MPSC New Recruitment 2022

MPSC मार्फत ८ हजार पदांची मेगा भरती

MPSC New Recruitment 2022 Update – Maharashtra Public Service Commission has advertised for 300 examinations and recruitment process is underway. The recruitment process for the highest number of 8,000 posts in the history of the state will be completed in the next six months, he said.

आगामी सहा महिन्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) (MPSC) च्या ३०० परीक्षांच्या (Exam) माध्यमातून राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक आठ हजार पदांची भरती प्रक्रिया (Mega Recruitment) राबवली जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी दिली आहे.

भरणेवाडी (ता.इंदापूर) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून इंदापूर व बारामती तालुक्यातील पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी भरणे यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण्यापूर्वी दोन वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा व विद्यार्थ्यांच्या मुलाखती रखडल्या होत्या. यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करुन एमपीएसीची सदस्यांची नेमणूक करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री उद्घव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही पाठपुरावा केला. राज्यपालांची सहीसाठी मी स्वतः भेट घेवून सही घेतली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ३०० परीक्षांची जाहिरात दिली असून भरतीची प्रक्रिया सुरु आहे. आगामी सहा महिन्यामध्ये राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक ८ हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

विद्यार्थ्याचे स्वप्न होणार पूर्ण

ग्रामीण भागासह शहरातील मुलांचे अधिकारी होण्याचे स्वप्न असते. सामान्य प्रशासन मंत्री झाल्यानंतर एमपीएसीची च्या संदर्भात मुले-मुली वारंवार भेटत होती. त्यांच्या अडचणी सांगत होते. त्यांची तळमळ पाहून तातडीने एमपीएसच्या परीक्षेचा प्रश्‍न मार्गाी लावला असून सहा महिन्यामध्ये ८ हजार पदांची भरती प्रक्रिया होणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

मुलाने स्पर्धा परीक्षा पास होवून अधिकारी होणे आई वडिलांचे स्वप्न असते. ही परीक्षा संयमाची व विद्यार्थ्याच्या वाढत्या वयाची परीक्षा असते. एमपीएससीच्या परीक्षासंदर्भात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुढाकार घेवून तीन वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया पूर्ण केल्याने कुंटूबाचे व आमचे स्वप्न वेळेत पूर्ण करु शकलो असल्याचे नवनिर्वार्चित पोलीस उपनिरीक्षक निलेश ओमासे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय मिळाला

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना ग्रामीण भागातील पालकांची तसेच मुलांची तळमळ माहीत असल्याने मामांनी पाठपुरावा करून रखडलेले भरती प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे आमचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे निवड झालेल्या पोलिस उपनिरीक्षक प्राजक्ता घुले यांनी सांगितले.


MPSC मार्फत दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेच्या जागांमध्ये वाढ-आता 1085 पदांची भरती होणार

MPSC New Recruitment 2022 Update –  This is important news for candidates preparing for the competitive examinations conducted by the Maharashtra Public Service Commission (MPSC). Maharashtra Secondary Service Joint Examination seats have been increased due to additional demand from State Government (MVA) to MAPSC. MPSC Group B Non-Gazetted 2021 Service Examination will now recruit 1085 posts. The posts of Assistant Cell Officer, State Tax Inspector, Sub-Inspector of Police will be filled through this examination. The Maharashtra Public Service Commission has informed through additional tweets that additional demand letter has been received from the government for a total of 419 posts. Earlier it was announced for 666 seats but now with the increase of 419 seats, the process will be implemented for 1085 posts. The Public Service Commission (PSC) has said that more information about the increased seats will be given while announcing the main examination.

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारकडून (MVA) एमएपीएससीकडे अतिरिक्त मागणीपत्र देण्यात आल्यानं महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेच्या जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. एमपीएससी गट ब अराजपत्रित 2021 सेवा परीक्षेद्वारे आता 1085 पदांची भरती होणार आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector), पोलीस उपनिरीक्षक अशी पद या परीक्षेद्वारे भरली जाणार आहेत. एकूण 419 पदांसाठी अतिरिक्त मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झालं असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ट्विट द्वारे कळवण्यात आलं आहे. या आधी 666 जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आलं होतं आता 419 जागा वाढल्यानं 1085 पदांसाठी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. वाढ करण्यात आलेल्या जागांसंबंधीची अधिक माहिती लोकसेवा आयोगाकडून मुख्य परीक्षेची अधिसूचना जाहीर करताना करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

1085 पदांची भरती होणार

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021करीता राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या 419 अतिरिक्त पदांचे मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले आहे. याद्वारे एकूण 1085 पदांकरीता भरतीप्रक्रिया आयोजित करण्यात येईल.प्रवर्गनिहाय पदे मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील, असं लोकसेवा आयोगाकडून कळवण्यात आलं आहे. दरम्यान, वाढ करण्यात आलेली पदं ही राज्य कर निरीक्षक संवर्गातील आहेत.

पदांचा तपशील

सामान्य प्रशासन विभागाकडील सहायक कक्ष अधिकारी पदाच्या 100 जागांवर, तर वित्त विभागाच्या राज्य कर निरीक्षक पदाची 190 आणि गृह विभागाच्या 376 पदं अशा एकूण 666 पदांसाठी मूळ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आता त्यामध्ये राज्य कर निरीक्षक पदाच्या 419 जागांमध्ये वाढ झालीय. त्यामुळे राज्य कर निरीक्षक पदाच्या एकूण 609 जागांसाठी ही भरती होईल. तर एकूण भरती प्रक्रिया 1085 पदांसाठी राबवण्यात येईल.

पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित परीक्षा जाहीर

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आणि परिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या द्वारे पोलीस सेवेत असणाऱ्या उमदेवारांना 6 मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.


या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा – एका मार्कमुळे मुख्य परीक्षेपासून वंचित राहिले त्यांना मुख्य परीक्षेला बसू देण्याचे आदेश

MPSC New Recruitment 2022 – The examination for the post of PSI was conducted by Maharashtra Public Service Commission. The answer sheet of this examination was published by the Commission three times. However, this answer sheet was objected to by some students. The students had claimed that the answers to many questions in the answer sheet were wrong. The students had run in the High Court against this. These students have received great relief from the High Court. The High Court has directed the Maharashtra Public Service Commission to allow students who failed the main examination due to one mark to sit for the main examination.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) पीएसआय पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची उत्तरपत्रिका (Answer sheet) आयोगाकडून तीन वेळा प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या उत्तरपत्रिकेवर काही विद्यार्थ्यांकडून अक्षेप घेण्यात आला होता. उत्तरपत्रिकेत अनेक प्रश्नाचे उत्तरं चुकीचे असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला होता. याविरोधात विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली होती. उच्च न्यायालयाकडून या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जे विद्यार्थी एका मार्कमुळे मुख्य परीक्षेपासून वंचित राहिले त्यांना मुख्य परीक्षेला बसू देण्याचे आदेश हायकोर्टाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिले आहेत. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देता येणार आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती, त्याच 86 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देता येणार आहे.

विद्यार्थ्यांची हायकोर्टात धाव

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2020 या वर्षासाठी पीएसआय पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र जेव्हा आयोगाकडून या परीक्षेची उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली तेव्हा या उत्तरपत्रिकेमध्ये अनेक त्रुटी राहिल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले होते. या उत्तरपत्रिकेमध्ये अनेक प्रश्नाचे उत्तर ही चुकीचे असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. याचा फटका जवळपास 3 हजार 500 विद्यार्थ्यांना बसल्याचा दावा देखील करण्यात आला होता. याविरोधात 86 विद्यार्थ्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. या विद्यार्थ्यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

86 विद्यार्थ्यांनाच देता येणार मुख्य परीक्षा

ज्या विद्यार्थ्यांची एका मार्काने मुख्य परीक्षेची संधी हुकली आहे. अशा विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला बसू देण्याचे आदेश न्यायालयाने आयोगाला दिले आहेत. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती त्याच 86 विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे. याबाबतचे आदेश न्यायालयाकडून आयोगाला देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


विविध विभागांमधून १५ हजार ५११ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास मान्यता !

MPSC New Recruitment 2022 : The government has approved to fill 15 thousand 511 posts from various departments including public health and medical education department in the state through Maharashtra Public Service Commission. Maharashtra Public Service Commission has received applications for 7,560 posts. Also, why the demand letter for the remaining seats was not submitted to the Commission. This will be followed up, said Dattatreya Bharane, Minister of State for General Administration.

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागासह विविध विभागांमधून १५ हजार ५११ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास सरकारने मान्यता दिलेली आहे. सात हजार ५६० पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास प्राप्त झाले आहे.

तसेच, राहिलेल्या जागांचे मागणी पत्र आयोगास का दाखल झाले नाही. याचा पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

वर्षाच्या सुरुवातीलाच दोन जुलैला राज्यसेवा पूर्व परीक्षा ३९० जागांसाठी घेण्यात येणार होती. मात्र, ती अचानक रद्द झाली असून, या महिन्यात होईल, अशी अपेक्षा आहे. संयुक्त पूर्व परीक्षा ६६६ जागांसाठी २६ फेब्रुवारीला होत आहे, याची मुख्य परीक्षा जुलैमध्ये होणार आहे. गट ‘क’ परीक्षा ९०० जागांसाठी तीन एप्रिलला होणार आहे. या वर्षातील पुन्हा होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा १९ जूनला घेण्यात येणार आहे. पुन्हा दुय्यम परीक्षेची पूर्व परीक्षा ८ ऑक्टोबरला रोजी होणार आहे, त्याचबरोबर गट ‘क’ची परीक्षा ५ नोव्हेंबरला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नियोजित केली आहे.

”येणाऱ्या वर्षात सर्व नियोजित परीक्षा वेळेवर घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. १५ हजार ५११ जागा लवकरात लवकर भरण्याचा आमचा मनोदय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावे.”
– दत्तात्रेय भरणे, राज्यमंत्री, सामान्य प्रशासन विभाग

”दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक आयोगाने प्रसिद्ध केले आहे. मात्र, यातील २० टक्केसुद्धा परीक्षेच्या वेळापत्रकाची अंमलबजावणी होत नाही, असा आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे.”
– सनी चव्हाण, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी

मागणीपत्राद्वारे प्राप्त पदसंख्या
स्पर्धा परीक्षा/सरळसेवा भरती… जागा
अ…३०११
ब…२६५८
क…१८९१
एकूण…७५६०

जाहिराती प्रसिद्ध पदसंख्या
स्पर्धा परीक्षा/सरळसेवा भरती…जागा
अ…१४९९
ब…१२४५
क…१५८३
एकूण…४३२७


MPSC New Recruitment 2022 Updates : There has been a huge increase in the number of posts being filled by the Maharashtra Public Service Commission (MPSC) and Saralseva. By the end of 2021, it has been observed that there are 7560 vacancies available in the vacancy information leaflets requested by MPSC from various departments of the state. This will give a golden opportunity to the students of MPSC in the coming year. The MPSC had asked them to submit a demand letter stating the total number of vacancies in ‘A’, ‘B’ and ‘C’ groups in different departments of the state. Similarly, the number of vacancies in 25 divisions of the state has been received by the MPSC and a total of 7560 vacancies in all the three groups are vacant in the state. As a result, advertisements for 4327 posts have already been published. These exams will take place in the next few months. Besides, examinations for the remaining 3233 seats will be held this year. This will bring a golden opportunity for the students preparing for MPSC in the new year.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) आणि सरळसेवेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. २०२१ वर्षाअखेरीपर्यंत ‘एमपीएससी’ने राज्याच्या विविध विभागांकडून मागवलेल्या रिक्त जागांच्या माहितीपत्रात ७५६० जागा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे येत्या वर्षात ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी मिळणार आहे.

राज्याच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ गटांतील एकूण किती पदे रिक्त आहेत, याबाबतचे मागणीपत्र देण्यास ‘एमपीएससी’ने सांगितले होते. त्याप्रमाणे राज्याच्या २५ विभागांमधील रिक्त असलेल्या पदांची संख्या ‘एमपीएससी’कडे प्राप्त झाली असून, राज्यात तिन्ही गटांच्या एकूण ७५६० जागा रिक्त आहेत. यामुळे यातील ४३२७ पदांसाठी जाहीराती यापूर्वीच प्रसिद्ध झाल्या आहेत. या परीक्षांत पुढील काही महिन्यात होणार आहेत. याचबरोबर उर्वरित ३२३३ जागांसाठीच्या परीक्षा याच वर्षी घेण्यात येणार आहेत. यामुळे नवे वर्ष ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी घेऊन येणार आहे.

राज्यातील सामान्य प्रशासन विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग या विभागांमध्ये सरळसेवा आणि स्पर्धा परीक्षा अशा दोन्ही गटांमध्ये सर्वाधिक रिक्त पदे आहेत. या पदांसाठी येत्या वर्षात विद्यार्थ्यांमध्ये चुरस असणार आहे. या संदर्भातील सविस्तर यादी ‘एमपीएससी’च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यात विभागवार रिक्त पदांची संख्या उपलब्ध करून देण्यात आली आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये फारशा परीक्षा झालेल्या नाहीत. यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी चिंतेत होते. परीक्षा होत नसल्याने अनेकांच्या कमाल वयाची मर्यादा ओलांडून चालली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या वर्षात रिक्त पदांची संख्या मोठी असल्याने परीक्षांची संख्याही वाढणार आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. ‘एमपीएससी’ने लवकरात लवकर परीक्षांची वेळापत्रक आणि जाहिराती प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी आता विद्यार्थी करत आहेत

‘एमपीएससी’ने विद्यार्थ्यांना दिलासा द्यायला हवा

सरळसेवा आणि स्पर्धा परीक्षांद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या वाढल्याने ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. येत्या वर्षात या सर्व पदांसाठी परीक्षा घेऊन ‘एमपीएससी’ने विद्यार्थ्यांना दिलासा द्यायला हवा. लवकरात लवकर आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात याव्यात, अशी आमची मागणी आहे.


MPSC Bharti 2022- Maharashtra Public Service Commission has postponed Rajya Seva Purv Pariksha 2022 which was scheduled on 2nd January 2022.  The state service pre-examination scheduled for January 2 has been postponed. Explaining this, the Maharashtra Public Service Commission said that the maximum age limit of some candidates has been exceeded due to non-publication of advertisements for direct service in government service on the background of corona virus. As a result, some have lost the opportunity to sit for the exam. With a view to implementing the decision taken by the government to provide opportunity to such candidates to sit for the examination, the Commission is postponing the State Service Pre-Examination-2021 scheduled for Sunday, January 2, 2022. Read Below Notice

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2 जानेवारी 2022 रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 पुढे ढकलली आहे. MPSC ने एका पत्राद्वारे हे स्पष्ट केलंय. परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.परिक्षा पुढे ढकलल्याने नवं वेळापत्रक जाहीर होणार असून रविवारी दोन जानेवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

 


MPSC Bharti 2021 –There was a demand for raising the age limit as candidates who have crossed the age limit for recruitment could not appear for the competitive examination. Following the decision, the state government has decided to offer an additional opportunity for the MPSC Exam, but the GR will be issued between December 10 and 15 as the local body election code of conduct is in force. This decision is important in the background.

नोकरभरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षा देता येत नसल्याने वयोमर्यादा वाढवण्याची मागणी होत होती. त्याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर आता एमपीएससीसाठी ( (MPSC Exam)  एक वाढीव संधी देण्याचाही निर्णय राज्य सरकारने घेतलाय. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता अंमलात असल्याने याबद्दलचा जीआर 10 ते 15 डिसेंबर दरम्यान काढण्यात येईल.  कोविडमुळे गेल्या दोन वर्षापासून एमपीएससी आणि सरळसेवेच्या भरती प्रक्रिया होऊ शकल्या नव्हत्या त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा आहे.

▶️उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाची पदे MPSCआयोगामार्फत भरण्यात येईल, तांत्रिक कार्यवाही पूर्ण ..!

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा कोरोनामुळे दोन वर्ष झालेल्या नाहीत. अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढलेली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची  वयोमर्यादा वाढवा अशी मागणी होती.  याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीसाठी मुख्य परीक्षेनंतर घ्यावयाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचे निकष 

महाराष्ट्रात दरवर्षी साधारणपणे 18 ते 20 लाख तरुण एमपीएससीची परीक्षा देतात. मात्र वेगवेगळ्या खात्यांमधील दरवर्षी भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या असते चार ते पाच हजार. मात्र वेळेत परीक्षा घेऊन वेळेत निकाल लावण्याचं काम राज्य लोकसेवा आयोग कधीच करत नाही. मागील दोन वर्षांपासून आधी राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट राहिल्यानंतर कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून एमपीएससीच्या परीक्षा वेळेत झालेल्याच नाहीत.


MPSC वयोमर्यादा वाढीला आचारसंहितेची बाधा! अर्जाची वाढेल मुदत ?

MPSC Bharti 2021 – Today (Tuesday) is the last date to apply for the joint pre-examination ‘Group-B’. This has increased the anxiety of the candidates. However, as it is the code of conduct of the Legislative Council, feedback has been sought from the Election Commission. If the ruling is delayed, the deadline for those candidates to apply will be extended, said Dattatraya Bharne, Minister of State for General Administration.

▶️सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 ची प्रथम उत्तरतालिका प्रसिद्ध !!

Through Maharashtra Public Service Commission, 666 posts will be recruited under Joint Pre-Examination Group-B. The exam will be held on February 26, 2022.

कोरोनामुळे (Covid-19) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माध्यमातून परीक्षा होऊ शकल्या नाहीत. या काळात काही उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली. त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची वाढीव संधी मिळावी म्हणून राज्य सरकारने (Maharashtra State Government) एक वर्षाची वयोमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, परंतु अजून शासन निर्णय निघाला नाही. आज (मंगळवारी) संयुक्‍त पूर्व परीक्षा ‘गट-ब’साठी अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे उमेदवारांची चिंता वाढली आहे. परंतु, विधान परिषदेची (Legislative Council) आचारसंहिता असल्याने त्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे अभिप्राय मागविण्यात आला आहे. शासन निर्णयास विलंब झाल्यास त्या उमेदवारांना अर्ज करण्याची मुदत पुढे वाढवून दिली जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांनी दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून संयुक्‍त पूर्व परीक्षा गट-ब अंतर्गत 666 पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी 26 फेब्रुवारी 2022 रोजी परीक्षा होणार आहे. त्यामध्ये पीएसआय, सहाय्यक कक्ष अधिकारी आणि विक्रीकर निरीक्षक (एसटीआय) ही पदे भरली जाणार असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंतच आहे. राज्य सरकारने कोरोना संकटामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या ‘एमपीएससी’ची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना एक वर्ष वाढीव संधी दिली आहे. मात्र, राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून ती 14 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा शासन निर्णय निघालेला नाही.


उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाची पदे MPSCआयोगामार्फत भरण्यात येईल, तांत्रिक कार्यवाही पूर्ण ..!

MPSC New Recruitment 2021 -An amendment has been issued in the Maharashtra Public Service Commission (Exemption from Discussion) Rules, 1965 to bring the posts of Industry Inspector, Group-C cadre under the purview of Maharashtra Public Service Commission. The technical process for filling up these posts through the Commission has been completed. So it is clear that this vacancies will get filled through MPSC. Know More Update about MPSC New Recruitment 202 at below

उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचार विनिमयापासून सुट) विनियम १९६५ मधील सुधारणा जारी करण्यात आली आहे. सदर पदे आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील तांत्रिक कार्यवाही पूर्ण झाली आहे.

MPSC New Recruitment 2021


MPSC New Recruitment 2021 -22 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षा 2019 चे 416 विद्यार्थी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यार्थ्यांना नियुक्त्या देण्याचं यापूर्वी जाहीर केलं होतं. काही बदलांमुळं विद्यार्थी कोर्टात गेले होते त्यामुळं नियुक्तीपत्र द्यायला उशीर झाला आहे. मात्र, आज त्या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात बैठक बोलावल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

15 हजार जागांचं मागणीपत्र एमपीएससीला देणार

विधानसभेत अजित पवार यांनी 15 हजार जागांवर एमपीएससी तर्फे भरती करणार असल्याचं सांगितलं होतं. आता 7 हजार 168 पदांचं मागणीपत्र एमपीएससीला दिलं आहे. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत आणखी जागांसाठी मागणीपत्र एमपीएससीला देणार आहे, असं सामान्य प्रशासन विभागाचे राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

वयोमर्यादा वाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच

राज्य सरकारनं कोरोना विषाणू संसर्गामुळं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 वर्ष वयोमर्यादा वाढवून देण्यात आली आहे. परीक्षा न झाल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री रुग्णालयात असल्यानं त्याची प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे. अर्ज करण्याची मुदत संपली असली तर विद्यार्थ्यांना नंतर अर्ज भरण्याची मुदत दिली जाईल, असं दत्तात्रय भरणे म्हणाले.

नियुक्तीसाठी विद्यार्थ्यांकडून आत्मदहनाचा इशारा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2019 च्या राज्यसेवा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नियुक्त्या मिळाव्यात म्हणून आक्रमक भूमिका घेतली होती. राज्य सेवा परीक्षा होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. नियुक्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत आत्मदहनाचा इशारा दिला होता. उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, या पदांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत.


MPSC New Recruitment 2021 -22 : During the Corona period, like other issues, the issue of MPSC students’ examinations, their results, their losses was a hot topic. In Pune, MPSC candidates had taken to the streets in protest of the Ain Corona crisis. Due to the postponement of the exams during the Corona period, there was an agitation to demand the taking of these exams. However, due to the crisis in Corona, it was decided to postpone the exam. However, due to all this confusion, the examinees suffered a great loss. Against this backdrop, the state government has taken a big decision for MPSC candidate

कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षा देता आल्या नाही त्या विद्यार्थ्यांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी सांगितलं आहे. मंत्रिमंडळ बैठकीत आज याला मान्यता देण्यात आली असल्याचं दत्ता भरणे यांनी सांगितलं आहे.

विद्यार्थ्यांना दिलासा

कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यापासून एमपीएससीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. विविध संवर्गाच्या जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली नव्हती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं वयोमर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. खासदार संभाजी छत्रपती यांनी देखील विद्यार्थ्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवली होती. राज्य सरकारच्या या निर्णयामुळं विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांना कोरोना काळात परीक्षा न झाल्यानं वयोमर्यादा संपल्यानं परीक्षा देता आली नव्हती. विद्यार्थ्यांची आणि अनेक राजकीय नेत्यांची मागणी वयोमर्यादा वाढवून देण्याची मागणी होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली. एकमतानं विद्यार्थ्यांना एक वर्ष वाढवून देण्याचा निर्णय झाला, असं दत्तात्रय भरणे म्हणाले.

खासदार संभाजी छत्रपतींचा पाठपुरावा

राज्यसभा खासदार संभाजी छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव दोन संधी मिळावी अशी मागणी केली होती. कोरोनामुळं दोन वर्ष जाहिरात निघाली नाही, काही विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपली. गेल्या तीन चार वर्षांपासून परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नुकत्याच जाहीर झालेल्या परीक्षांचे अर्ज करता येत नाहीत, असं संभाजी छत्रपती यांनी म्हटलं होतं.

 


MPSC New Recruitment 2021 –The posts of Class 1 and Class 2 in the Department of Medical Education and Cultural Affairs are being filled by the Maharashtra Public Service Commission and action is being taken in this regard. However, as the vacancies of Class 3 and Class 4 will be filled by the department, a time bound plan should be prepared by both the departments for filling the vacancies, said Medical Education and Cultural Affairs Minister Amit Deshmukh.

वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वर्ग 1 आणि वर्ग 2 ची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येत असून याबाबत कार्यवाही सुरु आहे. मात्र वर्ग 3 आणि वर्ग 4 ची रिक्त पदे विभागामार्फत भरण्यात येणार असल्याने रिक्त पदे भरण्याबाबतचा कालबद्ध आराखडा दोन्ही विभागामार्फत तयार करण्यात यावा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या.

आज मंत्रालयात श्री.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही‍ विभागांच्या रिक्त पदांबाबतचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, फिल्मिसिटीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले की, दोन्ही विभागांतील रिक्त पदे पाहता ही रिक्त पदे भरण्याबाबत तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. रिक्त पदे भरीत असताना ही पदे कशा पद्धतीने भरण्यात येतील याबाबत आराखडा तयार करण्यात यावा. विभाग पदे भरीत असताना परीक्षा घेण्यासाठी कोणत्या संस्थेची निवड कशा पद्धतीने करण्यात येणार आहे, ज्या पदांची भरती करण्यात येणार आहे त्या पदांचे भरती नियम याबाबत सर्व नियोजन करण्यात यावे. तसेच विभागाचा आढावा घेताना पदोन्नती, विभागाचा आकृतीबंध या सगळ्या बाबी तपासून घेण्याचे निर्देशही यावेळी दिले.


MPSC New Recruitment 2021 – राज्य शासनाच्या 43 विभागांमध्ये सद्य:स्थितीत अडीच लाखांहून अधिक पदे रिक्‍त आहेत. त्यापैकी जवळपास 19 हजार पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission – MPSC) माध्यमातून होईल, असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांनी यापूर्वीच जाहीर केले. त्या अनुषंगाने सर्व विभागांनी 31 ऑक्‍टोबरपर्यंत आयोगाला मागणीपत्र सादर करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. मात्र, बहुतेक विभागांनी मागणीपत्रे दिली नसल्याने ही मुदत आता 31 डिसेंबरपर्यंत वाढविल्याचे भरणे यांनी सांगितले.

कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दोन वर्षे परीक्षाच घेता आली नाही. त्यामुळे वयोमर्यादेच्या काठावरील उमेदवारांची चिंता वाढली. खूप प्रयत्न केल्यानंतर आता यश मिळेल, या आशेतून त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला. त्याच ‘एमपीएससी’च्या उमेदवारांच्या अडचणी सोडविल्या जातील, अशी ग्वाही यापूर्वीच्या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो वा राज्यमंत्री भरणे यांच्यासह काही लोकप्रतिनिधींनी, ज्यांची वयोमर्यादा संपुष्टात येईल, त्यांना वाढीव संधी देण्यासंदर्भात वारंवार ग्वाही दिली. मात्र, अजूनपर्यंत ठोस निर्णय झालेला नाही. दुसरीकडे, राज्यातील सुशिक्षित तरुणांना सरकारी नोकरी मिळावी, या हेतूने पदभरतीवरील निर्बंध काही प्रमाणात वित्त विभागाने शिथिल केले. त्यानुसार गट- ब व गट- क संवर्गाची पदभरती ‘एमपीएससी’मार्फत केली जाईल, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यात महसूल, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धविकास, गृह विभाग, आरोग्य, मेडिकल यासह इतर काही महत्त्वाच्या विभागांमधील 19 हजार पदांचा समावेश आहे. आतापर्यंत साडेआठ हजार पदांची मागणीपत्रे आयोगाला पाठविण्यात आली असून उर्वरित मागणीपत्रांसाठी डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्र्यांनी अनेक आश्‍वासने दिली; परंतु त्यानुसार कार्यवाही झालीच नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध विभागांमधील जवळपास 19 हजार रिक्‍त पदांची भरती केली जाणार आहे. तांत्रिक अडचणींमुळे सर्व विभागांचे मागणीपत्र आयोगाला पोचलेली नाहीत. परंतु, डिसेंबरपर्यंत सर्व विभागांची मागणीपत्रे आयोगाला पाठविली जातील आणि त्यानंतर लगेचच पदभरती होईल. वयोमर्यादा वाढीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले असून त्यावर अजून निर्णय झाला नाही, परंतु सकारात्मक तोडगा निघेल.

– दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री, सामान्य प्रशासन


महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी जाहिरात नोव्हेंबर 2021

MPSC New Recruitment 2021 – Advertisement for Maharashtra Group C Joint Pre-Examination 2021 will be published in November 2021. Official Tweet on the behalf of MPSC has been made. Candidates awaiting for Group C Combine Exam now will be in relief. You can check Official Announcement at below

महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी जाहिरात नोव्हेंबर 2021 मध्ये प्रकाशित केली जाईल. MPSC च्या वतीने अधिकृत ट्विट करण्यात आले आहे.

MPSC New Recruitment 2021


वयोमर्यादा पार केलेल्यांना MPSC ची आणखी संधी! राज्य मंत्रिमंडळामध्ये झाली चर्चा 

MPSC New Recruitment 2021 – The age limit of candidates for such posts, which have not been examined by the State Public Service Commission for the last two years, is likely to be increased. The matter was discussed at a state cabinet meeting on Wednesday. Read Details about MPSC New Recruitment 2021 at below

राज्य लोकसेवा आयोगामार्फत गेली दोन वर्षे परीक्षा होऊ शकलेली नाही, अशा पदांच्या परीक्षांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा वाढवून दिली जाण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत बुधवारी चर्चा झाली.

एमपीएससीमार्फत पदभरतीसाठी परीक्षेची जाहिरात तब्बल दोन वर्षांनंतर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कोरोनामुळे परीक्षा वारंवार रद्द करण्यात आलेली होती. उमेदवारांनी त्यासाठी बरीच तयारीदेखील केली. मात्र, परीक्षाच न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा ओलांडली. ही वयोमर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व अन्य काही मंत्र्यांनी याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मागणी केली. आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा ३८ वर्षे आहे तर अन्य राखीव उमेदवारांसाठी ती ४३ वर्षे इतकी आहे.  सूत्रांनी सांगितले की एकदा वयोमर्यादा वाढवून संधी हुकलेल्यांना ती पुन्हा देण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाचे मत मागवावे आणि पुढील बैठकीत त्या संबंधीचा प्रस्ताव आणावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासनाला दिले.

कोरोना काळात एमपीएससीची परीक्षा न झाल्यामुळे वयोमर्यादा पार केलेल्या उमेदवारांना नोकरभरतीच्या नवीन जाहिरातीत अतिरिक्त संधी मिळावी, अशी मागणी मी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली. याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत निर्णय अपेक्षित आहे.
– अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष


प्राप्त बातमी नुसार, राज्य सरकारच्या महसूल, कृषी, पशु संवर्धन, शालेय शिक्षण व क्रिडा, मराठी भाषा, सार्वजनिक आरोग्य, मेडिकल, जलसंपदा, अन्न व नागरी पुरवठा यासह एकूण विविध 43 विभागांमधील जवळपास 18 हजार 743 पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (MPSC)पुढील आठवड्यात पाठविली जातील. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये भरती प्रक्रिया राबविली जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासनाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या संदर्भातील पुढील अपडेट आम्ही लवकरच MahaBharti.co.in वर प्रकाशित करूच !!

या संदर्भातील सर्व अपडेट्स साठी महाभरती अँप लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

राज्य शासनाच्या गृह विभागात जवळपास 29 हजार, आरोग्य विभागात 20 हजार 594, जलसंपदा विभागात 21 हजार, कृषी विभागात साडेचौदा हजार, महसूल विभागात 13 हजार तर शालेय शिक्षण व क्रिडा विभागात 8 ते 10 हजार, सार्वजनिक बांधकाम विभागात अंदाजित नऊ हजार पदे रिक्‍त आहेत. सद्यस्थितीत जवळपास अडीच लाख पदे रिक्‍त असून मागील काही वर्षांत त्याची भरतीच झालेली नाही. तत्कालीन फडणवीस सरकारने 70 हजार पदांची मेगाभरतीची घोषणा केली, परंतु पुढे काहीच झाले नाही. महाविकास आघाडी सरकारने जवळपास एक लाख पदांच्या भरतीची घोषणा केली, परंतु कोरोनामुळे ती होऊ शकली नाही.दरम्यान, स्पर्धा परीक्षा निकालाच्या प्रतीक्षेतील पुण्यातील स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून जवळपास 15 हजार पदांची भरती होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यानंतर 30 सप्टेंबरपर्यंत सर्वच विभागांनी आयोगाला मागणीपत्र सादर करावीत, असा शासन निर्णय निघाला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही सप्टेंबरमध्ये तशा सूचना सर्वच विभागांना दिल्या. मात्र, अजूनपर्यंत मागणीपत्र न पाठविल्याने विद्यार्थी आक्रमक झाल्याचे चित्र आहे. त्यावर राज्यमंत्री भरणे म्हणाले, उच्चस्तरीय समितीमार्फत रिक्‍त पदांच्या आरक्षणाची पडताळणी केली जात असून पुढील आठवड्यात मागणीपत्र आयोगाला जातील.

राज्य शासनाच्या विविध विभागांमधील रिक्‍त पदांचे मागणीपत्र आयोगाला पुढील आठवड्यात सादर होतील. जवळपास 18 ते 19 हजार पदांची भरती आयोगामार्फत लगेचच राबविली जाईल. जेणेकरून सुशिक्षित तरुणांना नोकरी मिळेल.

– राज्य सरकारच्या 43 विभागांमध्ये जवळपास अडीच लाख पदे रिक्‍त

– पहिल्या टप्प्यात ‘एमपीएससी’मार्फत 18 हजार 743 पदांची होईल भरती

– आठ दिवसांत सर्वच विभागांकडून आयोगाला जातील रिक्‍त पदांचे मागणीपत्र

– नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबविली जाईल भरती प्रक्रिया

– राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर टप्प्याटप्याने भरली जाणार रिक्‍त पदे

 

नोंदणी व मुद्रांक विभागातील गट ब संवर्गाची पदे तसेच उद्योग निरीक्षक संवर्गाची पदे महाराष्ट्र गट क संयुक्त परीक्षेमधून भरण्यात येतील -MPSC

MPSC New Recruitment 2021 – 2022 Updates  – नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक व मुद्रांक निरीक्षक अराजपत्रीत गट ब संवर्गाची पदे आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील तांत्रिक कार्यवाही शासनस्तरावर सुरू आहे. तसेच उद्योग निरीक्षक संवर्गाची पदे महाराष्ट्र गट क संयुक्त परीक्षेमधून भरण्यात येतील. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या नियंत्रणाखालील उद्योग संचालनालयाच्या आस्थापनेवरील उद्योग निरीक्षक, गट-क पदाचे सेवा प्रवेश नियम शासनाकडून अधिसूचित करण्यात आले आहेत. सदर पद प्रथमच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार आहे.त्यासंदर्भात MPSC ने ट्विट केले आहे

MPSC New Recruitment 2021 - 2022 Updates 

MPSC New Recruitment 2021 - 2022 Updates 


MPSC या महिन्यात स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती, भरतींकरीता निवडप्रक्रियेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा, नवीन ऑपशनल पेपर आणण्याच्या तयारीत  !!

MPSC New Recruitment 2021 – 2022 Updates  – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ऑक्टोबर 2021 मध्ये स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याचे नियोजित आहे. सदर जाहिरातींस अनुसरून अर्ज करणे सुलभ व्हावे; याकरिता अद्याप खाते अद्ययावत न केलेल्या उमेदवारांनी त्यांची खाती लवकरात लवकर अद्ययावत करावीत.

MPSC New Recruitment 2021 - 2022 Updates

MPSC भरतींकरीता निवडप्रक्रियेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय

The Commission was considering to revise the selection process by asking the Maharashtra Public Service Commission to announce the final results of various recruitment processes. An important decision has been taken by the Commission in this regard.

Accordingly, the general merit list for all the recruitment processes conducted by the Commission will be published on the Commission’s website. Also, a final recommendation list will be prepared on the basis of the general merit list published on the Commission’s website for the recruitment process for multi-category posts by soliciting preference from eligible candidates.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतींकरीता निवडप्रक्रियेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यानुसार 2020 व तदनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्व जाहिरातींच्या प्रलंबित निकाल प्रक्रियांपासून अगोदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

MPSC New Recruitment 2021 - 2022 Updates 

बहुसंवर्गिय पदांच्या भरती करिता गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांकडून पदांचे पसंतीक्रम मागवून अंतिम शिफारस यादी तयार करण्यात येईल.

बहुसंवर्गिय पदांच्या भरतीप्रक्रिया वगळता अन्य भरतीप्रक्रियांकरिता गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम शिफारस यादी तयार करण्यात येईल.

आयोग नवीन ऑपशनल पेपर आणण्याच्या तयारीत आहे..

MPSC New Recruitment 2021 - 2022 Updates 


MPSC New Recruitment 2021 – 2022 Updates – महाराष्ट्र लोकसेवा आयोग ची 15 हजार 511 पदांची भरती अखेर जाहीर झाली आहे. राज्य शासनाचे साधारणपणे तीन टक्के कर्मचारी दरवर्षी निवृत्त होतात. चार-पाच वर्षांपासून राज्यातील भरतीप्रक्रिया बंद असल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून शासकीय कामकाजावर परिणाम होत आहे.

ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन विविध खात्यांतील रिक्‍त पदांची माहिती तत्काळ संकलित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. या भरतीची घोषणा त्यांनी विधिमंडळ अधिवेशनातच केली होती. त्यानुसार गट अ, गट ब व गट क श्रेणीतील कार्यकारी पदे भरतीप्रक्रियेद्वारे तातडीने उपलब्ध करुन देण्यात आली आणि 2018 पासूनच्या एकूण 15 हजार 511 पदांच्या भरतीस मान्यता मिळाली.

मुख्यमंत्र्यांचेही निर्देश
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत सरळ सेवा भरतीसाठी काही विभागांकडून अद्यापपर्यंत मागणीपत्र आयोगाला सादर झालेले नाहीत. त्याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागांतील विविध अभियंता अशा विविध पदांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पदांच्या मुख्य परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या 3 हजार 664 उमेदवारांच्या उमेदवारांच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखती होणार आहेत. पुणे आणि नाशिक शहरांत या मुलाखती दोन टप्प्यात होतील. 4 ऑक्टोबरपासूनचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे मुलाखत कार्यक्रम आहे.

Table of Contents

Leave a Comment