परीक्षेला जाण्यापूर्वी वाचा- MPSC परीक्षेसाठी महत्वाच्या सूचना जाहीर!

MPSC Exam All important Instructions 2021 – In view of the increasing prevalence of Corona virus in the state, some important suggestions have been issued to the candidates for the MPSC  Subordinate Services Non-Gazetted Group B Combined Preliminary Examination 2020 to be conducted by the Maharashtra Public Service Commission on 11th April 2021. Look at below:

राज्यभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या पुढील परीक्षेसाठी परीक्षार्थी उमेदवारांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही महत्वाच्या सूचना करण्यात आले आहेत. 11 एप्रिल रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षा देताना उमेदवारांनी काय खबरदारी घ्यावी ?  याबाबतचे परिपत्रक एमपीएससीकडून आज  जाहीर करण्यात आले आहे.

यामध्ये उमेदवारांना दोन्ही सत्रासाठी मास्क ,हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझरचे किट देण्यात येणार असून त्याचा वापर उमेदवारांनी परीक्षा देताना करायचा आहे. सोबतच ज्या उमेदवारांना सर्दी, ताप किंवा करोना संबंधित लक्षणे आढळत असतील तर संबंधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवेक्षीय अधिकारी-कर्मचारी यांना तातडीने कळवावे लागणार आहे. अशा उमेदवारांची स्वतंत्र्य बैठक कक्षात व्यवस्था करण्यात येणार असून त्यांना पीपीई किट सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

MPSC Exam All important Instructions 2021

Leave a Comment

सरकारी नोकरी अपडेट्स व्हाट्सप्प वर मिळवा..