शासकीय नोकरभरतीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास राज्य सरकारची मंजुरी
MPSC New GR For Examinations – The state government has approved the resumption of the government recruitment process, which was suspended due to Corona. Approved departments have been approved to fill 100 per cent vacancies within the purview of the Public Service Commission and 50 per cent vacancies outside the purview of the Commission.
In view of the rising cost of salaries and pensions of state government officials and employees, the state government has been slow in recruiting for vacancies and new recruits. In 2016, all the administrative departments and their subordinate offices were instructed to issue an order and prepare a revised diagram of officers and employees and get it approved by the government. The state government had clarified that filling up of vacancies or creation of new posts would not be allowed if the diagram was not ready.
शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीवर यापूर्वी लावण्यात आलेले निर्बंध उठवण्याच्या अनुषंगाने शासनाकडून आज रोजी शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे.
करोनामुळे स्थगित केलेली शासकीय नोकरभरतीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सुधारित आकृतिबंध मंजूर करून घेतलेल्या विभागांना लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील १०० टक्के आणि आयोगाच्या कक्षेबाहेरील ५० टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनावरील व निवृत्तिवेतनावरील वाढता खर्च लक्षात घेता, राज्य सरकारने रिक्त पदभरती आणि नवीन नोकरभरतीबाबत संथगतीने वाटचाल सुरू ठेवली होती. २०१६ मध्ये एक आदेश काढून अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध तयार करून त्याला शासनाची मान्यता घेण्याच्या सूचना सर्व प्रशासकीय विभागांना व त्यांच्या अधीनस्त कार्यालयांना देण्यात आल्या होत्या. आकृतिबंध तयार नसेल तर रिक्त पदे भरण्यास किंवा नवीन पदनिर्मितीला मान्यता देण्यात येणार नाही, असे राज्य शासनाने स्पष्ट केले होते.
राज्य शासनाच्या आदेशानुसार विविध विभागांनी सुधारित आकृतिबंध तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असतानाच, पुढे मार्च २०२० मध्ये करोनाचे संकट ओढवले. करोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारला राज्यात संपूर्ण टाळेबंदी करावी लागली. त्याचा फटका राज्याच्या अर्थव्यवस्थेला बसला. त्यामुळे राज्य सरकारने मे २०२० मध्ये एक आदेश काढून सार्वजिनक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषध हे विभाग वगळून इतर सर्व विभागांतील नोकरभरतीवर निर्बंध लागू केले होते. तब्बल दोन वर्षांनंतर आता करोनाची परिस्थिती जवळपास पूर्णपणे नियंत्रणाखाली आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता करोनाकाळात लागू केलेले नोकरभरतीवरील निर्बंध उठवले आहेत. मात्र ज्या विभागांच्या सुधारित आकृतिबंधास अंतिम मंजुरी मिळाली त्या विभागांना नोकरभरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या संदर्भात वित्त विभागाने मंगळवारी एक आदेश काढून नोकरभरतीसंबंधीच्या कार्यवाहीबाबत माहिती दिली आहे. सुधारित आकृतिबंध मंजूर असलेल्या विभागांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेच्या बाहेरील रिक्त पदे ५० टक्के याप्रमाणे भरण्यास अनुमती देण्यात आली आहे. सुधारित आकृतिबंध मंजूर असलेल्या विभागांना लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सर्व रिक्त पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. होणार काय? करोनामुळे मे २०२० मध्ये नोकरभरतीवर निर्बंध घालण्याचा आदेश सरकारने प्रसृत केला होता़ आता करोनास्थिती नियंत्रणात आल्याने निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे सुधारित आकृतिबंधास अंतिम मंजुरी मिळालेल्या विभागांमध्ये पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आह़े.
Read Full GR
नोंदणी व मुद्रांक या विभागाची ही पदे MPSC आणण्याची प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षेत होऊ शकत समावेश
MPSC New GR For Examinations – Great News For Candidates who wants to fill all State govt Department Recruitment Process to be carried Out Through MPSC. Now Department of Registration and Stamps vacant posts will get filled under MPSC Examination for which The process of bringing the posts of Deputy Registrar of Stamps (Group-A) and Stamp Inspector (Group-B, Non-Gazetted) under the purview of Maharashtra Public Service Commission (MPSC) has been completed. The recruitment process will start from the commission after the recruitment rules of this cadre are finalized. If the government sends a demand letter for this post, the post will be included in the Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group-B Joint Examination. The decision in this regard has been announced by the General Administration Department. Know More about Department of Registration and Stamps Bharti 2022, Nondani Vibhag Maharashtra Bharti 2022, Mudrank Vibhag Recruitment 2022 at below
-
MPSC Free Mock Test Series 2022 नियमित सरावासाठी महाभरती एक्साम अँप लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा.
-
MPSC 2022 परीक्षेच्या तारखा जाहीर, ‘हे’ आहे वेळापत्रक
-
Maha Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022– Will Be Through MPSC
-
MPSC DMER Bharti 2022
-
Maharashtra Technical Services Exam Bharti 2022-588 Posts
-
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागा अंतर्गत 250 पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी भरती – १२ व्ही उत्तीर्णास संधी
-
Maharashtra Police Bharti 2022
-
Pashusavardhan Vibhag Bharti 2022-AHD Maha Bharti Through MPSC
-
Major Changes In MPSC Examination– MPSC अभ्यासक्रमात अचानक मोठा बदल, जाणून घ्या कोणत्या पदांसाठी ?
MPSC New GR For Examinations
मुद्रांक विभागाची दुय्यम निबंधक (गट- अ) आणि मुद्रांक निरीक्षक (गट-ब, अराजपत्रित) ही पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कार्यकक्षेत आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या संवर्गाचे सेवाप्रवेश नियम अंतिम झाल्यानंतर आयोगाकडून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. सरकारने जर या पदांचे मागणीपत्र पाठवले तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षेत या पदाचा समावेश केला जाईल. यासंबंधीचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केला आहे.
Department of Registration and Stamps Bharti 2022
महसूल व वन विभागाच्या अंतर्गत महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक या विभागाची ही पदे आहेत. या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी अनेक दिवसांपासून करीत आहेत. आता या पदांचा समावेश एमपीएससीच्या कार्यकक्षेत झाल्याने रिक्त पदांचे मागणी पत्र पाठवणे बंधनकारक ठरणार आहे. महसूल विभागाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पद आहे. १९९५ मध्ये या पदांसाठी तत्कालीन महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळामार्फत शेवटची स्पर्धा परीक्षेव्दारे भरती झालेली आहे. त्यानंतर भरती रखडलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी या पदांच्या भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. या विभागात ६०० पदे असून त्यापैकी ३०० पदे स्पर्धा परीक्षेतून भरणे अनिवार्य आहे. या पदांसाठी मागणी पत्रच काढले जात नव्हते. आता एमपीएससीच्या कार्यकक्षेत या पदाचा समावेश झाल्याने नियमित भरती होईल, असा विश्वास आहे. असे प्रशांत इंगळे या विद्यार्थ्याने सांगितले.
MPSC New GR For Examinations : The Maharashtra Public Service Commission (MPSC Exam 2022) has also decided to give an additional opportunity to the candidates who have crossed the age limit for recruitment. Due to Corona and Maratha reservation, the Maharashtra Public Service Commission (MPSC) examinations and recruitment process for Saralseva had not been implemented in the last two years, so the students had demanded an extension of one year from time to time. Taking note of this, the state government today, from March 01, 2020 to the date of this ruling, the candidates who have passed, from the date of this ruling. An ordinance has been issued stating that till 31st December, 2022, advertisements will be published in the government service as a “one time special matter”.
कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडून आता त्यांना शासकीय सेवेची दारे बंद होतील की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहानुभूतीपूर्वक यावर विचार करून अशी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने आज काढला आहे.
कोविडमुळे गेल्या दोन वर्षापासून एमपीएससी आणि सरळसेवेच्या भरती प्रक्रिया होऊ शकल्या नव्हत्या त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा कोरोनामुळे दोन वर्ष झालेल्या नाहीत. अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढलेली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढवा अशी मागणी होती. याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
महाराष्ट्रात दरवर्षी साधारणपणे 18 ते 20 लाख तरुण एमपीएससीची परीक्षा देतात. मात्र वेगवेगळ्या खात्यांमधील दरवर्षी भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या असते चार ते पाच हजार. मात्र वेळेत परीक्षा घेऊन वेळेत निकाल लावण्याचं काम राज्य लोकसेवा आयोग कधीच करत नाही. मागील दोन वर्षांपासून आधी राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट राहिल्यानंतर कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून एमपीएससीच्या परीक्षा वेळेत झालेल्याच नाहीत.
MPSC New GR For Examinations : Criteria for the post of Clerical Typist and Tax Assistant to be conducted after the main examination has been issued by MPSC. Candidates can check Latest Update on MPSC Clerical Typist and Tax Assistant Typing Test
लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीसाठी मुख्य परीक्षेनंतर घ्यावयाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचे निकष व सविस्तर कार्यपद्धत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Download Full Notice Here
खुशखबर !! या प्रवर्गातील दिव्यांग व अनाथ उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा नाही !!
MPSC New GR For Examinations – MPSC has Published One More Announcement Notification regarding maximum number of attempts for Competitive Examinations – Persons with Disabilities and Orphan Candidates, SC/ ST Candidates. Here is they can see MPSC New Annpouncement of Number of attempts and other onfomrtaion at below
दिव्यांग व अनाथ उमेदवारांना प्रत्येक स्पर्धा परीक्षांकरीताच्या कमाल संधी आयोगाने निश्चित केल्या आहेत. त्यानुसार प्रवर्गनिहाय तपशील खालीलप्रमाणे:-
- SC/ST प्रवर्गातील दिव्यांग व अनाथ:- कमाल संधीची मर्यादा नाही.
- Unreserved/EWS/अन्य मागास प्रवर्ग:- कमाल 9 संधी.
ESBC आणि SEBC प्रवर्गातील उमेदवारांना दिलासा देणारे शासन निर्णय जारी
MPSC New GR For Examinations – Considering the decision of the Supreme Court dated May 5, 2021, the reservation of Educationally and Socially Backward (ESBC) category has been postponed till the Mumbai High Court. The State Government has issued a decision regarding the retention of candidates who have been appointed from the ESBC category till November 14, 2014.
-
MPSC मार्फत BMC करिता गट अ पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु
-
ESBC आणि SEBC प्रवर्गातील उमेदवारांना दिलासा देणारे शासन निर्णय जारी
-
MPSCच्या 817 पदांची भरती प्रक्रिया लवकर सुरू करण्याच्या सूचना !!
-
मोठी बातमी! ‘MPSC ची सर्व रिक्त पदे ३१ जुलैपर्यंत भरणार’, ESBC वर्गातील उमेदवारांच्या वयोमर्यादेत वाढ
ज्या उमेदवारांना ईएसबीसी प्रवर्गातून नियुक्त्या देण्यात आल्या असतील त्या कायम करण्याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाने जारी केला आहे.
-
ईएसबीसी प्रवर्गातून दि. 14 नोव्हेंबर, 2014 पर्यंत देण्यात आलेल्या तदर्थ नियुक्त्या कायम होणार
-
एसईबीसी आरक्षणास स्थगितीपर्यंतच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील एसईबीसी उमेदवारांसाठी वयोमर्यादा मागासर्गीयांप्रमाणे ग्राह्य धरणार
-
ईडब्ल्यूएसचा विकल्प दिलेल्या एसईबीसी उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याच्या कालावधीत दिलासा
-
अराखीव (खुला) असा विकल्प दिलेल्या एसईबीसी महिला उमेदवारांचे एसईबीसी आरक्षणांतर्गत प्राप्त नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ग्राह्य धरणार
न्यायालयाचे आदेश लक्षात घेता दिनांक 21 फेब्रुवारी 2015 च्या आदेशात सुधारणा करून ईएसबीसी प्रवर्गाकरिता आरक्षणाबाबत दि. 2 डिसेंबर, 2015 च्या शासन शुद्धीपत्रकान्वये सुधारित आदेश निर्गमित केले होते. त्यानुसार शासकीय व निमशासकीय सेवेतील रिक्त पदांसाठी दि. 14 नोव्हेंबर, 2014 पूर्वी ईबीसी प्रवर्गासाठी असलेल्या आरक्षणासह जाहिरात दिलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत खुल्या प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांमधून तात्पुरत्या स्वरूपात जास्तीत जास्त 11 महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा या न्यायालयीन प्रकरणाचा अंतिम निर्णय, यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीकरिता तदर्थ स्वरूपात नेमणुका करण्याचा निर्णय राज्य शासनाने निर्णय घेतला होता. आता 5 जुलै, 2021 च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाने या तदर्थ स्वरुपातील नेमणुका कायम करण्याचा निर्णय घेतला आहे.
सिव्हिल पिटीशनच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दि. 5 मे, 2021 रोजी अंतिम निर्णय देऊन हा आरक्षण कायदा अवैध ठरवून एसईबीसी वर्गाचे आरक्षण रद्द केले. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत म्हणजेच दि. 9 सप्टेंबर, 2020 पर्यंत एसईबीसी आरक्षणासह सुरू केलेली आणि विविध टप्प्यांवर प्रलंबित असलेल्या भरतीप्रक्रिया पूर्ण करणे आणि या भरतीप्रक्रियेत समाविष्ट उमेदवारांना दिलासा देण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार एसईबीसी उमेदवारांचा अराखीव व इडब्ल्यूएस प्रवर्गात विचार करण्यात यावा; आणि असे करताना एसईबीसीच्या ज्या उमेदवारांनी अराखीव प्रवर्गाकरीता विहित करण्यात आलेली वयोमर्यादा ओलांडली असेल त्यांच्याबाबतीत जाहिरातीतील तरतुदीनुसार मागासवर्गीयांना देय असलेली वयोमर्यादा व परीक्षा शुल्काची सवलत कायम ठेवण्यात येईल, असे या निर्णयात राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.
सेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दि. 9 सप्टेंबर, 2020 पर्यंत सुरु केलेल्या ज्या निवड प्रक्रिया प्रलंबित आहेत अथवा ज्या नियुक्त्या प्रलंबित असतील अशा प्रकरणामध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण लागू असेल आणि एसईबीसी उमेदवारांनी ईडब्ल्यूएसचा विकल्प स्वीकारला असेल तसेच त्यासाठी ते पात्र असतील तर अशा उमेदवारांसाठीही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार अशा निवडप्रक्रियांमध्ये एसईबीसी उमेदवारांना ईडब्ल्यूएस आरक्षण अनुज्ञेय करताना, सन 2018-19 व सन 2019-20 मधील परीक्षांसाठी मार्च 2020 व सन 2020-21 मधील परीक्षांसाठी मार्च 2021 पर्यंत ग्राह्य असणारे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
तसेच ज्या एसईबीसी महिला उमेदवार अराखीव (खुला) असा विकल्प देतील अशा महिला उमेदवारांनी संबंधित पदाची / परीक्षेची जाहिरात (दोन किंवा अधिक टप्प्यांची परीक्षा असल्यास पूर्व परीक्षेची) प्रसिद्ध झालेली आहे, त्या जाहिरातीनुसार एसईबीसी आरक्षणासाठी प्राप्त केलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमिलेअर) प्रमाणपत्र हे अराखीव महिला पदासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
MPSC New GR For Examinations – Maharashtra Public Service Commission has issued new Press release for Submission Of Orphan Certificate(MPSC Anath Pramanpatra). Equal Reservation in education and employment has been implemented so that orphans can avail various government benefits. To avail this benefits in Coming MPSC Examination candidates have to submit their Orphan Certificate at mentioned email address. The last date for sending Scan PDf copy at given email address is 22nd February 2021.. More details can be read at below:
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2021
अर्ज करण्याचा पत्ता –[email protected]
MPSC Announcement Regarding Submission of Orphan Certificate
MPSC New GR Examinations are now Postponed. Postponed MPSC Exam 2020. Rajya Seva Purva Pariksha 2020 New Exam Dates & Details : एमपीएससीकडून १३ सप्टेंबरला होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात १३ सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला असून आता २० सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे. एमपीएसीकडून पत्रकाद्वारे अधिकृतरित्या हे जाहीर करण्यात आले आहे.
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents