०४ मंजूर पदे आहेत.

 • त्यातील ७ लाख ८० हजार ५२३ पदे सरळसेवेची
 • ३ लाख १८ हजार ५८१ पदे पदोन्नतीची आहेत.
 • त्यापैकी ८ लाख ९८ हजार ९११ पदे भरलेली आहेत.
 • तर २ लाख १९३ पदे अद्याप रिक्त आहेत.
 • त्यापैकी १ लाख ४१ हजार ३२९ पदे सरळसेवेने, तर ५८ हजार ८६४ पदे पदोन्नतीने भरायची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

एकूण रिक्त पदांपैकी राज्य शासकीय कार्यालयांची रिक्त पदे १ लाख ५३ हजार २३१, जिल्हा परिषदांची रिक्त पदे ६४ हजार ९६२ आहेत. सर्वाधिक २४ हजार ५८१ रिक्त पदे गृह विभागात असून, सार्वजनिक आरोग्य विभागात २० हजार ५४४, जलसंपदा विभागात २० हजार ८७३ पदे रिक्त आहे.

– बेरोजगारांना तात्काळ रोजगार द्यावा

सन २०१४ पासून पदभरती बंद केली आहे. एमपीएससी पॅनलवर सद्यस्थितीत ६ पैकी केवळ दोनच सदस्य कार्यरत आहे. त्यामुळे निकाल लावणे, परीक्षेसंदर्भात नियोजन करण्यास अडचणी येत आहे. महापरीक्षा पोर्टल बोगस असल्याने परीक्षा ऑफलाईन घेऊन पारदर्शक प्रक्रिया राबविण्यात यावी
मिलिंद वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते


खुशखबर !! नोकर भरतीवरील बंदी उठविल्याने सरकारी खात्यांमध्ये पद भरतीसाठी परीक्षा पुढच्या महिन्यात !

Mega Bharti 2021 – Good news !! The lifting of the ban on recruitment has paved the way for filling up vacancies in government departments as well as public companies, corporations and institutions. Read below information carefully

खुशखबर !!नोकर  भरतीवरील बंदी उठविल्याने सरकारी खात्यांबरोबरच सार्वजनिक कंपन्या, महामंडळ, संस्थांमधील रिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय अग्निशामक दल, आरोग्य विभाग तसेच इतर खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होणार नोकर भरती .

राज्य सरकारने नोकर भरतीवर घातलेली बंदी उठवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी असे स्पष्ट केले की, सरकारी खात्यांमध्ये वेगवेगळ्या पदांवर भरती करण्यासाठी जाहिराती काढण्यात आल्या आहेत. त्या पदांच्या लेखी परीक्षा येत्या जुलै महिन्यापासून घेतल्या जाणार आहेत.

Mega Bharti 2021

आता सरकारी खात्यांमध्ये मेगा भरती होणार !! राज्य सरकारच्या या नव्या निर्णयामुळे राज्यातील बेरोजगारांना दिलासा मिळणार आहे.


Mega Bharti 2021 -राज्यात शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद मिळून २ लाखांहून अधिक पदे रिक्त !! ही भरती प्रक्रिया कधी होणार ?

Mega Bharti 2021 – राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मिळून २ लाखांहून अधिक पदे रिक्त असल्याचे वास्तव उघड झाले आहे. रिक्त असलेल्या पदांपैकी १ लाख ४१ हजार ३२९ पदे सरळ सेवेने, तर ५८ हजार ८६४ पदे पदोन्नतीने भरायची आहेत. या रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया कधी होणार याची राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांना प्रतीक्षा आहे.

Mega Bharti 2021

शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद मिळून रिक्त पदांचा तपशील

 • अ वर्ग – १० हजार ५४५
 • ब वर्ग – २० हजार ९९९
 • क वर्ग – १ लाख २७ हजार ७०५
 • ड वर्ग – ४० हजार ९४४

गृह विभागात सर्वाधिक रिक्त पदे

सर्वाधिक रिक्त पदे असलेल्या विभागांमध्ये गृह विभाग आघाडीवर आहे. गृह विभागातील २४ हजार ५८१, सार्वजनिक आरोग्य विभागातील २० हजार ५४४, जलसंपदा विभागातील २० हजार ८७३ पदे रिक्त असल्याचे दिसून येत आहे.


Mega Bharti 2021 – ZP ते बांधकाम विभागात अडीच लाखांवर पदे रिक्त !!

Mega Bharti 2021 – There are vacancies in important departments of Zilla Parishad. Class I and Class II posts have not been filled in the last few years. Therefore, a letter has been sent to the government to fill these posts immediately to facilitate administrative work with the implementation of government schemes. There is almost two and Half lakh Government Posts are vacant. SO it is expected that in coming days this Mega Bharti 2021 will be implemented …

वर्ग एक व दोन मध्ये विविध रिक्त पदे 

जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये वर्ग एक व दोनमधील एक हजार 250 पदे रिक्‍त झाली आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना आणि नागरिकांचे प्रश्‍न सोडविताना, शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावाणी करताना प्रभारी अधिकाऱ्यांवर ताण येत आहे. या पार्श्‍वभूमीवर ही रिक्‍तपदे तत्काळ भरावीत, असे विनंतीपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शासनाला व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिले आहे. मात्र, त्यानुसार काहीच कार्यवाही न झाल्याने जिल्हा परिषदेने आता शासनाला स्मरणपत्र दिले आहे.

झेडपीच्या 142 शाळा मुख्याध्यापकांविना 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजारांहून अधिक शाळा आहेत. खासगी शाळांच्या तुलनेत झेडपी शाळांची पटसंख्या कमी होऊ लागली असून त्याठिकाणी दर्जा सुधारण्याची गरज आहे. मात्र, या शाळांमध्ये 596 शिक्षकांची पदे रिक्‍त असून त्यात विज्ञान, गणित, इंग्रजी या विषयांच्या शिक्षकांची सर्वाधिक संख्या आहे. दुसरीकडे 142 शाळांना मुख्याध्यापकच नाहीत, अशी विदारक स्थिती आहे. तरीही रिक्‍तपदांची भरती होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

जिल्हा परिषदेतील याच विभागातील तब्बल पाचशे पदे रिक्‍त

केंद्र व राज्य सरकारच्या घरकुल योजनांची अंमलबजावणीसह ग्रामीण विकासासंबंधीच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागास संचालक नाही. तर कुर्डूवाडी, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ व बार्शी या पंचायत समित्यांमध्ये सहायक गटविकास अधिकारीच नाहीत. बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक, उपशिक्षणाधिकारी, पशुधन विकास अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचा उपअभियंता, बांधकाम विभागात नऊ उपअभियंते, नऊ जलसंधारण अधिकाऱ्यांची पदे रिक्‍त आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचे सावट अद्याप संपलेले नसतानाही जिल्ह्याला साथरोग वैद्यकीय अधिकारी मिळू शकला नाही. अधिकाऱ्यांच्या तथा शासकीय वाहनांना 21 वाहनचालक नाहीत. आरोग्यसेवक, आरोग्यसेविकांची 156 पदे रिक्‍त झाली आहेत. पाच औषण निर्माण अधिकारी, 21 आरोग्य पर्यवेक्षकांची पदेही रिक्‍त आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील पदभरतीस वित्त विभागाने मान्यता देऊनही सोलापूर जिल्हा परिषदेतील याच विभागातील तब्बल पाचशे पदे रिक्‍त असूनही भरती प्रक्रिया सुरु झालेली नाही, हे विशेष.

 

झेडपीतील रिक्‍त पदांचा घोषवारा… 
प्राथमिक शिक्षक : 596
मुख्याध्यापक : 142
आरोग्य कर्मचारी : 405
पशुधन विकास अधिकारी : 41
बांधकामसह अन्य विभाग : 189
एकूण : 1,250

रिक्‍तपदे भरण्याची आहे गरज

जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या विभागांमधील पदे रिक्‍त झाली आहेत. मागील काही वर्षांत वर्ग एक व वर्ग दोनची पदे भरली गेली नाहीत. त्यामुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसह प्रशासकीय कामकाज करणे सोयीचे व्हावे म्हणून ही पदे तत्काळ भरावीत, असे पत्र शासनाला पाठविले आहे.


Maharashtra Mega Bharti 2021 – Good News, Mega Bharti 2021 is expected soon. The details & updates about this Bharti process are given below. We keep adding more details on this page so remember to BookMark this. For latest Recruitments please click on this link, so that you will get all details about Current Recruitment process. MahaIT declared that the final selection of companies will be proceed soon. The Mahapariksha Portal is already closed by Maharashtra Government, very soon the New Recruitment system will launched by State Government.

 • राज्यभरातील लाखो तरुणांचे भवितव्य अवलंबून असणारी सरळ सेवा भरती प्रक्रियेला गती मिळत आहे. या अंतर्गत होणारी कंपनी निवड अंतिम टप्प्यात असून, पुढील दोन दिवसात ही निवड होणार असल्याचे “महाआयटी’ (MahaIT) कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 • महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाचे (महाआयटी) व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोग यांनी कंपनी निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे आता सरसेवा पदभरती साठीची कंपनी निवड प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
 • यासंदर्भात “मनविसे’चे शहराध्यक्ष कल्पेश यादव याबाबत गेले 8 महिने पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी याबाबतचा लेखी खुलासा मागितला होता. हा खुलासा देताना महाआयटीने सध्याची स्पष्टता दर्शवली आहे. त्यामुळे लाखो तरुणांना दिलासा मिळाला आहे.
 • दरम्यान, राज्यात होऊ घातलेली मेगा भरती ही “महापोर्टल’मध्ये झालेल्या भ्रष्टाचारानंतर थांबवण्यात आली होती. त्यामुळे लाखो तरुण चिंतेत होते. या भरतीसाठी नवीन कंपनी निवडीचे काम “महाआयटी’कडे देण्यात आली आहे. ही कंपनी निवड जवळपास एक वर्षांपासून प्रलंबित आहे.
 • यासाठीच “मनविसे’ने यापूर्वी त्यांनी महाआयटी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर महाआयटीने त्यांना लेखी खुलासा देत पुढील दोन दिवसात अंतिम प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सांगितले.

Leave a Comment

सरकारी नोकरी अपडेट्स व्हाट्सप्प वर मिळवा..